Current Affairs (चालू घडामोडी)

3 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

3 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (3 ऑगस्ट 2018)

भारतीय तिंरग्याचे रचनाकार ‘पिंगली वेंकैया’:

  • भारतीय राष्ट्रध्वजाचे म्हणजेच तिरंग्याचे आद्य रचनाकार पिंगली वेंकैया यांची 2 ऑगस्ट रोजी 142वी जयंती साजरी झाली. याच दिवशी 1876 साली त्यांचा सध्याच्या आंध्रप्रदेश राज्यात असणाऱ्या मच्छलीपट्टम येथील भतलामपेनूमारू येथे जन्म झाला होता.

  • त्यांच्या विषयी काही खास गोष्टी पुढीलप्रमाणे-
  • वयाच्या 19व्या वर्षीच ते ब्रिटीश लष्करात भरती झाले. ते दक्षिण आफ्रिकेमधील अँग्लो बोएर युद्धामध्ये सैनिक म्हणून ब्रिटिशांच्या बाजूने लढले.
  • याच काळात त्यांची आणि महात्मा गांधींची दक्षिण आफ्रिकेमध्ये भेट झाली. त्यानंतर पुढील पन्नास वर्षाहून अधिक काळ हे दोन्ही नेते एकमेकांच्या संपर्कात होते.
  • पिंगली हे जियोलॉजीमध्ये डॉक्टरेट होते. ते हिरे खाण उत्खन्नातील तज्ञ होते. त्यामुळेच त्यांना डायमंड वेंकैया हे टोपणनाव देण्यात आले होते.त्याचप्रमाणे कापसावरील संशोधनामध्ये त्यांना विशेष स्वारस्य असल्याने त्यांना कॉटन वेंकैया नावानेही ओळखले जायचे.
  • 31 मार्च 1921 मध्ये पिंगली यांनी विजयवाडा येथे झालेल्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीमध्ये भगव्या आणि हिरव्या रंगाचा झेंडा भारतीय राष्ट्रध्वज म्हणून सादर केला. मूळचे जालंधरच्या असणाऱ्या लाला हंसराज यांनी या झेंड्यावर चर्खा असावा असे सांगत चर्ख्यासहीत हा झेंडा सादर केला तर गांधीजींनी भगव्या आणि हिरव्या रंगाच्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या पट्टीचा सल्ला दिला. आणि अशाप्रकारे तिरंग्याचा जन्म झाला.
  • 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पिंगली यांच्या कल्पनेतून साकारलेल्या तिरंगी झेंड्याला भारताचा राष्ट्रध्वज म्हणून मान्यता मिळाली. भारतीय संविधान समितीने 22 जुलै 1947 रोजी तिरंगा झेंडा भारताचा राष्ट्रध्वज असल्याचे जाहीर केले.
  • पिंगली यांची शेवटची इच्छा अपूर्णच राहिली. भारताचा तिरंगा दिल्लीतील लाल किल्ल्यावर फडकताना पाहण्याची त्यांची इच्छा होती. मात्र त्यांच्या कुटुंबाकडे त्यांना दिल्लीला पाठवण्याइतके पैसे नसल्याने त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.
  • 1963 साली पिंगली यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर काही दशकांनी 2009 साली भारतीय पोस्ट खात्याने त्यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकीट जारी केले. स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यासाठी हे तिकीट जारी करण्यात आले होते.
  • 2011 साली भारतरत्न पुरस्कारासाठी (मरणोत्तर) पिंगली यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. तसेच मागील काही वर्षांपासून त्यांच्या मुलीला सरकारकडून पेन्शन देण्यात येत आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (2 ऑगस्ट 2018)

भारतीय खेळाडूंना इंजेक्शन्स नेण्यास ‘आयओए’कडून विरोध:

  • राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या वेळी भारतीय खेळाडूंकडे इंजेक्शन्स सापडल्यामुळे झालेली बदनामी टाळण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) खेळाडूंनी शक्यतो इंजेक्शन्स नेऊ नये, असे सर्व राष्ट्रीय क्रीडा संघटनांना कळवले आहे.
  • खेळाडूंना जी काही औषधे न्यायची आहेत किंवा इंजेक्शन्स न्यायची असल्यास संबंधित खेळांच्या राष्ट्रीय संघटनेकडून पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
  • तसेच जर काही औषधे उत्तेजके असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित खेळाडूबरोबरच राष्ट्रीय संघटनेवरही कारवाई केली जाईल, असे ‘आयओए’ने स्पष्ट केले आहे.
  • राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या वेळी चालण्याच्या शर्यतीमधील खेळाडू के.टी .इरफान व तिहेरी उडीतील स्पर्धक राकेश बाबू यांच्याकडे प्रमाणित नसलेली इंजेक्शन्स आढळल्यामुळे त्यांना स्पर्धेतून डच्चू देण्यात आला होता.

