29 डिसेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs
29 December 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (29 डिसेंबर 2022)
लोकायुक्त विधेयक विधानसभेत चर्चेविना मंजूर :
- भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी केंद्रातील लोकपालाच्या धर्तीवर लोकायुक्त कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधानसभेत चर्चेविना मंजूर करण्यात आले.
- मंत्र्यांना पाठिशी घालण्यात येत असल्याचा आरोप करीत विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी लोकायुक्त कायद्याचे विधेयक चर्चेविना मंजूर केले.
- केंद्र सरकारने लोकपाल कायदा तयार केल्यानंतर राज्य सरकारांनी त्याच धर्तीवर एक वर्षांत लोकायुक्त कायदा तयार करावा, अशी अपेक्षा होती.
- मात्र, राज्यात आजवर तसा कायदा झाला नव्हता.
- पूर्वीच्या लोकायुक्त कायद्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाचा समावेश नव्हता.
- त्यामुळे विशेष बाब म्हणून लोकायुक्तांना एखादी चौकशी करता यायची आणि त्यासंदर्भात कारवाईची शिफारस करण्याचे केवळ अधिकार होते.
- नव्या कायद्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यालाही लोकायुक्तांच्या अंतर्गत आणले आहे.
Must Read (नक्की वाचा):
मुंबई इंडियन्सने नवीन सहाय्यक फलंदाजी प्रशिक्षकाला केले नियुक्त :
- इंडियन प्रीमियर लीगच्या सर्वात यशस्वी फ्रँचायझी म्हणून मुंबई इंडियन्सला ओळखले जाते.
- मुंबई इंडियन्सने नवीन सहाय्यक फलंदाजी प्रशिक्षकाची नियुक्ती केली आहे.
- अनुभवी अरुणकुमार जगदीश यांची नवीन सहाय्यक फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- जगदीश यांना 16 वर्षे भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याव्यतिरिक्त कोचिंगचा मोठा अनुभव आहे.
- अरुणकुमार जगदीश यांना त्यांच्या काळात उजव्या हाताचा एक फलंदाज म्हणून ओळखले जायचे.
- त्यांनी 1993 ते 2008 पर्यंत म्हणजे 16 वर्षे भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटकचे प्रतिनिधित्व केले आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा न्यूझीलंडचा ठरला तिसरा गोलंदाज :
- पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम साऊदीने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 350 विकेट्स पूर्ण केल्या आहेत.
- कसोटी क्रिकेटमध्ये 350 विकेट्स घेणारा साऊथी न्यूझीलंडचा तिसरा गोलंदाज ठरला आहे.
- हे करत साऊथीने रिचर्ड हेडली आणि डॅनियल व्हिटोरी यांच्या विक्रमांची बरोबरी केली आहे.
- हॅडलीने त्याच्या कसोटी कारकिर्दीत 431 विकेट घेतल्या आहेत, जो न्यूझीलंडसाठी कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.
- तर फिरकीपटू डॅनियल व्हिटोरीने कसोटीत 361 विकेट्स घेतल्या आहेत.
दिनविशेष:
- काँग्रेसचे पहिले अध्यक्ष ‘व्योमकेशचंद्र बॅनर्जी‘ यांचा जन्म 29 डिसेंबर 1844 मध्ये झाला होता.
- मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा जन्म 29 डिसेंबर 1900 मध्ये झाला होता.
- प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक ‘रामानंद सागर‘ यांचा जन्म 29 डिसेंबर 1917 रोजी झाला होता.
- सन 1930 मध्ये सर मुहम्मद इकबाल यांनी दोन राष्ट्र सिद्धांत तसेच पाकिस्तानच्या निर्मितीचा दृष्टीकोन मांडला होता.
- सन 1959 मध्ये नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड फाइनमॅन यांनी CALTECH येथे There is plenty of room at the bottom हे प्रसिद्ध भाषण दिले. ही Nanotechnology ची सुरुवात मानली जाते.