Current Affairs (चालू घडामोडी)

29 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

29 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (29 ऑक्टोबर 2018)

सैनिकी शाळांची दारे मुलींसाठी खुली:

  • मिझोराममध्ये 1961 मध्ये स्थापन झालेल्या सैनिकी शाळांची दारे प्रथम मुलींसाठी उघडल्याने इतिहास घडला आहे. 12 वर्षांच्या 6 मुलींचे प्रवेशाचे स्वप्न पूर्ण झाले असून, सैनिक, खलाशी, पायलट आदी होण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
  • लखनौमधील कॅप्टन मनोज पांडेयत्तर प्रदेश सैनिकी शाळेत यंदा विद्यार्थिनींना प्रथमच प्रवेश देण्यात आला. नववीच्या 2018-19 शैक्षणिक सत्रासाठी 2500 विद्यार्थिनींनी अर्ज केले होते. त्यातील 15 जणींची निवड करण्यात आली. तथापि, ही शाळा राज्य सरकारव्दारा संचलित होती. त्यानंतर मिझोराम हे राज्यही पुढे आले असून, प्रथमच येथे मुलींना प्रवेश देण्यात आला.
  • तर संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित येत असलेल्या या शाळेत पथदर्शक प्रकल्प राबवण्यात आला. आता संपूर्ण देशातील सैनिकी शाळांत मुलींना प्रवेश देण्यात येत आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (28 ऑक्टोबर 2018)

आता एटीएममधून फक्त 20 हजार रुपये काढता येणार:

  • स्टेट बँकेचे खातेदार आता एटीएममधून एका दिवशी 20 हजार रुपयांपर्यंतच रक्कम काढू शकणार आहेत. सध्या ही मर्यादा 40 हजार रुपये आहे. 31 ऑक्टोबरपासून नवे नियम लागू होणार आहेत. बँकेने सर्व शाखांना याबाबत निर्देश जारी करण्यात आले आहेत.
  • मार्च 2018 पर्यंत बँकेने 39.50 कोटी डेबिट कार्ड जारी केले आहेत. यातील 26 कोटी कार्ड सध्या वापरात आहेत. अर्थात, बँकेच्या अन्य कार्डवर या नियमांचा परिणाम होणार नाही. उदाहरणार्थ, एसबीआय गोल्ड, प्लॅटिनम डेबिट कार्डची रक्कम काढण्याची मर्यादा क्रमश: 50 हजार आणि 1 लाख रुपये आहे.
  • क्लासिक व माइस्ट्रो कार्डची रोजची रक्कम काढण्याची मर्यादा 31 ऑक्टोबरपासून 40 हजारांहून घटवून 20 हजार करण्यात येणार आहे. जर आपल्याला अधिक रकमेची गरज भासत असेल तर, दुसऱ्या श्रेणीतील कार्डसाठी अर्ज करावा, असे बँकेने स्पष्ट केले आहे.
  • एटीएम व्यवहारात फसवणुकीच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात येत आहे. तसेच, कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी हे पाउल उचलण्यात आले आल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.

साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. अरुणा ढेरे:

  • शब्दांमधली अर्थतरलता आपल्या काव्यातून व्यक्त करीत गेली काही दशके मराठी मानस अधिक भावसमृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांची 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
  • यवतमाळ येथे 11 ते 13 जानेवारी या कालावधीत हे संमेलन होणार आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या यवतमाळ येथे झालेल्या बैठकीत डॉ. ढेरे यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
  • साहित्य संमेलनाच्या नऊ दशकांच्या इतिहासामध्ये अध्यक्षपदाचा बहुमान लाभलेल्या त्या पाचव्या महिला साहित्यिक ठरल्या आहेत.
  • संशोधन आणि ललित साहित्यातही डॉ. अरुणा ढेरे यांची कामगिरी मोठी असली, तरी त्यांच्या कवितांचा ठसा अमीट आहे.
  • वडील आणि ज्येष्ठ संशोधक डॉ.रा.चिं. ढेरे यांच्याकडून त्यांना वैचारिक वारसा लाभला होता. पण, समाजसंस्कृतीच्या संशोधनात मानवी मनाचा शोध घेण्यात त्यांना अधिक रस वाटला. या अंतर्मनातील अनेक सूक्ष्म भावतरंग त्यांच्या काव्यात अगदी सहजतेने उमटत गेले.
  • संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता ज्येष्ठ साहित्यिकाची सन्मानाने निवड करावी, अशी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने नुकतीच घटना दुरुस्ती केली आहे. त्याची अंमलबजावणी लगेचच करण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्यानुसार ही निवड करण्यात आली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे निमंत्रण नाकारले:

