Current Affairs (चालू घडामोडी)

3 November 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

3 November 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (3 नोव्हेंबर 2018)

विनाआरक्षित रेल्वे तिकीट थेट मोबाइलवरून काढता येणार:

  • तिकीट खिडक्यांवरील रांगेत त्रस्त न होता कोणत्याही विनाआरक्षित मेल-एक्स्प्रेसचे तिकीट आता थेट मोबाइलवरून काढता येणार आहे.
  • रेल्वे सूचना प्रणाली केंद्राची निर्मिती असलेल्या ‘यूटीएस अ‍ॅप‘मधून या सुविधेचा लाभ घेता येईल. प्रवाशांना रेल्वेने दिलेली ही दिवाळी भेटच म्हणता येईल.
  • यापूर्वी यूटीएस अ‍ॅपमधून केवळ उपनगरीय रेल्वे तिकीट काढले जात होते. आता हे अ‍ॅप ‘अपडेट’ केल्याने देशभरातील सर्व रेल्वे झोनमधील विनाआरक्षित मेल-एक्स्प्रेसचे तिकीट बुक करता येणार आहे.
  • 1 नोव्हेंबर पासून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांना अ‍ॅप अपडेट करून या सुविधेचा लाभ घेता येणार असल्याचे रेल्वे सूचना प्रणाली केंद्राचे महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी सांगितले.

भारत सरकारच्या वादावर नाणेनिधीची नजर:

  • भारतसरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्यात सुरू असलेल्या वादविवादाकडे आमचे बारकाईने लक्ष असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे.
  • जगातील कुठल्याही केंद्रीय बँकेच्या स्वातंत्र्याबाबत तडजोड करण्याच्या हालचालींना आपला विरोध असल्याचेही नाणेनिधीने म्हटले आहे.
  • केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी अलीकडेच रिझर्व्ह बँकेवर टीका केली होती. 2008 ते 2014 या काळातील बेछूट कर्ज वाटपावर नियंत्रण ठेवण्यास रिझर्व्ह बँक अपयशी ठरली असून, त्याचा परिणाम म्हणून देशातील आजची अनुत्पादक भांडवलाचे संकट निर्माण झाले आहे, असे जेटली यांनी म्हटले होते.
  • तसेच रिझर्व्ह बँकेवर सरकारचा प्रचंड दबाव असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत.

अमेरिकेकडून आठ देशांना इराणचे तेल घेण्याची सवलत:

  • इराणविरोधात 5 नोव्हेंबरपासून नव्याने लागू होत असलेल्या निर्बंधांतही भारतासह आठ देशांना इराणकडून कच्चे तेल खरेदी करण्याची सवलत देण्याचे अमेरिकेने मान्य केले आहे.
  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची संपूर्ण कोंडी करण्यासाठी हे निर्बंध लावले आहेत. इराणकडून तेल खरेदी पूर्णत: थांबविण्याचे निर्देश प्रशासनाने जगभरातील देशांना दिले होते. परंतु इराणकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करणाऱ्या भारतासारख्या काही देशांनी याला आक्षेप घेतला होता.
  • इराणकडील तेलखरेदी बंद केल्यास जगभरात कच्च्या तेलाच्या किमती भडकतील. त्यामुळे तडजोडीचा मार्ग म्हणून ट्रम्प प्रशासनाने आठ देशांना इराणकडून तेल खरेदीची सवलत दिली आहे.
  • भारतासह जपान व दक्षिण कोरिया यांचा या देशांत समावेश आहे. चीन हा इराणी तेलाचा सर्वांत मोठा आयातदार आहे. चीनला तेल आयातीची सवलत मिळाली असली तरी अटींच्या मुद्यावर दोन्ही देशांत अजून चर्चा सुरू आहे, असे सूत्रांनी सांगितले.
  • इतर चार देश कोणते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, ही सवलत तात्पुरती असणार आहे.

सहा उल्का पृथ्वीजवळून जाणार:

  • दरवर्षी किमान दहा ते बारा उल्का पृथ्वीजवळून जात असतात. त्यातील एक-दोन उल्का वगळता इतर उल्का धोकादायक नसतात. आजपर्यंत पृथ्वीवर सुमारे 150 उल्का पडून सरोवर निर्माण झाले आहेत.
  • अजूनही काही उल्का पृथ्वीच्या सभोवती प्रदक्षिणा घालत आहेत. त्यापैकी काही अत्यंत धोकादायक श्रेणीत येतात. सुरू असलेल्या नोव्हेंबर महिन्यात पृथ्वीजवळून सुमारे 107 उल्का जात असून त्यातील सहा उल्का पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहेत.
  • रविवार, 4 नोव्हेंबरला ‘अ‍ॅस्टेरॉईड अ‍ॅटेन 2014 यूव्ही-1‘, ‘अ‍ॅटेन 2002 व्हीई-68‘, सहा नोव्हेंबरला ‘अपोलो टीएफ-3‘, सात नोव्हेंबरला ‘अ‍ॅटेन 2010 व्हीओ‘, नऊ नोव्हेंबरला ‘अपोलो 2015 टीएल-175‘, 12 नोव्हेंबरला ‘अपोलो 2018 क्यूएन-1‘ या उल्का पृथ्वी जवळून जाणाऱ्या आहेत.
  • या सर्व उल्का 61 ते 150 फूट व्यासांच्या असून त्या (0.010 ते 0.050 खगोलीय एकक) चंद्राच्या कक्षेजवळून लांबून जात आहेत. या उल्का धोकादायक श्रेणीत नाहीत. तरी चंद्र किंवा इतर ग्रहांच्या गुरुत्वामुळे दिशा बदलल्यास धोक्याच्या ठरू शकतात.

रविंद्र मराठेंकडे पुन्हा बँक ऑफ महाराष्ट्रचे नेतृत्व:

  • डी.एस. कुलकर्णी यांना कर्ज देताना नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपांतून निर्दोष सुटलेले रविंद्र मराठे यांची 2 नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्‍ती करण्यात आली. मराठे यांना जून महिन्यात डी.एस कुलकर्णी यांच्या कर्जप्रकरणात निलंबित करण्यात आले होते.
  • पुणे पोलिसांनी आर्थिक गुन्हे शाखासंदर्भातील विशेष न्यायालयात नुकताच सादर केलेल्या तपास अहवालात मराठे यांना क्‍लिनचीट दिली होती. डी.एस कुलकर्णी कर्ज प्रकरणात मराठे यांचा संबध नाही, असा अहवाल पोलीसांनी न्यायालयात सादर केला.
  • अलीकडेच बँकेच्या संचालक मंडळाची बैठक झाली. ज्यामध्ये मराठे आणि आर.के. गुप्ता यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सेबी (एलओडीआर) कायद्याअंतर्गत कलम 30 नुसार हा निर्णय घेतल्याचे बॅंक ऑफ महाराष्ट्रने शेअर बाजाराला कळवले आहे.

दिनविशेष:

  • 1817 या वर्षी कॅनडातील सर्वात जुनी चार्टर्ड बँक बँक ऑफ मॉन्ट्रियल सुरु झाली.
  • 3 नोव्हेंबर 1838 रोजी टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राचे द बॉम्बे टाईम्स अण्ड जनरल ऑफ कॉमर्स म्हणून मुंबई मध्ये पहिले प्रकाशन.
  • नोबेल पुरस्कार प्रमाणित मा. अमर्त्य सेन यांचा जन्म 3 नोव्हेंबर 1933 मध्ये झाला.
  • सन 1944 मध्ये भारतीय संगीत प्रचारक मंडळातर्फे पुण्यात अखिल भारतीय संगीत परिषदेस सुरुवात.
  • वन वर्ल्ड ट्रेड सेंटर अधिकृतपणे सन 2014 मध्ये सुरु झाले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Sandip Rajput

Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago