29 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

पीएम-केअर्स
पीएम-केअर्स

27 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (29 मार्च 2020)

व्हेंटिलेटर्स संबंधी डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा :

  • करोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचार करताना व्हेंटिलेटर्सची गरज निर्माण होत आहे. त्यामुळे जगभरातून व्हेंटिलेटर्सना मोठया प्रमाणावर मागणी आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेंटिलेटर्ससंबंधी महत्वाची घोषणा केली आहे.
  • तर करोना व्हायरसविरोधातील लढयात आमच्या मित्र देशांना व्हेंटिलेटर्सची गरज असेल, तर तो पुरवठा करण्यास
    आम्ही तयार आहोत असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
  • अमेरिकेतच करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. या रुग्णांवर उपचारांसाठी अमेरिकेत
    व्हेंटिलेटर्स आणि अन्य वैद्यकीय साहित्याच्या उत्पादनांचा वेग वाढवण्यात आला आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (28 मार्च 2020)

करोनाला झुंजवणाऱ्या चार प्रतिकारक पेशींचा शोध :

  • करोना विषाणूला मानवी शरीरातील प्रतिकारशक्ती प्रणाली कशा प्रकारे प्रतिसाद देते याचा अभ्यास ऑस्ट्रेलियातील
    वैज्ञानिकांनी केला असून त्यांच्या मते लहान मुलातील प्रतिसाद यात सर्वात प्रखर असतो व वृद्धांमधील प्रतिसाद सर्वात
    क्षीण असतो.
  • तर करोना विषाणूचा मानवी शरीर नैसर्गिक पातळीवर प्रतिकार करताना प्रतिपंड तयार होत असतात त्यांचा अभ्यास
    केल्याने आता या विषाणूवर औषध शोधणे सोपे जाणार आहे.
  • करोनाची लागण झालेल्या रुग्णांचा अभ्यास ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी केला असून त्यात रक्ताच्या नमुन्यांची
    चाचणी घेण्यात आली. ‘नेचर मेडिसिन’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले असून त्यात म्हटले आहे की,
    प्रथमच करोनाला मानवी प्रतिकारशक्तीकडून दिला जाणारा प्रतिसाद नोंदला गेला आहे.

मोदींकडून ‘पीएम-केअर्स’ निधीची स्थापना :

  • करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि बाधित रुग्णांच्या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पंतप्रधान
    सहाय्यता आणि आपत्कालिन स्थिती मदत निधी’ची (पीएम-केअर्स) स्थापना केली आहे. सर्व क्षेत्रातील लोकांना या
    निधीमध्ये आपली मदत पाठवता येणार आहे.
  • तर पंतप्रधान या निधीबाबत माहिती देताना म्हणाले, हा निधी स्वस्थ भारत घडवण्यासाठी मोठा मार्ग तयार करेल
    तसेच सर्व क्षेत्रातील लोक या निधीमध्ये दान करु शकतात. माझं सर्व भारतीयांना आवाहन आहे की, त्यांनी
    पीएम-केअर्स निधीत योगदान द्यावे. या निधीद्वारे यापुढे येणाऱ्या अशा प्रकारच्या संकटांचा सामना करण्यासाठी मदत होईल.
  • दरम्यान, मोदींच्या या आवाहनाचा परिणामही दिसायला सुरुवात झाली आहे. भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस)
    असोसिएशनने करोनाशी लढण्यासाठी सुरुवातीलाच पीएम-केअर्स फंडला 21 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

पाच मिनिटात मिळणार करोना टेस्टचा रिपोर्ट :

  • करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी या आजाराच्या चाचण्या वेगवान गतीने होणे आवश्यक आहे. त्यासाठीच
    अमेरिकेतील एका प्रयोशशाळेने करोना व्हायरसच्या चाचणीसाठी एक मशीन बनवले आहे.
  • तर नमुने चाचणीसाठी घेतल्यानंतर ही मशीन अवघ्या पाच मिनिटात रुग्ण करोना पॉझिटिव्ह असेल तर तसा रिपोर्ट
    देते. ही मशीन बनवणाऱ्या प्रयोगशाळेने हा दावा केला आहे.
  • अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने इमर्जन्सीमध्ये मंजुरी दिल्याचे अबॉट लॅबोरेटरीजने म्हटले आहे. छोटया
    टोस्टरच्या आकाराचे हे मशीन आहे. मॉलीक्युलर टेक्नोलॉजीचा त्यामध्ये वापर करण्यात आला आहे.

दिनविशेष:

  • सन 1849 मध्ये ब्रिटिश साम्राज्याने पंजाब ताब्यात घेतले होते.
  • अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक ‘पाडुरंग लक्ष्मण‘ तथा ‘बाळ गाडगीळ‘ यांचा जन्म 29 मार्च 1926 मध्ये झाला
    होता.
  • 1968 या वर्षी महात्मा फुले कृषी विद्यापीठाची (MPKV) राहुरी येथे स्थापना झाली.
  • सन 1982 मध्ये एन.टी. रामाराव यांनी तेलगू देसम या पक्षाची स्थापना केली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.