  • नवी दिल्लीतील प्रजासत्ताक दिनी संचलन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी दिलेले निमंत्रण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाकारले आहे. या संदर्भात अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना पत्र दिले आहे. या पत्राच्या माध्यमातून ट्रम्प यांनी न येण्याबद्दल खेद व्यक्त केला आहे.
  • ट्रम्प यांनी निमंत्रण नाकारण्याची काही कारणे सांगितली आहेत. 26 जानेवारीच्या अगोदर किंवा नंतर काही राजकीय राजनैतिक कार्यक्रम आणि स्टेट ऑफ युनियनमध्ये भाषण निश्‍चित होऊ शकते, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. याबाबत ट्रम्प यांनी घेतलेली भूमिका तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांच्याविरुद्ध आहे. 2015 मध्ये अनेक घरगुती कार्यक्रम असतानाही प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला ते हजर राहिले होते.
  • रशियाबरोबर भारताचा संरक्षण करार आणि इराणमधून तेलाची आयात या कारणावरून भारत आणि अमेरिका यांच्यात तणाव निर्माण झालेला असताना ट्रम्प यांनी प्रजासत्ताक दिनाचे निमंत्रण नाकारल्याचे वृत्त आले आहे. या पत्राबरोबरच ट्रम्प भारतात येणार की नाही या संदर्भात बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
  • भारताकडून त्यांना फेब्रुवारीत निमंत्रण पाठण्यात आले होते, मात्र अमेरिकेने ते निमंत्रण स्वीकारले नाही. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होत असल्याने ट्रम्प यांनी भारताचे निमंत्रण नाकारल्याचे बोलले जात आहे.

इस्त्रोच्या माजी प्रमुखांचा भाजपमध्ये प्रवेश:

  • भारतीय अंतराळ संशोधन विभागाचे (इस्त्रो) माजी प्रमुख माधवन नायर यांनी 27 ऑक्टोबर रोजी भाजपमध्ये प्रवेश केला.
  • केरळमधील त्रिवेंद्रम येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत नायर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नायर हे इस्त्रोचे प्रमुख आणि त्यापूर्वी सचिवही होते.
  • केरळमधील तिरुअनंतपुरम येथील मुळचे असलेले नायर यांनी 1966 मध्ये केरळ विश्वविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी घेतली होती. त्यानंतर त्यांनी मुंबईतील भाभा अनुसंधान केंद्रात प्रशिक्षण घेतले.
  • इस्त्रोचे प्रमुख म्हणून त्यांनी सहा वर्षे कार्यभार सांभाळला. त्यांच्या काळात इस्त्रोने अनेक उपग्रहांचे यशस्वी उड्डाण केले.

दिनविशेष:

  • 29 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक स्ट्रोक दिन’ आहे.
  • सन 1894 मध्ये महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेची स्थापना झाली.
  • महर्षि धोंडो केशव कर्वे यांना सन 1958 मध्ये भारतरत्‍न पुरस्कार प्रदान.
  • भारतीय बॉक्सर ‘विजेंदर सिंग‘ यांचा जन्म 29 ऑक्टोबर 1985 रोजी झाला.
  • सन 1996 मध्ये स्वदेशात बनविलेली कामिनी ही 30 मेगावॉट क्षमतेची अणूभट्टी कल्पक्‍कम येथे कार्यान्वित करण्यात आली.
  • सन 2008 मध्ये डेल्टा एअरलाईन्सचे नॉर्थवेस्ट एअरलाईन्समध्ये विलीनीकरण होऊन नॉर्थवेस्ट एअरलाईन्स ही जगातील सर्वात मोठी विमान वाहतुक कंपनी बनली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (30 ऑक्टोबर 2018)

Sandip Rajput

Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago