3 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
3 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (3 सप्टेंबर 2020)
केंद्र सरकारने 118 अॅप्सवर बंदी घातली:
- केंद्र सरकारने 118 अॅप्सवर बंदी घातली आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ही बंदी घालण्यात आली आहे.
- यामध्ये तरुणांमध्ये प्रचंड वेड असणाऱ्या पबजी गेमचाही समावेश आहे.
- भारताच्या सायबर स्पेसची सुरक्षा आणि सार्वभौमत्व राखण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचं मंत्रालयाने निर्णय जाहीर करताना सांगितलं आहे.
- माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 69 अ अंतर्गत पबजी मोबाइल गेमवर बंदी आणण्यात आली आहे.
- बॅन कऱण्यात आलेल्या अॅप्समध्ये Baidu, Baidu Express Edition, Tencent Watchlist, FaceU, WeChat Reading Tencent Weiyun यांचाही समावेश आहे. या सर्व अॅप्सचा चीनशी संबंध असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
Must Read (नक्की वाचा):
78 हजार 357 नव्या रुग्णांची नोंद:
- दैनंदिन करोना रुग्णवाढीचा आकडा अजूनही 70 हजारांहून असून गेल्या चोवीस तासांमध्ये 78 हजार 357 नव्या रुग्णांची नोंद झाली.
- देशभरात रुग्णसंख्या 37 लाख 69 हजार 523 वर पोहोचली. मृत्यूची संख्याही वाढत असून ती 66 हजार 333 झाली आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये 1,045 रुग्णांचा मृत्यू झाला.
- करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्येतही वाढ होत असून सलग सहाव्या दिवशीही 60 हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले.
- 12 राज्यांमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय सरासरी 76.98 टक्के आहे.
- करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता 29 लाख 1हजार 908 झाली असून ती उपचाराधीन रुग्णांपेक्षा 20 लाखांहून अधिक आहे.
भारताच्या सुमीत नागलचा धडाकेबाज विक्रम:
- भारताचा टेनिसपटू सुमित नागल याने US OPEN टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत विजय मिळवला.
- २३ वर्षीय सुमितने अमेरिकेच्या ब्रॅडली क्लॅनला नमवून दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला.
- जागतिक क्रमवारीत 124व्या स्थानी असणाऱ्या सुमीत नागलने ब्रॅडलीला 6-1, 6-3, 3-6, 6-1 असे पराभूत केले.
- या विजयासह 7 वर्षात ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात दुसऱ्या फेरीत पोहोचणारा सुमीत हा पहिलाच भारतीय ठरला.
- सात वर्षानंतर भारतीय टेनिसपटूने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला.
- या आधी सात वर्षांपूर्वी सोमदेव देवबर्मनने अशी कामगिरी करून दाखवली होती.
दिनविशेष :
- सन 1752 मध्ये अमेरिकेत ग्रेगरियन कॅलेंडरचा वापर सुरू झाला.
- श्रीमती अॅनी बेझंट यांनी 3 सप्टेंबर 1916 मध्ये होमरुल लीगची स्थापना केली.
- महाराष्ट्र शाहीर कृष्णराव तथा शाहीर साबळे यांचा जन्म 3 सप्टेंबर 1923 मध्ये झाला.
- लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार प्यारेलाल शर्मा यांचा जन्म 3 सप्टेंबर 1940 मध्ये झाला.
- सन 1971 मध्ये कतारला स्वातंत्र्य मिळाले.