3 फेब्रुवारी 2022 चालू घडामोडी – Current Affairs

नीरज चोप्रा

3 February 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (3 फेब्रुवारी 2022)

लॉरेओ पुरस्कारासाठी नीरजला नामांकन :

  • ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राला बुधवारी प्रतिष्ठेच्या लॉरेओ ‘जागतिक लक्षवेधी कामगिरी’पुरस्कारासाठी नामांकन लाभले आहे.
  • तर या विभागात नामांकन मिळालेला नीरज हा पहिलाच भारतीय क्रीडापटू ठरला.
  • नीरजने गेल्या वर्षी टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली.
  • तर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा तो केवळ दुसरा भारतीय क्रीडापटू ठरला होता.
  • तसेच या कामगिरीची आता लॉरेस पुरस्कारांकडून दखल घेण्यात आली आहे.
  • ‘जागतिक लक्षवेधी कामगिरी’ या पुरस्कारासाठी नीरजसह रशियाचा टेनिसपटू डॅनिल मेदवेदेव, ब्रिटनची टेनिसपटू एमा रॅडूकानू, बार्सिलोनाचा फुटबॉलपटू प्रेडी, तिहेरी उडीपटू युलिमर रोहास आणि जलतरणपटू अरिअर्ने टिटमस हे खेळाडू शर्यतीत आहेत.
  • तर विजेत्यांच्या नावांची एप्रिलमध्ये घोषणा करण्यात येईल.

फेसबुक मेटाच्या डेटा सायन्स वर्कप्लेसमध्ये भारतीय व्यक्तीची प्रमुख म्हणून नियुक्ती :

  • गेल्या वर्षी जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग कंपनी असणाऱ्या फेसबुकने आपलं नाव बदलून मेटा असं केलं.
    तर रिब्रॅण्डींगच्या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे.
  • कंपनी जी कामं करतेय ती सर्व फेसबुक या नावाखाली योग्य वाटत नसल्याने कंपनीने मूळ कंपनीचं म्हणजेच पॅरेंट कंपनीचं नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • तसेच त्यानंतर आता मेटाने अर्पित अग्रवाल यांची कंपनीच्या लंडन कार्यालयात डेटा सायन्स, वर्कप्लेसचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.
  • अग्रवाल डेटा सायन्स डोमेनच्या आसपासच्या नवीन कल्पनांसाठी काम करणार आहेत.
  • मेटामध्ये सामील होण्यापूर्वी, अग्रवाल यांनी बंगळुरूस्थित फिनटेक स्टार्टअप खातबुकमध्ये अॅनालिटिक्स आणि डेटा सायन्स म्हणून दीड वर्ष काम केले.

मिचेलला ‘आयसीसी’चा क्रिकेट सद्भावना पुरस्कार :

  • न्यूझीलंडचा अष्टपैलू डॅरेल मिचेलला 2021 वर्षांतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ‘क्रिकेट सद्भावना’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात गेल्या वर्षी 10 नोव्हेंबरला ट्वेन्टी-20 विश्वचषकातील उपांत्य फेरीचा सामना झाला.
  • तर या सामन्यात इंग्लंडने विजयासाठी न्यूझीलंडपुढे 167 धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या डावातील 18वे षटक आदिल रशीदने टाकले.
  • तर या षटकातील पहिल्या चेंडूवर जिमी निशमकडे स्ट्राइक होती. त्याने समोरच्या दिशेने चेंडू मारला आणि त्यांना सहज एका धावेची संधी होती.
  • मात्र, समोरील मिचेलने धाव घेण्यास नकार दिला. आपला रशीदला धक्का लागल्याचे वाटल्याने त्याने ही कृती केली. त्यामुळेच मिचेल या पुरस्काराचा मानकरी ठरला.
  • तसेच हा पुरस्कार जिंकणारा तो न्यूझीलंडचा चौथा क्रिकेटपटू ठरला.

ट्वेन्टी-20 क्रमवारीत राहुल चौथ्या स्थानी :

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ताज्या ट्वेन्टी-20 क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत सलामीवीर केएल राहुलने एका स्थानाने आगेकूच करीत चौथे स्थान प्राप्त केले आहे.
  • तर विराट कोहली आणि नवनिर्वाचित कर्णधार रोहित शर्मा अनुक्रमे 10व्या आणि 11व्या क्रमांकावर कायम आहेत.
  • गोलंदाजांच्या यादीत भारताकडून वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार 20वा क्रमांक सर्वात अग्रेसर आहे, जसप्रित बुमरा 26व्या क्रमांकावर आहे.
  • अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत भारताचा एकही खेळाडू नाही.
  • तर वेस्ट इंडिजच्या अकील हुसैन 18वा क्रमांक आणि जेसन होल्डर 23वा क्रमांक यांनी क्रमवारीत भरारी घेतली आहे.

सहकार क्षेत्राला मोठा दिलासा :

  • अर्थसंकल्पात सहकारी संस्थांसाठीचा पर्यायी किमान कर (मॅट) सध्याच्या 18.5 टक्क्यांवरून कमी करून 15 टक्क्यांवर आणला आहे.
  • याचप्रमाणे 1 ते 10 कोटींपर्यंत उत्पन्न असलेल्या सहकारी संस्थांवरील अधिभार (सरचार्ज) 12 टक्क्यांवरून 7 टक्क्यांपर्यंतचा कर कमी करण्यात आल्याची घोषणा सीतारमण यांनी केली आहे.
  • सहकारी संस्थांसाठी पर्यायी किमान दर कमी केल्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.
  • तसेच त्यांचे बहुतांश सदय हे ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेशी संबंधित असल्याने त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा ठरेल.

दिनविशेष:

  • स्पेनने अमेरिकेच्या स्वातंत्र्यास 1783 मध्ये मान्यता दिली.
  • 1870 मध्ये अमेरिकेच्या संविधानातील 15 वा बदल अमलात आला त्यामुळे मतदानातील वंशभेद संपुष्टात आले.
  • भारतात पहिल्यांदाच विजेवर चालणारी रेल्वे 1925 मध्ये व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला या स्थानकांदरम्यान सुरू झाली.
  • 1966 मध्ये सोव्हिएत रशियाने लूना-9 हे मानवविरहित अंतराळयान चंद्रावर उतरवले.
  • वैद्यकशास्त्रातील पहिल्या महिला पदवीधर डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल यांचा जन्म 1821 मध्ये झाला.
Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago