29 April 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (29 एप्रिल 2019)
1 मे पासून आर्थिक गोष्टींत होणार बदल :
- येत्या 1 मे 2019 पासून काही आर्थिक नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. त्याचा प्रभाव थेट आपल्या जीवनावर पडणार आहे.
- तसेच बदलण्यात येणाऱ्या नियमांमध्ये बँक, रेल्वे, विमानसेवा यांच्या संबंधित आर्थिक गोष्टींमध्ये बदल होणार आहेत.
- तर सरकारी आणि बिगर सरकारी संस्थांच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा व्हावी, यासाठी सातत्याने अशाप्रकारे नियमांमध्ये बदल करण्यात येतात.
- SBI : 1 मेपासून बँकेचे डिपॉझिट आणि कर्जाचे व्याजदर RBIच्या बेंचमार्क दराशी जोडले जाणार आहे. यामुळे ग्राहकांना आधीच्या व्याजाच्या तुलनेत बचत खात्यावर कमी व्याज मिळणार आहे. हा नियम 1 लाख रुपयांपेक्षा जास्त
जमा रक्कम आणि कर्जदरावर लागू आहे. - PNB : पंजाब नॅशनल बँक स्वतःचा डिजिटल वॉलेट PNB Kitty (पीएनबी किटी )ला 1 मेपासून बंद करणार आहे. त्यामुळे 1 मेपासून आपल्याला पीएनबी किटीऐवजी दुसऱ्या पर्यायी वॉलेटचा वापर करावा लागणार आहे. बँकेने
ग्राहकांना 30 एप्रिलपूर्वी वॉलेटमधील रक्कम खर्च करण्याविषयी सूचित केले होते. ही रक्कम खर्च न झाल्यास ‘आयएमपीएस’द्वारे बँकेच्या खात्यात वळते करून घेण्यासही सांगितले होते. त्यामुळे ज्या ग्राहकांनी अद्याप ‘पीएनबी
किट्टी’मधील रक्कम खर्च अथवा वळती केलेली नाही, त्यांना एक दिवसाचा अवधी आहे. - रेल्वे आरक्षण : 1 मेपासून ट्रेन प्रवासाचे आरक्षण (रिझर्व्हेशन) करताना आपण जे बोर्डिंग स्टेशन निवडले आहे, ते तिकीट आरक्षित झाल्यानंतरही बदलता येणार आहे. एक मेपासून चार्ट तयार होण्याच्या चार तास आधी प्रवाशांना
बोर्डिंग स्टेशन बदलण्याची संधी उपलब्ध होणार आहे. मात्र, बोर्डिंग स्टेशन बदलल्यानंतर तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना त्यावरचा रिफंड मिळणार नाही. - तिकीट रद्द केल्यास शुल्क नाही : 1 मेपासून एअर इंडियाच्या विमानाचे तिकीट 24 तासांचा आत रद्द केल्यास आपल्याला कोणतंही शुल्क द्यावं लागणार नाही.
- गॅस दर : 1 मेपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या नव्या किमती जारी होणार आहे. यावेळी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी 1 एप्रिलला घरगुती गॅसच्या किमतीमध्ये वाढ झाली होती.
पीएफवर मिळणाऱ्या व्याजदरात वाढ :
- केंद्र सरकारने 2018-19 या आर्थिक वर्षासाठी भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात वाढ करत कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर दिली आहे.
- तसेच आता कर्मचारी भविष्य निधीवर (ईपीएफ) चालू आर्थिक वर्षासाठी 8.61 टक्के इतके व्याज मिळणार आहे. तर याचा फायदा तब्बल 6 कोटी कर्मचाऱ्यांना होणार आहे.
- ‘ईपीएफओ’ने घेतलेल्या निर्णयाला केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आज हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आता पीएफवर 8.61 टक्के इतके व्याज मिळणार आहे.
- तर गेल्या आर्थिक वर्षामध्ये भविष्य निर्वाह निधीवर 8.55 टक्के व्याजदर होते आता 2018-19 मध्ये 0.10 टक्के वाढवून 8.61 टक्के करण्यात आला आहे.
प्रियंका चतुर्वेदी यांची उपनेतेपदी नियुक्ती :
- शिवसेनेत प्रियंका चतुर्वेदी यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- तसेच मागच्या आठवडयात प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता.
- तर पत्रकार परिषदेत असभ्य वर्तन केल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आलेल्या आठ पदाधिकाऱ्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घेण्याचा निर्णय प्रियंका चतुर्वेदी यांना पटला नव्हता.
भारतीय चलन व्यवस्थेमध्ये लवकरच 20 रुपयाची नवी नोट दाखल :
- भारतीय चलन व्यवस्थेमध्ये लवकरच 20 रुपयाची नवी नोट दाखल होणार आहे.
- रिझव्र्ह बँकेकडून लवकरच नवीन वैशिष्टय़े आणि रंगातील 20 रुपयांची नोट चलनात आणली जाणार आहे.
- गेल्या दोन-तीन वर्षांत मध्यवर्ती बँकेने 500 आणि 2000 रुपयांच्या नवीन नोटांसह 200 रुपये, 100 रुपये, 50 रुपये आणि 10 रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्या आहेत. त्याच्याबरोबर आता लवकरच 20 रुपयाची नवी नोटदेखील
चलनात येणार आहे. - तर 20 रुपयाच्या नव्या नोटेचा रंग हा हिरव्या आणि पिळव्या रंगाच्या मिश्रणातील रंग (हिरवट पिवळा) असेल. या नोटेवर RBI चे विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांची स्वाक्षरी असणार आहे. या नोटेच्या मागील बाजूस भारताचा
सांस्कृतिक ठेवा असलेल्या वेल्लोरा लेणींचे चित्र असणार आहे. तसेच अधिकृत नोट ओळखता यावी यासाठी काही विशिष्ट चिन्हांचा आणि खुणांचा वापर या नोटेवर करण्यात आला आहे.
दिनविशेष :
- 29 एप्रिल : आंतरराष्ट्रीय नृत्य दिन
- 29 एप्रिल 1945 दुसरे महायुद्ध इटलीतील जर्मन सैन्याने दोस्त राष्ट्रांपुढे बिनशर्त शरणागती पत्करली.
- 29 एप्रिल 1986 मध्ये लॉस एंजेल्स लाईब्ररीतील आग लागल्यामुळे सुमारे 4,00,000 पुस्तके नष्ट झाले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा