29 May 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
29 May 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (29 मे 2019)
टेक्नॉलॉजीसह घातक मिग-35 भारताला द्यायला तयार :
- अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिन प्रमाणे रशियाच्या मिग कॉर्पोरेशननेही भारताला अत्याधुनिक मिग-35 विमाने देण्याची तयारी दर्शवली आहे.
- भारताकडून फायटर विमानांचे कंत्राट मिळवण्यासाठी स्पर्धेत असलेल्या चार ते पाच परदेशी कंपन्यांमध्ये मिग कॉर्पोरेशनही आहे.
- रोसोबोरोनेक्सपोर्टच्या माध्यमातून मिग कॉर्पोरेशन फायटर विमान पुरवठयाचे कंत्राट मिळवण्यासाठी निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहे.
- भारताच्या मेक इन इंडिया धोरणाशी सुसंगत मिग-35 फायटर विमानांची निर्मिती करण्याची तयारी मिग कॉर्पोरेशनने दाखवली आहे.
- मिग-35 मध्ये हे नवीन अत्याधुनिक विमान असून त्यामध्ये सर्व प्रकारचे तंत्रज्ञान आहे. पाचव्या पिढीच्या फायटर विमानाचे तंत्रज्ञान यामध्ये आहे.
Must Read (नक्की वाचा):
शिक्षकांना मराठी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक :
- पालिका शाळेतील अमराठी शिक्षकांनाही आता मराठी भाषेची परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे. अन्यथा त्यांचे वेतन कापण्यात येणार आहे.
- शासनाच्या निर्णयानुसार पालिकेच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना एमएस-सीआयटी परीक्षा पास होणेही आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
- खासगी विनाअनुदानित प्राथमिक शाळांतील शिक्षक-कर्मचाऱ्यांना एमएस-सीआयटी आणि अमराठी शिक्षकांना मराठी परीक्षा उत्तीर्ण होण्याबाबत सूचित करणारे परिपत्रक काढणे अपेक्षित होते.
- मात्र लेखा विभागाकडून कर्मचार्याच्या वेतनात त्रुटी काढून वेतनातून वसुली करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आल्याचा आरोप माजी नगरसेवक के. पी. नाईक यांनी केला आहे.
कोपा अमेरिका फुटबॉल ब्राझीलच्या कर्णधारपदी एल्वेस :
- ब्राझीलने कोपा अमेरिका कप स्पर्धेसाठी स्टार फुटबॉलपटू नेमारच्या स्थानी दानी एल्वेसची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे.
- ब्राझील फुटबॉल महासंघाने (सीबीएफ) सोमवारी ही घोषणा केली.
- सीबीएफने म्हटले की,’प्रशिक्षक टीटे यांनी या निर्णयाबाबत नेमारला सूचना दिलेली आहे.’ आठवेळा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या ब्राझील संघाला 14 जूनपासून प्रारंभ होत असलेल्या स्पर्धेत बोलविया, वेनेझुला व पेरु यांच्यासह एका गटात स्थान मिळाले आहे.
- ब्राझील संघ त्याआधी, कतार व होंडुरास या संघाविरुद्ध सराव सामने खेळेल.
दिनविशेष :
- 29 मे : जागतिक पचन स्वास्थ्य दिन
- पीटर (दुसरा) रशियाचा झार 29 मे 1727 मध्ये बनला.
- 29 मे 1848 मध्ये विस्कॉन्सिन अमेरिकेचे 30 वे राज्य झाले.
- 29 मे 1906 रोजी भारतीय-इंग्लिश लेखक टी.एच. व्हाईट यांचा जन्म झाला.
- एव्हरेस्टवीर शेर्पा तेनसिंग नोर्गे यांचा जन्म 29 मे 1914 रोजी झाला.
- अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या सामान्य सापेक्षता सिद्धांताची चाचणी 29 मे 1919 रोजी घेण्यात आली.
- 29 मे 1987 हा दिवस भारताचे 5वे पंतप्रधान ‘चौधरी चरणसिंग‘ यांचा स्मृतीदिन आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा