29 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
29 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (29 जून 2020)
सीडीसी या संस्थेने करोनाची आणखी तीन नवीन लक्षणे जाहीर केली:
अमेरिकेतील सेंटर्स फॉर डिसिजेस कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन म्हणजे सीडीसी या संस्थेने करोनाची आणखी तीन नवीन लक्षणे जाहीर केली आहेत.
त्यामुळे आता एकूण लक्षणांची संख्या बारा झाली आहे. नव्या लक्षणात नाक गळणे, अतिसार, मळमळ यांचा समावेश आहे.
या आधीच्या लक्षणात ताप, अंगाला थंडी वाजून येणे, कफ, श्वास घेण्यात अडचणी, थकवा, स्नायू किंवा अंगदुखी, डोकेदुखी, वास व चव संवेदना जाणे,घसा खवखवणे यांचा समावेश होता.
2-14 दिवसांत करोनाची लक्षणे दिसतात. त्यात सार्स सीओव्ही 2 विषाणू कारण असतो.
सुरुवातीला श्वासात अडचणी, ताप व कफ ही तीन लक्षणे देण्यात आली होती नंतर त्यात थंडी वाजणे, स्नायुदुखी, डोकेदुखी, घसा धरणे या लक्षणांची भर पडली.
आता करोना रुग्णांची संख्या 1कोटीच्या दिशेने असून 4,99,000 बळी गेले आहेत.
भारतात रविवारी 19 हजार 700 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दुसऱ्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे.
याआधी शनिवारी सर्वाधिक 20 हजार 060 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती.
महत्त्वाचं म्हणजे, फक्त गेल्या सहा दिवसांत एक लाख 10 हजार रुग्णांची नोद झाली आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या पाच लाख 28 हजार 859 वर पोहोचली आहे.
महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली आणि तेलंगणनंतर एका दिवसात एका हजाराहून जास्त रुग्णांची नोंद होणारं कर्नाटक चौथं राज्य ठरलं आहे.
लोक घरीच कोरोनाची चाचणी करू शकतील:
कोविड 19 चाचण्यांसाठी घरगुती वापराचे चाचणी संच लवकरच प्रत्यक्षात येणार असून दिल्लीची भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) व पुण्याची राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) या दोन संस्था पर्यायी चाचणी पद्धत शोधण्याच्या प्रयत्नात आहेत.
लोक घरीच ही चाचणी करू शकतील व लगेच त्याचा निकालही त्यांना मिळेल.
औद्योगिक व वैज्ञानिक संशोधन परिषद म्हणजे सीएसआयआरच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून त्याला मायक्रोसॉफ्ट इंडिया या संस्थेने आर्थिक मदत दिली आहे.
या प्रयोगात सहभागी वैज्ञानिकांनी कोविड विरोधात एलायझा (एन्झाइम लिंकड इम्युनोअॅसे) यावर आधारित चाचणी विकसित केली आहे.
दिनविशेष:
सन 1870 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने कामगार संघटनांना परवानगी देणारा कायदा केला.
मराठी नाटककार, विनोदकार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्म 29 जून 1871 मध्ये झाला.
ज्येष्ठशास्त्रज्ञ कृष्ण दामोदर अभ्यंकर यांना सन 2001 या वर्षी एम.पी. बिर्ला पुरस्कार जाहीर.
पं.हृदयनाथ मंगेशकर यांना सन 2001 या वर्षी नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार जाहीर.
सन 2007 मध्ये ऍपल ने आपला पहिला मोबाईल फोन, आयफोन प्रकाशित केला.
Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.