29 August 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

29 August 2019 Current Affairs In Marathi

29 August 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (29 ऑगस्ट 2019)

काश्मीरमधील प्रश्नांवर केंद्राकडून मंत्रिगटाची स्थापना :

  • जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द करून त्याचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर निर्माण झालेल्या आर्थिक व सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी सरकारने एका मंत्रिगटाची स्थापना केली आहे.
  • तर या मंत्रिगटात कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद, सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री थावर चंद गेहलोत, कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर, पंतप्रधान कार्यालयातील मंत्री जितेंद्र सिंह व पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांचा समावेश आहे.
  • तसेच हा मंत्रिगट कलम 370 रद्द केल्यानंतर निर्माण झालेल्या आर्थिक व सामाजिक स्थितीवर अभ्यास करणार असून त्याची पहिली बैठक ही सप्टेंबरच्या पहिल्या आठवडयात होणार आहे.
  • कलम 370 रद्द करून सरकारने संसदेत जम्मू काश्मीर फेररचना कायदा 2019 मंजूर केला असून त्यानुसार जम्मू व काश्मीर तसेच लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश 31 ऑक्टोबरपासून अस्तित्वात येत आहेत.
  • तर मंगळवारी जम्मू काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन करण्याच्या प्रक्रियेवर एकूण पंधरा केंद्रीय मंत्रालये व विभागांची बैठक झाली. त्यात राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्याबाबतही चर्चा झाली. जम्मू काश्मीरमध्ये
    केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी करून तेथील परिस्थिती पुन्हा सुरळित करण्यावर भर देण्यात आल्याचे गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (28 ऑगस्ट 2019)

देशभरात 75 नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरू होणार

  • केंद्र सरकारने देशभरात 75 नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. झालेल्या कॅबिनेट बैठकीत यास मंजूरी देण्यात आली आहे.
  • केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेट बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली.
  • तर या वैद्यकीय महाविद्यालयांची 2021-22 पर्यंत उभारणी होणार असून, ज्या ठिकाणी अशी महाविद्यालये नाहीत अशा ठिकाणी ही महाविद्यालये सुरू केली जाणार आहेत.
  • तसेच यावेळी केंद्रीयमंत्री जावडेकर यांनी सांगितले की, नव्या वैद्यकीय महाविद्यालयांसाठी 24 हजार 375 कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. यामध्ये एमबीबीएसच्या 15 हजार 700 जागा असणार आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील हा सर्वात मोठी विस्तार आहे.

आता व्हॉट्सअॅपवरून करता येणार उबरची तक्रार :

  • अॅपद्वारे टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपनी उबेरने देशात 24 तास हेल्पलाइन सुरू केली आहे. कंपनीने याबाबत माहिती दिली.
  • तर या हेल्पलाइन क्रमांकावर प्रवासी कोणत्याही वेळी प्रवासादरम्यान, गाडी खराब झाल्यास, ड्रायव्हरसोबत वाद झाल्यास किंवा अन्य कोणत्याही प्रश्नांसाठी फोन करू शकतील.
  • तसेच यापूर्वी कंपनीच्या हेल्पलाइन सुविधेत केवळ मेसेज करण्याची मुभा होती. परंतु आता प्रवासी व्हॉट्सअॅपद्वारे फोन करून मदत घेऊ शकणार आहेत.
  • उबेरच्या अॅपमध्ये असलेली ही सुविधा थेट प्रवाशांना कंपनीच्या सुरक्षा टीमसोबत बोलण्याची मुभा देणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. तसेच सुरक्षा मानकांनुसार पूर्वीपासूनच अॅपमध्ये एसओएस बटन देण्यात आले असल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले. याच्या सहाय्याने आपात्कालिन परिस्थितीत तात्काळ पोलिसांशी जोडले जाऊ शकतो.
  • दरम्यान, मार्च महिन्यापासून या हेल्पलाइन फिचरचा वापर चंडीगढमध्ये सुरू करण्यात आला होता. आता कंपनीने आपले परिचालन असलेल्या सर्व 40 शहरांमध्ये हे फिचर उपलब्ध करून दिले आहे.
  • अमेरिका आणि कॅनडामध्ये कंपनी ही सुविधा पूर्वीपासूनच देत आहे. भारतात सुरूवातीला ही सुविधा इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये उपलब्ध असेल. परंतु उबर लाइटवर ही सेवा उपलब्ध नसेल. उबरच्या सर्व ग्राहकांना या सुविधेचा वापर करता येणार आहे.

