3 January 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (3 जानेवारी 2022)
15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण आजपासून सुरू :
करोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन या विषाणूचा वेगाने प्रसार सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण आजपासून सुरू होत आहे.
मुलांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिन ही लस वापरण्यात येणार असून, राज्यातील 650 केंद्रांवर सुमारे साठ लाख मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
मुलांच्या लसीकरणासाठी कोविन संकेतस्थळावर नावनोंदणी 1 जानेवारी सुरू करण्यात आली आहे.
तसेच प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर नाव नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
2007 मध्ये किंवा त्यापूर्वी जन्मलेली सर्व मुले करोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी पात्र आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.
उदगीर येथील 95 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाध्यक्षपदी भारत सासणे यांच्या नावावर रविवारी महामंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.
नागपूर, मुंबई, पुणे व औरंगाबाद या सर्व घटक मंडळांकडून आलेल्या नावांवर चर्चा झाल्यानंतर काही मिनिटांतच सासणे हेच अध्यक्ष होतील, असे ठरविण्यात आले.
अध्यक्षपदासाठी घटक संस्थांकडून प्रवीण दवणे, रामचंद्र देखणे, तारा भवाळकर व अनिल अवचट यांची नावेही चर्चेत होती.
महिलांच्या विवाहाच्या वयाची चिकित्सा :
महिलांचे विवाहासाठीचे कायदेशीवर वय हे 18 वर्षांवरून 21 वर्षे करण्याची तरतूद असलेल्या विधेयकाची चिकित्सा ज्या संसदीय समितीकडून केली जाणार आहे, तिच्या 31 सदस्यांत केवळ एक महिला आहे.
तर हे बालविवाह प्रतिबंधक कायदा सुधारणा विधेयक हिवाळी अधिवेशनात लोकसभेत सादर करण्यात आले होते.
तसेच ते चिकित्सेसाठी संसदेच्या शिक्षण, महिला, बालक, युवा आणि क्रीडा विषयक स्थायी समितीकडे पाठविण्यात आले आहे.
तर या विधेयकातील तरतुदींचा देशातील महिलावर्गावर दूरगामी परिणाम होणार आहे.
दिनविशेष:
3 जानेवारी हा दिवस ‘बालिकादिन‘ तसेच ‘अॅक्युपेशन थेरेपी दिन‘ म्हणून पाळला जातो.
पहिल्या स्त्री शिक्षिका आणि समाजसुधारकसावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला होता.
हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक चेतन आनंद यांचा जन्म 3 जानेवारी 1921 मध्ये झाला होता.
सन 1950 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) उद्घाटन झाले.
3 जानेवारी 1952 रोजी स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका झाल्या.
नायगाव येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर सन 2004 मध्ये राज्य संरक्षित स्मारक राष्ट्राला अर्पण केले.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.