29 July 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (29 जुलै 2018)
प्लास्टिक, थर्माकोल खाणाऱ्या अळ्यांचा शोध :
- प्लास्टिक आणि थर्माकोल खाणाऱ्या अळ्यांची पैदास पुण्यातील एका संशोधकाने केली आहे.
- त्यामुळे पुढील काळात प्लास्टिक विघटनाची चिंता पूर्णपणे नष्ट होण्याची शक्यता आहे.
- तर मेणअळी किंवा अगदी घराच्या धान्यात होणाऱ्या पाखरांच्या अळ्याही प्लास्टिक खातात.
- त्यापूर्वीच गेल्या तीन वर्षांपासून डॉ. राहुल मराठे यांनी या अळ्यांची जवळपास बारावी पिढी प्लास्टिकच्या खुराकावर जोपासली आहे.
- ह्या अळ्या प्लास्टिकमधील पॉलिमर हा घटक खाऊन पचवतात. प्लास्टिकच्या एका पिशवीचे विघटन होण्यासाठी 10
- वर्षे लागतात तिथे साधारण 50 अळ्या एक पिशवी चार दिवसांत नष्ट करतात. तर अळ्यांची विष्ठा ही खत म्हणून वापरता येते.
मेल-एक्स्प्रेस प्रवाशांसाठीही आता कागदविरहीत तिकीट :
- मध्य व पश्चिम रेल्वेवरील लोकल प्रवाशांसाठी कागदविरहीत (पेपरलेस) तिकीट सुविधा उपलब्ध केल्यानंतर आता मेल-
- एक्स्प्रेस गाडय़ांच्या प्रवाशांसाठीदेखील ही सुविधा लवकरच उपलब्ध केली जाणार आहे.
- यावर रेल्वेच्या क्रिस संस्थेकडून (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम) चाचणी सुरू आहे.
- तिकिटांच्या रांगेतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी रेल्वेच्या ‘क्रिस’ने मोबाईल तिकिटाची संकल्पना आणली.
- 2015 मध्ये प्रथम कागदविरहीत (पेपरलेस) तिकीट सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध केली गेली.
मराठा आरक्षणावर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन :
- मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अहवाल मिळताच, आरक्षणाच्या कायद्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्यात येणार आहे.
- आरक्षणासाठीच्या आंदोलनात हिंसाचार न करणा-या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची घोषणा बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
- तसेच मराठा समाजासाठीची पदे रिकामी ठेवूनच राज्य सरकार मेगा भरती करणार आहे.
हिमा व नीरज यांची काँटिनेंटल चषक स्पर्धेसाठी निवड :
- हिमा व नीरज यांच्यासह भारताच्या सात खेळाडू 8 व 9 सप्टेंबरला होणा-या काँटिनेंटल चषक स्पर्धेत सहभाग घेणारआहेत.
- चेक प्रजासत्ताक येथील ओस्ट्राव्हा येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
- आशियाई अॅथलेटिक्स असोसिएशनने या स्पर्धेत आशिया-पॅसिफिक संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी भारताच्या सात खेळाडूंची निवड केली.
- तसेच या स्पर्धेत प्रत्येक विभागीय असोसिएशनमधील क्रमावारीतील आघाडीच्या खेळाडूंना सहभाग घेण्याची संधी मिळते.
- आंतरराष्ट्रीय महासंघाच्या क्रमवारीनुसार नीरज (भालाफेक), मोहम्मद अनास ( 400 मी.), जिंसन जॉन्सन (800मी.) आणि अरपिंदर सिंग (तिहेरी उडी) यांनी पुरूष विभागात, तर
- महिलांमध्ये हिमा दास (400 मी.), पी. यू. चित्रा (1500मी.) आणि सुधा सिंग (3000 मी. स्टीपलचेस) यांनी स्थान पटकावले आहे.
दिनविशेष :
- 29 जुलै 1852 मध्ये पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांच्या हस्ते विश्रामबाग वाड्यात स्त्रीशिक्षणाचे भारतीय उद्गाते म्हणून जोतिबा फुले यांचा सन्मान करण्यात आला.
- जगातील पहिली हवाई टपाल सेवा अमेरिकेतील न्यूयॉर्क ते सॅन फ्रान्सिस्को या शहरांदरम्यान 29 जुलै 1920 मध्ये सुरू झाली.
- टाटा एअरलाइन्सचे एअर इंडिया 29 जुलै 1946 मध्ये असे नामकरण झाले.
- 29 जुलै 1957 मध्ये इंटरनॅशनल अॅटॉमिक एनर्जी एजन्सीची स्थापना झाली.
- भारत-श्रीलंका शांतता करारावर 29 जुलै 1987 मध्ये सह्या करण्यात आल्या.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा