3 एप्रिल 2022 चालू घडामोडी – Current Affairs

3 April 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (3 एप्रिल 2022)

यंदाचा मार्च ठरला 122 वर्षांमधील सर्वाधिक उष्ण महिना :

  • भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे की, मार्च महिन्यातील तापमानाने मागील सर्व विक्रम मोडले आहेत, मार्च 1901 पासून 122 वर्षांतील हा भारतातील सर्वात उष्ण मार्च ठरला आहे.
  • भारतीय हवामान विभागाने सांगितले की, ‘मार्च 2022 ची मासिक सरासरी 33.1 डिग्री सेल्सियस आहे. जी 2021 मधील 33.09 डिग्री सेल्सियसचा मागील विक्रम मोडीत काढते.
  • IMD अधिकाऱ्यांनी सांगितले की, दीर्घकाळापर्यंत दुष्काळामुळे वायव्य भारतात उष्ण हवामान निर्माण झाले आहे.
  • गुरुवारी दिल्लीच्या काही भागांमध्ये तीव्र उष्मा होता, तीन ठिकाणी कमाल तापमान 41 अंशांच्या पुढे गेले.
  • 3 ते 6 एप्रिल दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (2 एप्रिल 2022)

भारत-ऑस्ट्रेलिया मुक्त व्यापार करार :

  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आर्थिक सहकार्य आणि व्यापारविषयक करारावर शनिवारी उभय बाजूने स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
  • दोन्ही देशांसाठी हा करार अत्यंत लाभदायक असल्याचा दावा करण्यात येत असून भारतातून निर्यात होणाऱ्या 96 टक्के वस्तूंवर आता ऑस्ट्रेलियात शुन्य करआकारणी होईल.
  • तर यात अभियांत्रिकी वस्तू, दागिने आणि जडजवाहिर, वस्त्रे, चामडय़ाच्या वस्तू आदींचा समावेश आहे.
  • यातून दोन्ही देशांतील वस्तू आणि सेवा पुरवठादारांना उत्तेजन मिळणार आहे.
  • तसेच पाच वर्षांत ही उलाढाल 4500 ते 5000 कोटी डॉलरवर जाण्याची शक्यता आहे.
  • तर सध्या ही उलाढाल 2700 कोटी डॉलर इतकी आहे.
  • यातून भारतात 10 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत, असे सरकारतर्फे सांगण्यात आले.
  • तसेच या करारानुसार आयातशुल्क माफीची योजना पाच वर्षांत शंभर टक्के भारतीय वस्तूंना लागू केली जाणार आहे.

प्रो लीग हॉकीत भारताची इंग्लंडवर सरशी :

  • भारतीय पुरुष हॉकी संघाने प्रो लीगमधील चांगली कामगिरी सुरू ठेवताना शनिवारी इंग्लंडवर 3-3 अशा नियमित वेळेतील बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-2 अशी सरशी साधली.
  • टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या भारतीय संघाने यंदा प्रो लीग हॉकीमध्ये सातत्यपूर्ण खेळ केला आहे.
  • तर त्यांचा हा नऊ सामन्यांतील पाचवा विजय ठरला असून हा संघ 18 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.
  • दुसऱ्या स्थानावरील जर्मनीच्या खात्यावर 17 गुण असून ते भारतापेक्षा एक सामना कमी खेळले आहेत.
  • किलगा स्टेडियमवर शनिवारी झालेल्या सामन्याच्या पूर्वार्धात यजमान भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला.

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची कार्यक्रमपत्रिका जाहीर :

  • यंदा कतार येथे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये रंगणाऱ्या ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची कार्यक्रमपत्रिका शुक्रवारी जाहीर करण्यात आली.
  • जगातील सर्वात मोठी महासत्ता अमेरिका आणि इराण यांचा एकाच गटात समावेश आहे.
  • तर या दोन देशांतील वितुष्टामुळे ‘ब’ गटातील या सामन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
  • विश्वचषकासाठीच्या ‘लईब’ नामक बोधचिन्हाचे ‘फिफा’कडून अनावरण करण्यात आले.
  • लईब या अरेबियन शब्दाचा अतिकुशल खेळाडू असा मराठीत अनुवाद होतो. ‘लईब’ सर्व वयोगटांतील चाहत्यांना विश्वचषकाकडे आकर्षित करेल अशी आयोजकांची धारणा आहे.

XE नावाचा करोनाचा नवा व्हेरियंट :

  • तब्बल दोन वर्षानंतर महाराष्ट्रातील करोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत.
  • अशातच जागतिक आरोग्य संघटनेने चिंता वाढवणारी माहिती दिली आहे.
  • XE नावाचा करोनाचा नवा व्हेरियंट हा ओमायक्रॉनच्या BA.2 सब-व्हेरियंटपेक्षा दहा टक्के जास्त संक्रमणक्षम असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय.
  • आत्तापर्यंत, ओमायक्रॉनचा BA.2 सब-व्हेरियंट हा सामान्य संसर्गजन्य प्रकार मानला जात होता.
  • BA.2 हा अनेक देशांमध्ये पसरला असून युकेमध्ये नवीन रुग्ण याच व्हेरियंटमुळे वाढले आहेत.
  • परंतु नवीन XE हा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या BA.1 आणि BA.2. या दोन प्रकारातून म्युटेट होऊन तयार झाल्याचं म्हटलं जातंय.
  • XE रीकॉम्बिनंट हा व्हेरियंट सर्वात आधी 19 जानेवारी रोजी यूकेमध्ये आढळून आला.

राष्ट्रीय कॅरम स्पर्धात महाराष्ट्राला सांघिक जेतेपद :

  • दादर येथील हालारी विसा ओसवाल समाज हॉल येथे सुरू असलेल्या 49व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत महिलांच्या आंतरराज्य सांघिक गटात महाराष्ट्राने तमिळनाडूवर 2-1 असा विजय मिळवत जेतेपद प्राप्त केले.
  • महिलांमध्ये तमिळनाडूच्या जे. अभिन्याने महाराष्ट्राच्या आकांक्षाला 21-16, 24-11 असे नमवून संघाला चांगली सुरुवात करून दिली.
  • परंतु चुरशीची झुंज देत महाराष्ट्राच्या केशर निर्गुणने तमिळनाडूच्या अविष्काला 5-25, 25-15, 25-0 असे पराभूत करून बरोबरी साधली.
  • मग दुहेरीत महाराष्ट्राच्या श्रुती सोनावणे व मैत्रेयी गोगटेने तमिळनाडूच्या एल. अम्मा शवर्थिनी व वी मिथराला जोडीला 15-11, 16-22, 17-15 असे हरवले.
  • आंतरसंस्था सांघिक गटात पेट्रोलियम क्रीडा मंडळाने दुहेरी यश मिळवले.

दिनविशेष:

  • सामाजिक ऐतिहासिक कादंबरीकार नाथमाधव यांचा जन्म 3 एप्रिल 1882 मध्ये झाला.
  • मॅगसेसे पुरस्कार विजेत्या स्वातंत्र्यसैनिक कमलादेवी चट्टोपाध्याय यांचा जन्म 3 एप्रिल 1903 रोजी झाला होता.
  • सन 1948 मध्ये ओरिसा उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
  • मार्टिन कूपर या मोटोरोलो कंपनीतील संशोधकाने 1973 मध्ये जगातील पहिला मोबाइल कॉल केला.
  • सन 2000 मध्ये आयएनएस आदित्य हे इंधन पुरवणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे वेगवान जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (4 एप्रिल 2022)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago