3 August 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
3 August 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (3 ऑगस्ट 2019)
पत्रकार रविश कुमार यांना मानाचा ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार जाहीर :
- एनडीटीव्हीचे पत्रकार रविश कुमार यांना मानाचा समजला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. पत्रकारिता क्षेत्रातील कामासाठी रविश कुमार यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
- आशिया खंडातील नोबल पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पुरस्कार विजेत्यांच्या नावांची रॅमन मॅगसेसे पुरस्कार फाउंडेशनने घोषणा केली.
- तर रवीश कुमार यांच्याबरोबर म्यानमारमधील पत्रकार को स्वी वीन, थायलंडच्या अंगखाना नेलापाजीत, फिलिपिन्सच्या रेम्युंडो पुतांजे सायाबयाब आणि दक्षिण कोरियामधील किम जाँग की यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
- तसेच रवीश कुमार यांची या पुरस्कारासाठी निवड करताना निवड समितीने त्यांच्यातील काही खास गुणांचा गौरव केला आहे. आपल्या कामाप्रती असणारी त्यांची प्रतिबद्धता, उच्च दर्जाची आणि पत्रकारिता करता असणारी नैतिकता, त्यांचे
सत्यासोबत उभी राहण्याची हिंमत, सचोटी आणि स्वातंत्र्य भूमिका घेणे हे गुण कौतुकास्पद आहेत.
Must Read (नक्की वाचा):
देशभर समान किमान वेतन :
- देशभरातील संघटित तसेच, असंघटित क्षेत्रांतील कामगारांसाठी समान किमान वेतनाची खात्री देणारा कायदा संसदेने मंजूर केला. राज्यसभेने कामगार वेतन संहिता विधेयकावर शिक्कामोर्तब केले.
- तर लोकसभेत हे विधेयक आधीच संमत झाले आहे. या कायद्यामुळे देशभरातील त्या-त्या क्षेत्रांतील कामगारांना एकसमान किमान वेतन ठरलेल्या मुदतीत मिळू शकेल.
- तसेच कंपनीच्या मालकांकडून कामगारांचे किमान वेतन ठरवण्याचा अधिकार काढून घेण्यात आला असून आता हे वेतन केंद्र सरकार ठरवील. त्यामुळे कामगार कोणत्या कंपनीत काम करतो यावर त्याचे किमान वेतन अवलंबून राहणार नाही. कामगार कोणत्या क्षेत्रांतील आहेत आणि त्यांचे कार्यकौशल्य किती आहे, यावर त्यांचे किमान वेतन ठरेल आणि कंपनी मालकांना ते वेळेत द्यावेच लागेल.
- किमान वेतन मिळणे आणि हे वेतन वेळेत मिळणे; या दोन्ही बाबी कामगारांसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. या दोन्हींसाठी वैधानिक संरक्षण देणारा कायदा संसदेने केला असून देशातील 50 कोटी संघटित तसेच, असंघटित कामगारांना त्याचा लाभ मिळेल, असे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी राज्यसभेत सांगितले.
- कामगारांच्या वेतनासंदर्भात किमान वेतन कायदा-1948, वेतन वाटप कायदा-1936, बोनस वाटप कायदा-1965 व समान मोबदला कायदा-1976 असे चार कायदे अस्तित्वात आहेत. या चारही कायद्यांचे स्वतंत्र अस्तित्व संपून ते नव्या वेतन संहितेमध्ये एकत्रित करण्यात आले आहेत.
- तर सध्या देशात 44 कामगार कायदे असून त्यात सुसूत्रता आणली जात आहे. त्यानुसार, कामगार वेतन संहिता, औद्योगिक संबंध संहिता, कामगारांची सामाजिक सुरक्षा आणि कामगारांचे आरोग्य-कार्यस्थळ स्थिती; या चार संहितांमध्ये कामगारांचे कायदे विभागले जाणार आहेत
चांद्रयान-2 ने चौथ्यांदा बदलली कक्षा :
- भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या शास्त्रज्ञांनी शुक्रवारी संध्याकाळी चांद्रयान-2 ची कक्षा यशस्वीरित्या बदलली. कक्षा बदलाचा हा चौथा टप्पा होता.
- चांद्रयान 2 ची पृथ्वीपासूनची कक्षा टप्याटप्याने वाढवण्यात येत आहे. शुक्रवारी दुपारी 3 वाजून 27 मिनिटांनी चांद्रयान-2 च्या कक्षेत यशस्वीरित्या बदल करण्यात आला.
- चांद्रयान-2 पृथ्वीपासून किमान (पेरिजी) 277 किमी आणि कमाल (एपोजी) 89 हजार 472 किमी अंतरावर स्थिरावण्यात आले. आता 6 ऑगस्ट रोजी चांद्रयानाची कक्षा पुन्हा बदलण्यात येणार आहे.
- तसेच चांद्रयान 2 चा प्रवास योग्य दिशेने सुरु आहे असे इस्रोकडून सांगण्यात आले आहे. प्रत्येकवेळी कक्षा बदल करताना चांद्रयान 2 ला ऊर्जा मिळणार आहे. कक्षा वाढवण्याच्या प्रक्रियेमुळे चांद्रयान 2 मध्ये पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने जाण्यासाठी पुरेशी ऊर्जा निर्माण होणार आहे.
- तर 14 ऑगस्टला चांद्रयान 2 चा पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु होईल. 20 ऑगस्टला चांद्रयान 2 चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल असे इस्रोकडून सांगण्यात आले आहे. तीन सप्टेंबरला विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर मुख्य यानापासून वेगळे होतील. त्यानंतर सात सप्टेंबरला लँडर चंद्रावर उतरेल.
भारतीय अंतराळवीरांना ‘व्योमनॉट्स’ म्हणून ओळखले जाणार :
- भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’ 2022 पर्यंत अंतराळामध्ये अंतराळवीर पाठवणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.
- भारताला अमृतमोहोत्सवी स्वातंत्र्य वर्षातच इस्रो पहिला भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवण्याची तयारी करत आहे.
- तर भारताच्या या अंतराळवीराला अँस्ट्रोनॉट नाही तर ‘व्योमनॉट’ असे म्हटले जाईल.
- भारताची ही मोहिम यशस्वी झाल्यास अंतराळात मानवरहीत मोहिम करणार भारत चौथा देश ठरेल. या आधी हा पराक्रम रशिया, अमेरिका आणि चीनने केला आहे.
- भारतीयांना अंतराळात पाठवण्याच्या मोहिमेला गगनयान असे नाव देण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत एका आठवड्यासाठी तीन भारतीय अंतराळवीरांना अंतराळ पाठवले जाणार आहे.
- अमेरिकेमध्ये अंतराळवीरांना ‘अॅस्ट्रोनॉट’ म्हणतात तर रशियामध्ये अंतराळवीरांना ‘कॉस्मोनॉट्स’ म्हणतात. चीनमध्ये अंतराळवीरांना ‘ताइकोनॉट्स’ असं म्हणतात. याच पार्श्वभूमीवर भारत आपल्या अंतराळवीरांना ‘व्योमनॉट्स’ या नावाने ओळखले जाणार आहे.
- ‘व्योमनॉट्स’मध्ये ‘व्योमन्’ हा संस्कृत शब्द आहे. या शब्दाचा अर्थ अंतराळ असा होतो. अनेकदा अकाश या अर्थानेही हा शब्द वापरला जातो. त्यामुळेच व्योमन् या शब्दापुढे अॅस्ट्रोनॉटमधील नॉट्स ही अक्षरे लावून ‘व्योमनॉट्स’ हा शब्द
तयार झाला आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेची सातव्या क्रमांकावर घसरण :
- जागतिक महासत्ता होण्याची स्वप्न पाहणाऱ्या भारताच्या अर्थव्यवस्थेला धक्का देणारी जागतिक बँकेने जाहीर केलेली आकडेवारी समोर आली असून जगातील पाचव्या क्रमांकाला असणाऱ्या भारतीय अर्थव्यस्थेची दोन स्थानांनी पिछेहाट झाली आहे.
- तर युनायटेड किंगडम आणि फ्रान्सने जागतिक अर्थव्यस्थांच्या यादीमध्ये मागे टाकले असून अनुक्रमे पाचवे आणि सहावे स्थान मिळवले आहे. त्यामुळे आता भारत या यादीमध्ये सातव्या क्रमांकाला फेकला गेला आहे.
- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर करताना पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं उद्दिष्ट पुढच्या काही वर्षांमध्ये नक्की गाठू असा विश्वास व्यक्त केला होता. त्यामुळेच ही
आकडेवारी मोदी सरकार आणि सरकारच्या आर्थिक धोरणांसाठी धक्का असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. - 2017 साली भारतीय अर्थव्यस्थेचा आवाका 2.65 ट्रिलियन डॉलर इतका होती. त्यावेळी भारताची अर्थव्यस्था ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यस्था होती. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार 2017 साली युनायटेड किंग्डम 2.64 ट्रिलियन डॉलरसहीत सहाव्या आणि फ्रान्स 2.59 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसहीत जागतिक अर्थव्यवस्थांच्या यादीमध्ये सातव्या स्थानी होता.
दिनविशेष :
- हिंदी कवी मैथिलिशरण गुप्त यांचा जन्म 3 ऑगस्ट 1886 मध्ये झाला.
- स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, पत्री सरकारचे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार ‘क्रांतिसिंह नाना पाटील’ यांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 रोजी झाला.
- ‘द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी‘ची स्थापना सन 1900 मध्ये झाली.
- 3 ऑगस्ट 1948 मध्ये भारतीय अणूऊर्जा आयोगाची (Indian Atomic Energy Commission) स्थापना झाली.
- सन 1960 मध्ये नायजेरिया देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा