30 August 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (30 ऑगस्ट 2019)
पॅरालिम्पिकपटू दिपा मलिक खेलरत्न पुरस्काराने सन्मानित :
- भारताची आघाडीची पॅरालिम्पिकपटू दिपा मलिकचा खेलरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनाचं औचित्य साधून राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिपाचा सत्कार केला. राष्ट्रपती भवनात या दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. हा सन्मान मिळवणारी दिपा पहिला पॅरालिम्पीकपटू ठरली आहे.
- तर 2016 साली रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत दिपाने रौप्यपदकाची कमाई केली होती.
- तसेच दिपा मलिकसोबत कुस्तीपटू बजरंग पुनियालाही खेलरत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. मात्र बजरंग सध्या रशियामध्ये आगामी जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी तयारी करतो आहे. या कारणासाठी तो या सोहळ्याला हजर राहू शकला नाही.
देशात नवी वाहतूकदंड आकारणी सोमवारपासून :
- वाहतूक नियमांचा भंग केल्यास वाहनधारकांना 1 सप्टेंबरपासून अधिक दंड भरावा लागणार आहे. वाढते रस्ते अपघात रोखण्याचा उपाय म्हणून दंडाच्या रकमेत ही वाढ झाली आहे.
- नव्या मोटार वाहतूक कायद्यातील 63 तरतुदी लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारने अधिसूचना काढली आहे. अर्थसंकल्पी अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सदनात मोटार वाहतूक दुरुस्ती विधेयक संमत करण्यात आले होते.
- तर वाहतूक नियमांचा भंग केल्यास आकारला जाणारा दंड आता कित्येक पटीने वाढवण्यात आला आहे. यात कमीत कमी म्हणजे 500 रुपये दंड हा रस्ते नियम तोडण्यासाठी असून जास्तीत जास्त म्हणजे 25 हजार रुपये दंड आणि तीन वर्षांचा तुरुंगवास हा अल्पवयीन मुला-मुलीने वाहन चालवून गुन्हा केल्यास मालक वा पालकाला भोगावा लागणार आहे.
- तसेच परवाना नसताना वाहन चालवल्यास होणारा दंड 500 रुपयांवरून 5 हजार रुपये केला गेला आहे. मर्यादेपेक्षा वेगाने वाहन चालवल्यास आता 400 रुपयांऐवजी 2 हजार रुपये दंड आकारला जाईल. कायमस्वरूपी चालक परवाना
मिळवण्याची प्रक्रियाही अधिक कडक करण्यात आली आहे. रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून न दिल्यास दहा हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.
इस्रायलने बनवली शत्रूच्या ड्रोनवर नियंत्रण मिळवण्याची टेक्नॉलॉजी :
- शत्रूच्या प्रदेशातील माहिती गोळा करण्याबरोबर टार्गेटसवर हल्ला करण्यासाठी ड्रोन विमानांचा वापर केला जातो. या ड्रोन विमानांच्या बाबतीत इस्रायलने भन्नाट टेक्नॉलॉजी विकसित केली आहे. या टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने शत्रूने
पाठवलेल्या ड्रोन विमानावर पूर्णपणे नियंत्रण मिळवता येते. इस्रायलमधल्या एका डिफेन्स टेक्नॉलॉजी कंपनीने डब्ड स्कायलॉक हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. - या टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने ऑपरेटर शत्रूच्या ड्रोन विमानाचे लँडिंग करुन आवश्यक विश्लेषणही करु शकतो. ठराविक अंतरावर असताना शत्रूचे ड्रोन विमान आम्ही हेरतो. डब्ड स्कायलॉकच्या सहाय्याने एकाचवेळी 200 ड्रोन विमानांवर
नियंत्रण मिळवता येते असे स्कायलॉक स्टेटसचे प्रोडक्ट मॅनेजर असफ लेबोवित्झ यांनी सांगितले. - तसेच दोन महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमात स्कायलॉकने या टेक्नॉलॉजीचे सादरीकरण केले. ड्रोनवर नियंत्रण मिळवण्यासाठी आम्ही एका जागा निश्चित केली. ड्रोन विमान आणि ऑपरेटरमधल्या संपर्कात अडथळा आणून ड्रोनवर नियंत्रण मिळवतो.
अमेरिकेच्या F-35 ला टक्कर देणार रशियाचं Su-57E फायटर विमान :
- रशियाने अखेर एमएकेएस इंटरनॅशनल एअर शो मध्ये पाचव्या पिढीचे Su-57E हे अत्याधुनिक फायटर विमान सादर केले आहे. या विमानाची थेट टक्कर अमेरिकेच्या F-35 स्टेल्थ विमानाबरोबर असणार आहे.
- Su-57E या विमानाची अन्य देशांना विक्री करणार असल्याचे रशियाने स्पष्ट केले आहे. संभाव्य खरेदीदार देशांबरोबर याबद्दल लवकरच चर्चा सुरु होणार आहे. सुखोईने Su-57E विमान विकसित केले आहे.
- हवा आणि जमिनीवरील विविध टार्गेटसचा लक्ष्यभेद करणारे Su-57E हे पाचव्या पिढीचे एक बहुउपयोगी विमान आहे. दिवसा-रात्री, कुठल्याही वातावरणात तुम्ही या विमानाचा वापर करु शकता. चौथ्या पिढीच्या फायटर विमानाशी
तुलना करता रडारला चकवा देणारे स्टेल्थ तंत्रज्ञान या फायटर विमानामध्ये आहे. शत्रूच्या रडारवर हे विमान सापडण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शत्रूच्या प्रदेशात घुसून हल्ला करणे अधिक सोपे होईल. - तर अत्याधुनिक तंत्रज्ञान, शस्त्रास्त्राची सिस्टिम आणि सुपरसॉनिक वेग Su-57E ला अधिक घातक बनवते.
भारतीय वायुसेना 33 लढाऊ विमानं खरेदीच्या तयारीत :
- भारतीय वायुसेना लढाऊ विमानांची कमतरता आता भरून काढण्याच्या तयारीत आहे. यासाठी वायुसेनकडून 33 लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी प्रस्ताव तयार केला जात आहे.
- तर या प्रस्तावानुसार वायुसेना 21 ‘मिग-29’ व 12 ‘सुखोई -30’ अशी एकूण 33 लढाऊ विमानं खरेदी केली जाणार असल्याची माहिती आहे.
- वायुसेनेच्या या प्रस्तावास जर मंजूरी मिळाली तर वायुदलास मोठी बळकटी मिळणार आहे.
दिनविशेष :
- 30 ऑगस्ट 1835 मध्ये ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराची स्थापना झाली.
- अमेरिकेतील ह्यूस्टन शहराची स्थापना 30 ऑगस्ट 1835 मध्ये झाली.
- नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ अर्नेस्ट रुदरफोर्ड यांचा 30 ऑगस्ट 1871 मध्ये जन्म झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा