30 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
30 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (30 ऑगस्ट 2018)
टोल नाक्यावर व्हीआयपी आणि न्यायाधीशांसाठी स्वतंत्र मार्गिका :
- राष्ट्रीय महामार्गावरच्या सर्व टोल नाक्यांवर व्हीआयपी आणि विद्यमान न्यायाधीशांसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करा असे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत.
- आदेशाचे पालन न झाल्यास तो कोर्टाचा अवमान समजला जाईल असेही न्यायालयाने बजावले आहे.
- तर स्वतंत्र मार्गिकेचा विषय सोडवला नाही तर सर्व संबंधित यंत्रणांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल असे न्यायालयाने सांगितले आहे.
- तसेच संपूर्ण देशभरातील राष्ट्रीय महामार्गांसाठी आपला हा आदेश लागू असेल असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
भारतीय अंतराळवीर अवकाशात जाण्याचा मुहूर्त ठरला :
- भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने ‘मिशन गगनयान’साठी डिसेंबर 2021 चा मुहूर्त ठरवला आहे.
- तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिशन गगनयानसाठी 2022 सालापर्यंतची मुदत दिली होती. पण इस्त्रोने त्यापेक्षा वर्षभर आधीच ही मोहिम प्रत्यक्षात आणण्याच संकल्प सोडला आहे.
- मिशन गगनयान ही भारताची महत्वकांक्षी मोहिम असून भारत प्रथमच स्वबळावर आपल्या अंतराळवीरांना अवकाशात पाठवणार आहे.
- तसेच इस्त्रोसाठी ही अत्यंत आव्हानात्मक मोहिम असून अवकाशवीरांना प्रत्यक्ष अंतराळात पाठवण्याआधी वेगवेगळया कठिण चाचण्या कराव्या लागणार आहेत.
- यामध्ये डिसेंबर 2020 आणि जून 2021 मधील दोन मानवरहित मोहिमांचा समावेश आहे.
- तर इस्त्रोला या मोहिमेसाठी आणखी वेगळया प्रकारचे तंत्रज्ञान विकसित करावे लागणार आहे. क्रू सपोर्ट सिस्टिम, सर्व्हीस मॉडयुल आणि ऑरबिटल मॉडयुल बनवावे लागणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
कर्ज मिळविण्यासाठी गुगलही करणार आता मदत :
- जगातील सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन म्हणून ओळख असलेल्या गुगलने नुकतीच एका महत्त्वाच्या गोष्टीची घोषणाकेली आहे.
- सामान्यांना कधी घर घेण्यासाठी, कधी गाडी घेण्यासाठी तर कधी शिक्षणासाठी कर्जाची आवश्यकता असते. त्यावेळी आता गुगल मदतीला धावून येणार आहे.
- विशेष म्हणजे हे लोन तुम्हाला घरबसल्या मिळू शकणार आहे. गुगलची मालकी असलेल्या अल्फाबेट या कंपनीकडून ही सुविधा दिली जाणार आहे.
- यासाठी अल्फाबेटने 4 भारतीय बँकांशी करार करणार आहे. त्यामुळे आता कर्ज मिळण्याचा सोपा आणि चांगला पर्याय ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.
- यामध्ये एचडीएफसी, आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा आणि फेडरल बँक यांचा समावेश आहे.
यासाठी फार मोठी प्रक्रिया नसून काही सेकंदांमध्ये हे कर्ज मान्य होणार असल्याचेही गुगलकडून सांगण्यात आले आहे.
चांद्रयान-2चे जानेवारीत प्रक्षेपण :
- भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येत्या जानेवारी महिन्यात चांद्रयान-2 या अंतराळ यानाचे प्रक्षेपण करणार आहे.
- चांद्रयान-2 या अंतराळ यानाचे जीएसएलव्ही-एमके-3-एम 1 या प्रक्षेपकाद्वारे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
- चांद्रयान-2च्या वजनामध्ये वाढ झाली असून आता ते 3.8 टन इतके झाले आहे. त्यामुळेच चांद्रयान-2चे जीएसएलव्हीद्वारे प्रक्षेपण करता येणार नाही, असेही सिवन यांनी सांगितले.
- तसेच गरजेनुसार प्रक्षेपण यान अद्ययावत करून त्याला जीएसएलव्ही-एमके-३ असे स्वरूप देण्यात आले आहे.
- तर सदर यानाचे प्रक्षेपण 3 जानेवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान करण्याचे ठरविण्यात आले आहे.
- दक्षिण ध्रुवाच्या जवळ जाणारे हे जगातील पहिलेच अभियान आहे, असेही सिवन यांनी सांगितले.
आशियाई क्रीडा स्पर्धेत हेप्टॉथ्लॉनमध्ये भारताला पहिलेच सुवर्णपदक :
- आशियाई क्रीडा स्पर्धेत हेप्टॉथ्लॉनमध्ये भारताला पहिलेच सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या स्वप्ना बर्मनने अत्यंत प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन हे यश मिळवले आहे.
- स्वप्नाच्या सुवर्णपदक विजेत्या कामगिरीमुळे आज हेप्टॉथ्लॉन या खेळाचे नाव अनेकांना समजले असेल.
- हेप्टॉथ्लॉनमध्ये एकूण सात खेळांचा समावेश होतो. तर तिने दोन दिवसात 6026 गुणांची कमाई करुन सुवर्णपदकाला गवसणी घातली.
- पात्रता फेरीमधील पहिल्या दोन (भालाफेक आणि उडी) निकषांमध्ये मोठी आघाडी घेत पहिले स्थान कायम राखल्यानंतर स्वप्नाने 800 मीटरची शर्यत पूर्ण करून सुवर्णपदकावर नाव कोरले.
- हेप्टॉथ्लॉन या खेळात अॅथलेटीक्सच्या सात प्रकारांचा समावेश असतो. यामध्ये 200 मी. आणि 800 मी. धावण्याची शर्यत होते.
- त्याचबरोबर 100 मी. अडथळ्याची शर्यत खेळवली जाते. त्यानंतर उंच उडी. लांब उडी, गोळाफेक आणि भालाफेक या प्रकारांचा समावेश असतो.
अचंथा-मनिकाला ऐतिहासिक कांस्यपदक :
- भारताची मिश्र दुहेरी जोडी मनिका बत्रा व अचंथा शरथ कमल यांना उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला असला, तरी त्यांनी ऐतिहासिक कांस्यपदकाला गवसणी घातली आहे.
- भारताच्या पुरुष संघाने कांस्यपदक मिळवले होते.
- त्यामुळे तब्बल 60 वर्षांनी भारताला टेबल टेनिसमध्ये पदक मिळाले.
अरपिंदर सिंहची ‘तिहेरी उडी’ सुवर्णपदकावर :
- इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये अकराव्या दिवशी अखेरच्या सत्रात भारताच्या खात्यात सुवर्णपदकाची भर पडली आहे.
- तिहेरी उडीत भारताच्या अरपिंदर सिंहने सुवर्णपदकची कमाई केली आहे. तर या स्पर्धेतलं भारताचं हे दहावं सुवर्णपदक ठरलंय.
- याच प्रकारात भारताचा राकेश बाबुही अंतिम फेरीत दाखल झाला होता, मात्र पदकांच्या शर्यतीत आपलं आव्हान कायम राखणं त्याला जमलं नाही.
दिनविशेष :
- 30 ऑगस्ट 1835 मध्ये ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराची स्थापना झाली.
- अमेरिकेतील ह्यूस्टन शहराची स्थापना 30 ऑगस्ट 1835 मध्ये झाली.
- नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ अर्नेस्ट रुदरफोर्ड यांचा 30 ऑगस्ट 1871 मध्ये जन्म झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा