3 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
भारतीय महिलांची तिसऱ्या स्थानावर झेप
3 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (3 ऑक्टोबर 2020)
भारतात करोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण 1.56 टक्के इतकं:
भारतात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या शुक्रवारी एक लाखांवर पोहोचली.
जगभरात आतापर्यंत करोनामुळे 10 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. याचा अर्थ जगभरातील एकूण मृत्यूंपैकी 10 टक्के मृत्यू भारतात झाले आहेत.
भारताच्या तुलनेत फक्त अमेरिका आणि ब्राझिलमध्ये सर्वात जास्त मृत्यूंची नोंद झाली आहे. अमेरिकेत 2 लाख 12 हजार तर ब्राझिलमध्ये 1 लाख 45 हजार जणांचा करोनाची लागण होऊन मृत्यू झाला आहे.
करोनामुळे जगभरात दिवसाला चार ते सहा हजार रुग्णांच्या मृत्यूची नोंद होत आहे.
दुसरीकडे भारतात गेल्या एका महिन्यापासून दिवसाला जवळपास एक हजार रुग्ण आढळत आहेत.
गेल्या तीन महिन्यांपासून भारतातील मृत्यूदर कमी होताना दिसत आहे. भारतात करोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण 1.56 टक्के इतकं झालं आहे.
‘एच 1 बी’ व्हिसा बंदी आदेशास अमेरिकी न्यायालयाची स्थगिती:
अमेरिकी न्यायालयाने एच 1 बी व्हिसावर घालण्यात आलेल्या तात्पुरत्या बंदीच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे.
अध्यक्ष ट्रम्प यांनी हा आदेश जारी करताना त्यांच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन केले आहे, असे सांगून न्यायालयाने ट्रम्प प्रशासनाला चपराक दिली.
व्यापार व अंतर्गत सुरक्षा मंत्रालय यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर ‘नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट ऑफ कॅलिफोर्निया’चे न्यायाधीश जेफ्री व्हाइट यांनी हा निकाल दिला.
व्हीसा बंदीमुळे अनेकउत्पादक कंपन्यांना आर्थिक दुरवस्था असताना महत्त्वाची पदे भरणे कठीण झाले होते, असे राष्ट्रीय उत्पादक संघटनेने म्हटले आहे.
एच 2 व्हिसा हे कृषीतर हंगामी कामगारांना दिले जातात. तर जे व्हिसा हे सांस्कृतिक आदानप्रदानासाठी वापरले जातात.
एल व्हिसा हे व्यवस्थापक व बहुराष्ट्रीय कंपन्यांतील व्यवस्थापकपदावरील कर्मचाऱ्यांसाठी वापरले जातात. या सर्व प्रकारच्या व्हिसांवर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षअखेरीपर्यंत बंदी घातली होती.
भारतीय महिलांची तिसऱ्या स्थानावर झेप:
भारतीय महिला क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रमवारीत न्यूझीलंडला मागे टाकत तिसरं स्थान पटकावलं आहे.आयसीसीने शुक्रवारी महिला क्रिकेट संघांसाठी नवी क्रमवारी जाहीर केली.
या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या संघाने आपलं पहिलं आणि दुसरं स्थान कायम राखलं आहे.
ऑस्ट्रेलियन महिला संघाच्या खात्यात 291 तर इंग्लंड महिला संघाच्या खात्यात 280 गुण जमा आहेत.
फेब्रुवारीत ऑस्ट्रेलियात झालेल्या महिला टी-20 विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणारा भारतीय महिला संघ 270 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.
न्यूझीलंडचा संघ आणि भारताचा संघ यांच्यात फक्त एका गुणाचा फरक आहे.
भारतीय महिला संघाच्या खेळाडू सध्या युएईत महिला आयपीएल स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
4 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत बीसीसीआय युएईत ३ संघांमध्ये ही स्पर्धा खेळवणार असल्याचं समजतंय.
दिनविशेष:
हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1903 मध्ये झाला.
इराकला सन 1932 मध्ये युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.
जनरल डी. बोनोच्या नेतृत्त्वाखाली इटलीने सन 1935 या वर्षी इथिओपिया पादाक्रांत केले.
सन 1952 मध्ये युनायटेड किंग्डमने यशस्वीरित्या अण्वस्त्र शस्त्रांची चाचणी करून जगातील तिसरे परमाणु ऊर्जा सशस्त्र राष्ट्र बनले.
Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.