चंद्राच्या जवळ पोहोचले चांद्रयान – 2 :

  • भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने चांद्रयान-2 ला चंद्राभोवतीच्या नव्या कक्षेत स्थापित केले. ठरल्याप्रमाणे सकाळी 9 वाजून 4 मिनिटांनी सुरु झालेली चांद्रयान-2 ची कक्षा बदलाची ही प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. तसेच आता चांद्रयान-2 चा कक्षा बदलाचा पुढचा टप्पा 30 ऑगस्टला होणार आहे. 30 ऑगस्ट आणि त्यानंतर एक सप्टेंबर आणखी दोन वेळा चांद्रयान-2 ची कक्षा बदलली जाणार आहे.
  • कक्षा बदलाच्या या प्रक्रियेतंर्गत चांद्रयान-2 ला चंद्राच्या जवळ नेले जात आहे. 20 ऑगस्टला इस्रोने 29 मिनिटांचे ऑपरेशन केले. त्यामध्ये चांद्रयान-2 ने पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला.
  • तर दोन सप्टेंबरला विक्रम लँडर चांद्रयान-2 पासून वेगळे होईल. सात सप्टेंबरला रात्री 1.55 मिनिटांनी विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. त्यानंतर खऱ्या अर्थाने भारताच्या चंद्रावरील शोधकार्याला सुरुवात होईल. भारतासाठी ही
    अत्यंत महत्वकांक्षी मोहिम आहे. चंद्राच्या कक्षेत पोहोचलेले चांद्रयान-2 चंद्राचे वेगवेगळे फोटो पाठवत आहे.

राष्ट्रीय आंतरराज्य अ‍ॅथलेटिक्स स्पर्धात अरपिंदर सिंगला सुवर्णपदक :

  • आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा भारताचा तिहेरी उडीपटू अरपिंदर सिंग याने 59व्या राष्ट्रीय आंतरराज्य अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. पण जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठीचे पात्रता निकष पार करण्यात तो अपयशी ठरला.
  • तर अरपिंदरने या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी करत 16.83 मीटर इतकी उडी मारली. मात्र पीएसी स्टेडियमवरील अतिउष्ण आणि दमट वातावरणात तो जागतिक स्पर्धेचा 16.95 मीटरचा पात्रता निकष पार करण्यासाठी 12 सेंमी इतका कमी पडला.
  • तसेच कर्नाटकच्या यू. कार्तिक आणि तामिळनाडूच्या मोहम्मद सलाहुद्दीन यांनी अनुक्रमे 16.80 मीटर आणि 16.79 मीटर इतकी कामगिरी करत अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक पटकावले.

दिनविशेष :

  • 29 ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय परमाणु चाचणी विरोधी दिन तसेच भारतीय क्रीडा दिन आणि तेलगु भाषा दिन आहे.
  • सन 1831 मध्ये मायकेल फॅरेडे याने विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध लावला.
  • भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी झाला होता.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृव्ताखाली 29 ऑगस्ट 1947 रोजी घटना समिती स्थापन झाली.
  • चौधरी चरणसिंग यांनी भारतीय लोक दल या राजकीय पक्षाची स्थापना 29 ऑगस्ट 1974 मध्ये केली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (30 ऑगस्ट 2019)

You might also like
1 Comment
  1. Rajesh Bandoba kumbhar says

    contract Job B.com job store account

Leave A Reply

Your email address will not be published.