28 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
बिहारच्या निवडणुकीसाठी तगडा बंदोबस्त; केंद्रीय पोलिसांच्या 300 कंपन्या राहणार तैनात:
28 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (28 सप्टेंबर 2020)
शेतकऱ्यांसाठी हा ‘काळा दिवस’:
आठवडय़ाभरापासून राजकीय वादळ निर्माण करणाऱ्या तिन्ही कृषी विधेयकांवर रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली.
त्यामुळे कृषी क्षेत्रातील बदलांचे कायदे प्रत्यक्षात अस्तित्वात आले आहेत.
दुसरीकडे, शेतकऱ्यांसाठी हा ‘काळा दिवस’ असल्याची संतप्त प्रतिक्रिया भाजपची साथ सोडलेल्या शिरोमणी अकाली दलाने व्यक्त केली.
शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) किंमत हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) ही तिन्ही विधेयके संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांमध्ये आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आली होती.
त्यापैकी दोन विधेयके वादग्रस्त ठरली असून, त्याला देशभरातील सुमारे 300 शेतकरी संघटना तसेच, काँग्रेससह 18 राजकीय पक्षांनी विरोध दर्शवला आहे.
या विधेयकांवर स्वाक्षरी न करता ती सरकारकडे परत पाठवावीत, अशी विनंती या पक्षांनी राष्ट्रपती कोिवद यांची भेट घेऊन केली होती.
15 शासकीय बँका आणि वित्तसंस्थांनी एकूण 349.25 कोटी रुपये ‘पीएम केअर्स फंडा’त जमा:
केंद्रीय शिक्षण संस्थांनीच नव्हे, तर बँकींग आणि वित्तसंस्थांनी ‘पीएम केअर्स फंड’ला भरघोस निधी दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
रिझव्र्ह बँक, सार्वजनिक क्षेत्रातील किमान सात बँका, अन्य सात वित्तीय संस्थांतील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून एकूण 204.75 कोटी रुपये ‘पीएम केअर्स फंड’मध्ये जमा करण्यात आल्याची माहिती.
भारतीय आयुर्विमा महामंडळ, सर्वसाधारण विमा महामंडळ आणि नॅशनल हाऊसिंग बँक यांनी सामाजिक दायित्व निधी आणि अन्य तरतुदींमधून स्वतंत्रपणे 144.5 कोटी रुपयांचे योगदान ‘पीएम केअर्स फंड’मध्ये दिले.
15 शासकीय बँका आणि वित्तसंस्थांनी एकूण 349.25 कोटी रुपये ‘पीएम केअर्स फंडा’त जमा केल्याचे स्पष्ट झाले आहे.
बिहारच्या निवडणुकीसाठी तगडा बंदोबस्त; केंद्रीय पोलिसांच्या 300 कंपन्या राहणार तैनात:
विविध कारणांसाठी यंदा चर्चेत असलेल्या बिहार विधानसभा निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी तगडा बंदोबस्त असणार आहे.
यासाठी सुरुवातीला केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 300 कंपन्या पाठवण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला आहेत.
याशिवाय लवकरच ITBP, CISF, CRPF, SSB, RPF and BSF च्या तुकड्याही पाठवण्यात येणार आहेत. तीन टप्प्यात या निवडणुका पार पडणार आहेत.
बिहारच्या 243 सदस्यीय विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने शुक्रवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.
राज्यात तीन टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान 28 ऑक्टोबर, दुसऱ्या टप्प्यातील 3 नोव्हेंबर तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. त्यानंतर 10 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
अझारेंका, हॅलेपची विजयी सलामी – फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा:
बेल्जियमचा डेव्हिड गॉफिन यंदाच्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पराभव स्वीकारणारा पहिलाच मानांकनप्राप्त खेळाडू ठरला.
महिलांमध्ये अग्रमानांकित रोमानियाची सिमोना हॅलेप आणि 10वी मानांकित बेलारुसची व्हिक्टोरिया अझारेंका यांनी विजयी सलामी दिली.
रविवारी स्पर्धेला सुरुवात झाल्यावर 11व्या मानांकित गॉफिनला 19 वर्षीय इटलीच्या जॅनिक सिनेरकडून 5-7, 0-6, 3-6 असा पराभव स्वीकारावा लागला.
याआधी सिनेरने गॉफिनवर फेब्रुवारीमध्ये रॉटरडॅम येथील स्पर्धेतही विजय मिळवला होता.
21वा मानांकित अमेरिकेच्या जॉन इस्नेरने फ्रान्सच्या एलियट बेन्शेट्रिटला 4-6, 6-1, 6-3 असे पराभूत केले.
दिनविशेष:
28 सप्टेंबर हा दिवस जागतिक रेबीज दिन, आंतरराष्ट्रीय जाणून घेण्याचा हक्क दिन तसेच आंतरराष्ट्रीय सुरक्षित गर्भपात दिन म्हणून पाळला जातो.
क्रांतिकारक भगत सिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 मध्ये झाला होता.
जगप्रसिद्ध पार्श्वगायिका लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 मध्ये झाला.
28 सप्टेंबर 1967 हा दिवस सुविख्यात क्रांतिकारक व थोर तपस्वी पांडुरंग महादेव उर्फ सेनापती बापट यांचा स्मृतीदिन आहे.
ऑलिम्पिकमध्ये वयक्तिक सुवर्णपदक मिळवणारे पहिले भारतीय अभिनव बिंद्रा यांचा जन्म 28 सप्टेंबर 1982 मध्ये झाला.
Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.