3 जानेवारी 2023 चालू घडामोडी – Current Affairs

3 January 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (3 जानेवारी 2023)

वाहनांसाठी ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’:

  • वाहतूक गुन्हे किंवा इतर स्वरूपाचे गुन्हे केल्यानंतर पोलिसांपासून पळ काढण्यासाठी वाहन क्रमांकांच्या पाट्यांमध्ये बदल केला जातो.
  • या गुन्ह्यांची उकल करणे, वाहन अपघात झाल्यानंतर वाहनधारकाची संपूर्ण माहिती उपलब्ध करताना येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हणजेच उच्च सुरक्षा क्रमांक पाटी बंधनकारक करण्यात आली आहे.
  • 1 एप्रिल 2019 पासून उत्पादित होणाऱ्या नवीन वाहनांना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने नव्या स्वरूपातील पाट्या बंधनकारक केल्या.
  • त्यामुळे आता 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना हा नियम अनिवार्य करण्यात आला आहे.
  • या नियमाचे पालन न केल्यास दंडाचीही तरतूद करण्यात आली आहे.
  • उच्च सुरक्षा क्रमांक पाटी म्हणजे एक थ्रीडी होलोग्राम स्टीकर असून, ज्यावर वाहनाच्या इंजिनाचा क्रमांक आणि वाहनाचा चॅसी (सांगाडा) क्रमांक असेल.
  • वाहनाची सुरक्षा आणि सुविधांना नजरेसमोर ठेवून या पाट्या तयार केलेल्या असतात.
  • वाहनधारकांना शासनाच्या अधिकृत नोंदणी संकेतस्थळावर (bookmyhsrp.com) वाहन क्रमांक, चॅसी क्रमांक, इंजिन क्रमांक, पत्ता, संपर्क, इंधन प्रकार इत्यादी माहिती भरावी लागणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय :

  • मोदी सरकारने 2016 साली घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला.
  • केंद्र सरकारने घेतलेला नोटबंदीचा निर्णय वैधच आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
  • केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या एकूण 58 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.
  • या याचिकांवरील सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने 7 डिसेंबर 2022 रोजी आपला निकाल राखून ठेवला होता.
  • तसेच आरबीआय कायद्यातील कलम 26 (2) हेदेखील असंवैधानिक ठरवले जाऊ शकत नाही, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

टीम इंडियातील खेळाडूंना पास करावी लागणार ‘डेक्सा’ चाचणी:

  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खेळाडूंच्या वाढत्या दुखापतीच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे.
  • याआधी खेळाडूंना संघात निवड होण्यापूर्वी केवळ यो-यो चाचणी द्यावी लागत होती, परंतु आता बोर्डाने डेक्सालाही निवड निकषांचा एक भाग बनवले आहे.
  • या स्कॅनमध्ये कोणतीही समस्या आढळल्यास खेळाडूची संघात निवड केली जाणार नाही.
  • यो-यो चाचणी व्यतिरिक्त, नॅशनल क्रिकेट अॅकॅडमी (NCA) पॅनेलने खेळाडूंना खेळण्यासाठी तंदुरुस्त घोषित करण्यापूर्वी चाचणीचा आणखी एक वैज्ञानिक स्तर जोडण्यासाठी डेक्सा स्कॅन जोडण्याची शिफारस देखील केली.
  • शरीराची रचना आणि हाडांचे आरोग्य मोजण्यासाठी प्रस्तावित आंतरराष्ट्रीय मानक म्हणजे डेक्सा स्कॅन, 10-मिनिटांची चाचणी जी संपूर्ण शरीराचे मोजमाप करते.

दिनविशेष:

  • 3 जानेवारी हा दिवस ‘बालिकादिन‘ तसेच ‘अॅक्युपेशन थेरेपी दिन‘ म्हणून पाळला जातो.
  • पहिल्या स्त्री शिक्षिका आणि समाजसुधारकसावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला होता.
  • हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक चेतन आनंद यांचा जन्म 3 जानेवारी 1921 मध्ये झाला होता.
  • सन 1950 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) उद्‍घाटन झाले.
  • 3 जानेवारी 1952 रोजी स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका झाल्या.
  • नायगाव येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर सन 2004 मध्ये राज्य संरक्षित स्मारक राष्ट्राला अर्पण केले.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.