29 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
29 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (29 मे 2020)
जगभरात 4 लसींवरील संशोधन लक्षवेधक :
- करोनाविरोधातील लढय़ात लस उपलब्ध होणे हाच प्रभावी उपाय असल्याने जगभर संशोधन केले जात आहे.
- तर त्यापैकी आठ लसींवरील संशोधन प्रगतीपथावर आहे. त्यातही चार लसींवरील प्रयोग लक्षवेधी असून ते संशोधनाच्या पुढील टप्प्यावर पोहोचलेले आहेत, अशी माहिती निती आयोगाचे सदस्य आणि करोनासंदर्भातील संशोधन-विकास कृतीगटाचे सहअध्यक्ष डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली.
- तसेच एका बाजूला लस संशोधनाचे काम सुरू असले तरी करोनावर कोणती औषधे प्रभावी ठरू शकतील यावरही अधिक प्रयोग केले जात आहेत.
- तर फेव्हिपिराव्हीर, रेमडेसीव्हीर, टोसिलिझूमॅब, कन्व्हेलेसंट प्लाझ्मा, अर्बिडॉल, हायड्रोक्झिक्लोरोक्विन, देशी बनावटीचै औषध ओसीक्यूएच तसेच, बीसीजी लस अशा विविध औषधे करोनाविरोधात किती प्रभावी ठरू शकतात यावर अधिक वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहेत.
Must Read (नक्की वाचा):
चीनची हाँगकाँग सुरक्षा विधेयकाला मंजुरी :
- अमेरिकेने दिलेल्या इशाऱ्याला न जुमानता चीनने हाँगकाँग सुरक्षा विधेयकाला मंजुरी दिली आहे.
- तर हॉँगकॉँगमध्ये गेल्या काही दिवसांपासून या विधेयकाच्या विरोधात तीव्र आंदोलन सुरू आहे.
- अमेरिकेचा इशारा आणि आंदोलन याकडे लक्ष न देता चीनने विधेयकाला मंजुरी दिली आहे.
- चीन सरकारने मंजूर केलेले विधेयक हे हाँगकाँगच्या स्वायत्ततेवर आणि लोकशाही मूल्यांवर घाला घालणारे असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मात्र गुरुवारी नॅशनल पीपल्स काँग्रेसने या विधेयकाला मंजुरी दिली.
- तसेच या विधेयकाला 2878 जणांनी समर्थन दिले, एका सदस्याने विरोध केला तर सहा सदस्य या वेळी गैरहजर होते.
- तर पुढील काही दिवसांमध्ये या कायद्याची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे. कायद्या अंतर्गत स्थानिकांचा हाँगकाँगमध्येच खटला चालविण्यात येणार आहे.
महाराष्ट्रासह पाच राज्यातून होणारी सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक थांबवली :
- करोनाचा वाढता धोका लक्षात घेत कर्नाटक सरकारनं गुरूवारी मोठा निर्णय घेतला.
- करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांमुळे संसर्ग वाढण्याची भीती असल्यानं कर्नाटक सरकारनं महाराष्ट्रासह पाच राज्यातून होणारी विमान, रेल्वे आणि इतर वाहनातून होणारी सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक थांबवली आहे.
- करोनामुळे सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यातून होणारी सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक कर्नाटकनं थांबवली आहे.
- तर महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यातून रेल्वे, विमान आणि इतर वाहनातून होणारी वाहतूक रद्द केली आहे.
17 जून पासून प्रिमीअर लिग स्पर्धेला पुन्हा सुरुवात होणार :
- जर्मन सरकारने Bundesliga स्पर्धेला मान्यता दिली. यानंतर प्रेक्षकांव्यतिरीक्त या सामन्यांना सुरुवातही झाली.
- तर यानंतर स्पेन सरकारनेही 8 जून पासून La Liga स्पर्धेला मान्यता दिली.
- तसेच यानंतर फुटबॉलप्रेमींमध्ये मानाचं स्थान असलेल्या इंग्लिश प्रमिअर लिग स्पर्धेला 17 जून पासून पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे.
- मँचेस्टर सिटी विरुद्ध आर्सेनल आणि अॅस्टन व्हिला विरुद्ध शेफील्ड युनायडेट हे संघ 17 तारखेला सामना खेळतील.
दिनविशेष :
- 29 मे : जागतिक पचन स्वास्थ्य दिन
- पीटर (दुसरा) रशियाचा झार 29 मे 1727 मध्ये बनला.
- 29 मे 1848 मध्ये विस्कॉन्सिन अमेरिकेचे 30 वे राज्य झाले.
- 29 मे 1906 रोजी भारतीय-इंग्लिश लेखक टी.एच. व्हाईट यांचा जन्म झाला.
- एव्हरेस्टवीर शेर्पा तेनसिंग नोर्गे यांचा जन्म 29 मे 1914 रोजी झाला.
- अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या सामान्य सापेक्षता सिद्धांताची चाचणी 29 मे 1919 रोजी घेण्यात आली.
- 29 मे 1987 हा दिवस भारताचे 5वे पंतप्रधान ‘चौधरी चरणसिंग‘ यांचा स्मृतीदिन आहे.