प्रजासत्ताक दिनाचे डोनाल्ड ट्रम्प यांना निमंत्रण:

  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारताने प्रजासत्ताक दिनाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण पाठविले असल्याचे स्पष्ट झाले. मात्र ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याची तारीख ‘टू प्लस टू’ बैठकीत निश्‍चित होण्याची शक्‍यता आहे.
  • प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासंबंधी भारताचे पाठविलेले निमंत्रण ट्रम्प यांना मिळाले असून, पुढील महिन्यात दिल्लीमध्ये दोन्ही देशांच्या परराष्ट्र तसेच संरक्षण मंत्र्यांच्या ‘टू प्लस टू’ बैठकीत त्यांच्या दौऱ्याची तारीख निश्‍चित करण्याविषयी चर्चा होईल.
  • अमेरिकी अध्यक्षांचे माध्यम सचिव सारा सॅंडर्स यांनी व्हाइट हाउसच्य नियमित पत्रकार परिषदेत एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले, की मला माहीत आहे, की निमंत्रण आले आहे. मात्र त्यावर कोणताही अंतिम निर्णय घेतला गेला आहे असे मला वाटत नाही. मला हेसुद्धा माहीत आहे, की संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस आणि परराष्ट्र मंत्री मायकल पोम्पियो पुढील महिन्यात भारताच्या दौऱ्यावर जात आहे आणि ते चर्चेची प्रक्रिया सुरू करतील, तसेच या वर्षीच्या अध्यक्षांच्या दौऱ्याच्या शक्‍यतेवर चर्चा होण्याचीही शक्‍यता आहे.

आता चीनमध्येही गुगलची एन्ट्री:

  • काही देशांमध्ये इंटरनेट सेवा वापरावर विशेष बंधने नाहीत. मात्र, चीनमध्ये इंटरनेट वापरावर बहुतांश प्रमाणात सरकारचा हस्तक्षेप असल्याची अनेक उदाहरणे आहेत. असे असताना आता काही वर्षांनंतर सर्वात प्रसिद्ध सर्च इंजिन असलेल्या गुगलने चीनमध्येही ‘एन्ट्री’ केली आहे.
  • गुगलचा वापर जगातील बहुतांश देशात केला जातो. मात्र, यापूर्वी चीनमध्ये गुगल वापरावर पूर्णपणे निर्बंध होते. त्यानंतर आता हे निर्बंध उठविण्यात आले असून, चीनमध्येही गुगलचा वापर करता येणार आहे.
  • मात्र, गुगलचा वापर सरकारच्या नियंत्रणात असणार आहे. चीनी सरकारचे यामध्ये नियंत्रण असल्याने विवादात्मक मजकूर किंवा शब्दांवर बंदी घालण्यात आली आहे. चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई यांची 2017 मध्ये घेतली होती. या बैठकीनंतर गुगल वापराची परवानगी देण्यात आली.

‘अॅपल’ कंपनी ठरली जगातील सर्वात श्रीमंत कंपनी:

  • प्रसिद्ध मोबाईल ब्रॅन्ड आयफोन बनवणारी अॅपल कंपनी ही 1 ट्रिलिअन डॉलर उलाढाल असलेली पहिली अमेरिकन लिस्टेड कंपनी बनली आहे. या एकट्या कंपनीचे उत्पन्न हे जगभरातील 177 देशांच्या उत्पन्नापेक्षाही जास्त आहे.
  • भारतीय रुपयांमध्ये कंपनीची वार्षिक उलाढाल सुमारे 68620 अब्ज रुपये इतकी आहे. यावरुन हे स्पष्ट हेते की, अॅपल कंपनीची उलाढाल भारतीय अर्थव्यवस्थेच्या 38 टक्के हिश्याऐवढी आहे. कारण, नुकताच भारताचा जीडीपी 2.6 ट्रिलिअन डॉलर इतका नोंदवला गेला आहे.
  • अॅपल कंपनी सध्या इतकी ताकदवान बनली आहे की, ती 3 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था असलेल्या पाकिस्तानसारख्या देशालाही सहज खरेदी करु शकते. त्याचबरोबर भारतातील दोन सर्वाधिक उत्पन्न असलेल्या कंपन्या रिलायन्स इंडस्ट्रिज आणि टीसीएस या कंपन्यांपेक्षाही अॅपल 10 पट मोठी कंपनी ठरली आहे.
  • वर्ल्ड बँकेच्या आकडेवारीनुसार, जगातील 193 देशांपैकी केवळ 16 देशच असे आहेत ज्यांचा जीडीपी हा अॅपलच्या बाजारमुल्यापेक्षा जास्त आहे. म्हणजेच 177 देशांपेक्षा श्रीमंत अॅपल कंपनी आहे. सध्या अॅपलची बाजार मुल्य हे इंडोनेशियाच्या जीडीपीबरोबर आहे.

दिनविशेष:

  • हिंदी कवी मैथिलिशरण गुप्त यांचा जन्म 3 ऑगस्ट 1886 मध्ये झाला.
  • स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, पत्री सरकारचे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार ‘क्रांतिसिंह नाना पाटील’ यांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 रोजी झाला.
  • द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी‘ची स्थापना सन 1900 मध्ये झाली.
  • 3 ऑगस्ट 1948 मध्ये भारतीय अणूऊर्जा आयोगाची (Indian Atomic Energy Commission) स्थापना झाली.
  • सन 1960 मध्ये नायजेरिया देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (4 ऑगस्ट 2018)

Sandip Rajput

Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago