3 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
3 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (3 ऑगस्ट 2020)
स्पेस एक्स कंपनीची ड्रॅगन ही कुपी अवकाश स्थानकाला भेट देऊन परत येत आहे:
- अमेरिकेच्या स्पेस एक्स कंपनीची ड्रॅगन ही कुपी अवकाश स्थानकाला भेट देऊन अवकाशवीरांसह परत येत आहे.
- खासगी कंपनीच्या माध्यमातून नासाने अवकाशवीर पाठवणे व त्यांचे परत पृथ्वीवर येणे या दोन्ही गोष्टी पहिल्यांदाच घडत असून ही अवकाश कुपी पृथ्वीवर सुरक्षित उतरवण्यासाठी स्पेस एक्स कंपनी मार्गदर्शन करीत आहे.
- मेक्सिकोच्या आखातात रविवारी दुपारी ही कुपी अवतरण करणार असून दोन महिन्यांच्या अवकाश वास्तव्यानंतर ती परत येत आहे.
- अवकाश वैमानिक डग हर्ले व बॉब हेनकेन हे दोन अमेरिकी अवकाशवीर आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकात स्पेस एक्सच्या ड्रॅगन अवकाशकुपीतून गेले होते.
Must Read (नक्की वाचा):
चांद्रयान-2 मोहिमेअंतर्गत ‘प्रज्ञान रोव्हर’ला घेऊन रवाना:
- चांद्रयान-2 मोहिमेअंतर्गत ‘प्रज्ञान रोव्हर’ला घेऊन रवाना झालेल्या ‘विक्रम लँडर’चा चंद्रावरील सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. . जवळपास 10 महिन्यांनंतर आता त्याबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे.
- गेल्या वर्षी ‘नासा’च्या फोटोंचा वापर करुन विक्रमचा ढिगारा(डेब्रिस) ओळखणारे चेन्नईचे इंजिनिअर शनमुग सुब्रमण्यन यांनी इस्त्रोला एक ईमेल पाठवून प्रज्ञान रोव्हर काही मीटर पुढे सरकल्याचा दावा केला आहे.
- भारतीय अवकाश संस्था इस्त्रोला पाठवलेल्या ई-मेलमध्ये शनमुग सुब्रमण्यन यांनी ‘नासा’ने मे महिन्यात जारी केलेल्या फोटोंवरुन प्रज्ञान काही मीटर पुढे आल्याचे संकेत मिळाले असल्याचा दावा केला आहे.
110 वर्षांच्या महिलेने करोनावर मात केली:
- देशात करोनाग्रस्तांचा आकडा 17 लाखांपार गेला आहे. जवळपास 37 हजार जणांना यामुळे जीव गमवावा लागलाय.
- कर्नाटकमध्ये एका 110 वर्षांच्या महिलेने करोनावर मात केली आहे. सिद्दम्मा असं या महिलेचं नाव असून त्या कर्नाटकमधील चित्रदूर्ग येथील रहिवासी आहेत.
- ’27 जुलै रोजी सिद्दम्मा यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना चित्रदूर्गच्या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
- हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला’, चित्रदूर्गचे जिल्हा सर्जन डॉ. बसवराज यांनी याबाबत माहिती दिली.
माजी रणजीपटूचा करोनाने निधन:
- सोलापुरातील माजी रणजी क्रिकेटपटू उमेश मनोहर दास्ताने यांचे काल रात्री करोना विषाणूच्या संसर्गामुळे निधन झाले.
- मध्य रेल्वेतून मुख्य तिकिट निरीक्षकपदावरून ते सेवानिवृत्त झाले होते.
- उमेश दास्ताने (वय 64) यांनी 1977-78 साली महाराष्ट्र विरूध्द गुजरात रणजी क्रिकेट सामन्यात सर्वप्रथम सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांनी पंधरा रणजी सामने खेळले होते. उत्कृष्ट फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजीसाठी ते प्रसिध्द होते.
- रणजीनंतर त्यांनी रेल्वे क्रिकेट संघाकडून खेळायला सुरूवात केली. भारतीय क्रिकेट संघाच्या उपकर्णधारपदाची धुराही त्यांनी सांभाळली होती.
दिनविशेष :
- हिंदी कवी मैथिलिशरण गुप्त यांचा जन्म 3 ऑगस्ट 1886 मध्ये झाला.
- स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, पत्री सरकारचे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार ‘क्रांतिसिंह नाना पाटील’ यांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 रोजी झाला.
- ‘द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी‘ची स्थापना सन 1900 मध्ये झाली.
- 3 ऑगस्ट 1948 मध्ये भारतीय अणूऊर्जा आयोगाची (Indian Atomic Energy Commission) स्थापना झाली.
- सन 1960 मध्ये नायजेरिया देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.