3 January 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (3 जानेवारी 2023)
वाहनांसाठी ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’:
- वाहतूक गुन्हे किंवा इतर स्वरूपाचे गुन्हे केल्यानंतर पोलिसांपासून पळ काढण्यासाठी वाहन क्रमांकांच्या पाट्यांमध्ये बदल केला जातो.
- या गुन्ह्यांची उकल करणे, वाहन अपघात झाल्यानंतर वाहनधारकाची संपूर्ण माहिती उपलब्ध करताना येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हणजेच उच्च सुरक्षा क्रमांक पाटी बंधनकारक करण्यात आली आहे.
- 1 एप्रिल 2019 पासून उत्पादित होणाऱ्या नवीन वाहनांना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने नव्या स्वरूपातील पाट्या बंधनकारक केल्या.
- त्यामुळे आता 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना हा नियम अनिवार्य करण्यात आला आहे.
- या नियमाचे पालन न केल्यास दंडाचीही तरतूद करण्यात आली आहे.
- उच्च सुरक्षा क्रमांक पाटी म्हणजे एक थ्रीडी होलोग्राम स्टीकर असून, ज्यावर वाहनाच्या इंजिनाचा क्रमांक आणि वाहनाचा चॅसी (सांगाडा) क्रमांक असेल.
- वाहनाची सुरक्षा आणि सुविधांना नजरेसमोर ठेवून या पाट्या तयार केलेल्या असतात.
- वाहनधारकांना शासनाच्या अधिकृत नोंदणी संकेतस्थळावर (bookmyhsrp.com) वाहन क्रमांक, चॅसी क्रमांक, इंजिन क्रमांक, पत्ता, संपर्क, इंधन प्रकार इत्यादी माहिती भरावी लागणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय :
- मोदी सरकारने 2016 साली घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला.
- केंद्र सरकारने घेतलेला नोटबंदीचा निर्णय वैधच आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
- केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या एकूण 58 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.
- या याचिकांवरील सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने 7 डिसेंबर 2022 रोजी आपला निकाल राखून ठेवला होता.
- तसेच आरबीआय कायद्यातील कलम 26 (2) हेदेखील असंवैधानिक ठरवले जाऊ शकत नाही, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
टीम इंडियातील खेळाडूंना पास करावी लागणार ‘डेक्सा’ चाचणी:
- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खेळाडूंच्या वाढत्या दुखापतीच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे.
- याआधी खेळाडूंना संघात निवड होण्यापूर्वी केवळ यो-यो चाचणी द्यावी लागत होती, परंतु आता बोर्डाने डेक्सालाही निवड निकषांचा एक भाग बनवले आहे.
- या स्कॅनमध्ये कोणतीही समस्या आढळल्यास खेळाडूची संघात निवड केली जाणार नाही.
- यो-यो चाचणी व्यतिरिक्त, नॅशनल क्रिकेट अॅकॅडमी (NCA) पॅनेलने खेळाडूंना खेळण्यासाठी तंदुरुस्त घोषित करण्यापूर्वी चाचणीचा आणखी एक वैज्ञानिक स्तर जोडण्यासाठी डेक्सा स्कॅन जोडण्याची शिफारस देखील केली.
- शरीराची रचना आणि हाडांचे आरोग्य मोजण्यासाठी प्रस्तावित आंतरराष्ट्रीय मानक म्हणजे डेक्सा स्कॅन, 10-मिनिटांची चाचणी जी संपूर्ण शरीराचे मोजमाप करते.
दिनविशेष:
- 3 जानेवारी हा दिवस ‘बालिकादिन‘ तसेच ‘अॅक्युपेशन थेरेपी दिन‘ म्हणून पाळला जातो.
- पहिल्या स्त्री शिक्षिका आणि समाजसुधारकसावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला होता.
- हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक चेतन आनंद यांचा जन्म 3 जानेवारी 1921 मध्ये झाला होता.
- सन 1950 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) उद्घाटन झाले.
- 3 जानेवारी 1952 रोजी स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका झाल्या.
- नायगाव येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर सन 2004 मध्ये राज्य संरक्षित स्मारक राष्ट्राला अर्पण केले.