Current Affairs (चालू घडामोडी)

29 June 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

29 June 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (29 जून 2019)

देशात सर्वाधिक साडेतीन हजार स्टार्टअप महाराष्ट्रात :

  • ‘स्टार्टअप इंडिया’ योजनेंतर्गत गेल्या चार वर्षात देशभरात 19 हजार 351 स्टार्टअप उद्योगांची नोंदणी झाली असून सर्वाधिक 3 हजार 661 स्टार्टअप उद्योगांची नोंदणी एकट्या महाराष्ट्रात झाली आहे.
  • तसेच या योजनेंतर्गत देशातील राज्यांमध्ये स्टार्टअप उद्योगात झालेल्या वैकल्पिक गुंतवणुकीतही महाराष्ट्राने आघाडी घेत देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे.
  • तर राज्यात एकूण 68 स्टार्टअप मध्ये 440 कोटी 38 लाखांची वैकल्पिक गुंतवणूक झाली आहे.
  • केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्रालयाच्यावतीने 16 जानेवारी 2016 पासून देशभरात ‘स्टार्टअप इंडिया’ योजनेची अंमलबजावणी सुरु झाली.
  • तर एकूण 19 कृती आराखड्यानुसार सुरु असलेल्या या कार्यक्रमावर देखरेख ठेवणाऱ्या केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग व देशांतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (डीपीआयआयटी) 24 जून रोजी राज्यनिहाय स्टार्टअप उद्योगांची
  • यादी जाहीर केली आहे. या यादीत देशातील 29 राज्ये आणि 7 केंद्र शासीत प्रदेशांची आकडेवारी जाहीर करण्यात आली असून 3 हजार 661 स्टार्टअप उद्योगांसह महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. या यादीत महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक 2
    हजार 847, दिल्ली 2 हजार 552, उत्तरप्रदेश 1 हजार 566 तर 1 हजार 80 स्टार्टअपसह तेलंगण पाचव्या स्थानावर आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (28 जून 2019)

जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढवला :

  • जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवटीचा कार्यकाळ सहा महिन्यांसाठी वाढवण्याच्या प्रस्तावास लोकसभेत मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता 3 जुलै पासून जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होणार आहे. संसदेत गृहमंत्री अमित शहा यांनी यासाठी सादर केलेल्या प्रस्तावावर मोठा वाद झाल मात्र अखेरीस हा प्रस्ताव मान्य झाला.
  • तसेच या अगोदर राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढवण्यासाठी आग्रह करत गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले होते की, जम्मू-काश्मीरमध्ये स्वातंत्र्य अबाधित रहावे ही भाजपाची मुख्य भूमिका आहे, याकडे सरकार जरादेखील दुर्लक्ष
    करणार नाही. सरकार त्या ठिकाणी शांतात व सुव्यवस्थेचे शासन कायम राखण्यात व दहशतवादाची पाळंमुळं उखडून टाकण्यासाठी सदैव बांधिल आहे.
  • तर लोकसभेत शहा यांनी दोन प्रस्ताव मांडले ज्यातील एक राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढवण्याचा तर दुसरा जम्मू-काश्मीरमध्ये घटनेच्या कलम 5 व 9 प्रमाणे आरक्षणाची जी तरतूद आहे, त्यात देखील अभ्यास करून आणखी काही भाग जोडण्याचे म्हटले आहे.

रेशनचे नियम बदलणार; कोणत्याही रेशनिंग दुकानातून धान्य मिळणार :

  • केंद्र सरकारने देशवासीयांसाठी एक खुशखबर आणली आहे. देशातील रेशनचे नियम लवकरच बदलणार आहेत. केंद्र सरकार एक देश एक रेशन कार्ड ही योजना राबवण्याच्या तयारीत आहे. यामुळे भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मदत
    मिळणार आहे. याव्यतिरिक्त कामानिमित्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणाऱ्या लोकांना सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाचाही लाभ घेता येणार आहे.
  • केंद्रीय अन्न आणि नागरीपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्या अध्यक्षतेखाली अन्न विभागातील सचिवांची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी ‘एक देश एक रेशन कार्ड’ ही योजना त्वरित लागू करण्याचे आदेश दिले. याचा
    कामानिमित्त अन्य ठिकाणी प्रवास करणाऱ्या गरीबांनाही याचा फायदा होणार असून येत्या वर्षभरात याबाबत कार्यवाही पूर्ण करण्याचे ध्येय ठरवण्यात आले आहे.
  • तसेच या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सर्व दुकानांमध्ये पीओएस (पॉइंट ऑफ सेल) मशीन्सची उपलब्धता तपासणे आवश्यक आहे. आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात, झारखंड, केरळ, राजस्थान आणि त्रिपुरातील पीडीएस दुकानांमध्ये ही मशीन उपलब्ध आहेत. या योजनेचा लाभ सर्वत्र पोहोचवण्यासाठी या मशीनची 100 टक्के उपलब्धता आवश्यक असल्याची माहिती, पासवान यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना दिली.

1 जुलैपासून ‘या’ स्मार्टफोन्सवर चालणार नाही WhatsApp :

  • व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. व्हॉट्सअ‍ॅपही आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. मात्र व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी एक बॅड न्यूज आहे. 1 जुलैपासून काही स्मार्टफोनवरील व्हॉट्सअ‍ॅप बंद होणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या अपडेटेड एफएक्यूनुसार, इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप फेब्रुवारी 2020 नंतर Android आणि iPhone मध्ये व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही. ब्लॉगमध्ये अनेक गोष्टींची माहिती देण्यात आली आहे.
  • 1 जुलै 2019 पासून Windows Store मधून व्हॉट्सअ‍ॅप हटवले जाणार आहे. स्टॅटकाऊंटरच्या रिपोर्टनुसार जगभरात फक्त 0.24 टक्के लोक विंडो ऑपरेटिंग सिस्टमचा वापर करत आहेत.
  • तसेच 31 डिसेंबर 2019 नंतर विंडोज फोनमधून व्हॉट्सअ‍ॅप बंद केलं जाणार आहे. कंपनीने आपलं सपोर्ट पेज FAQ वर Android व्हर्जन 2.3.7 आणि त्याआधी ऑपरेटींग सिस्टमवर काम करणार नसल्याचं सांगितलं आहे. 1 फेब्रुवारी 2020 नंतर iOS 7 आणि ऑपरेटिंग सिस्टम (OS) वर असलेल्या आयफोन (iPhone) व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही.

दिनविशेष :

  • सन 1870 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने कामगार संघटनांना परवानगी देणारा कायदा केला.
  • मराठी नाटककार, विनोदकार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्म 29 जून 1871 मध्ये झाला.
  • ज्येष्ठशास्त्रज्ञ कृष्ण दामोदर अभ्यंकर यांना सन 2001 या वर्षी एम.पी. बिर्ला पुरस्कार जाहीर.
  • पं.हृदयनाथ मंगेशकर यांना सन 2001 या वर्षी नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार जाहीर.
  • सन 2007 मध्ये ऍपल ने आपला पहिला मोबाईल फोन, आयफोन प्रकाशित केला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (30 जून 2019)

Sonali Borade

With Sonali's thorough backing of education in online journalism and a strong affinity to foster proper guidance, she is looking forward to engaging readers on smart education subjects. She covers articles related to all upcoming exam schedules and is much sought after due to his crisp style of writing. Sonali strongly believes that education is the future and evokes this interest in the readers.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago