30 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

30 January 2019 Current Affairs In Marathi

30 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (30 जानेवारी 2019)

न्यूझीलंडविरुद्ध भारतीय महिला संघाचा मालिका विजय:

  • गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर सलामीवीर फलंदाज स्मृती मानधनाच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने दुसऱ्या वन-डे क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडचा 8 गडी राखून पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने सरशी साधली.
  • भारतीय महिलांनी 1995 मध्ये एकमेव वन-डे सामना जिंकून मालिका जिंकली होती. त्यानंतर 2005-06 मध्ये न्यूझीलंडने 4-1 अशा फरकाने भारताला पराभूत केले होते. त्यामुळे तब्बल 24 वर्षांनी भारतीय महिला संघाने न्यूझीलंडमध्ये वन-डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.
  • नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारणार्‍या भारताने न्यूझीलंडचा डाव 44.2 षटकांत 161 धावांत गुंडाळला. त्यानंतर ‘प्लेअर आॅफ द मॅच’ मानधना (नाबाद 90) व कर्णधार मिताली राज (नाबाद 63) यांनी तिसर्‍या विकेटसाठी 151 धावांची अभेद्य भागीदारी करीत संघाला विजय मिळवून दिला. एकवेळ भारताची 2 बाद 15 अशी अवस्था होती. सलामीवीर जेमिमा रोड्रिगेज (0) आणि दीप्ती शर्मा (8) यांना मोठी खेळी करता आली नाही.
  • मानधनाचे हे गेल्या 10 वन-डे सामन्यांतील सातवे अर्धशतक होते. आज तिने 82 चेंडूंना सामोरे जाताना 90 धावा केल्या. दुसर्‍या टोकाकडून मितालीने 111 चेंडूंना सामोरे जात 63 धावा केल्या. मितालीने षट्कार ठोकत भारताला 35.2 षटकांत 2 बाद 166 धावांची मजल मारून दिली.

गांधी विचार मांडणारी लोकसभेची दिनदर्शिका:

  • महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती देशभर साजरी केली जात आहे. त्यानिमित्ताने या वर्षीची लोकसभेची दिनदर्शिकाही गांधीजींचे विचार मांडणारी आहे. 1999 पासून लोकसभा सचिवालय दर वर्षी संसदीय परंपरा कथित करणारी दिनदशिर्का प्रकाशित करते. mahatma gandhi
  • 2019ची दिनदर्शिका गांधीजींची शिकवण, त्यांचे आदर्श यावर आधारित आहे. गांधीजींच्या स्वातंत्र्यलढय़ातील प्रसंगांचे चित्रण तसेच, त्यांच्याशी निगडित वस्तू आणि साधनांमधून प्रकट होणारी मूल्ये यांचे विवेचन पाहायला मिळते.
  • देशातील शेवटच्या व्यक्तीलाही समान संधी मिळणे म्हणजे लोकशाही असे गांधीजी मानत. त्याचे प्रतीक संसद. त्यांनी दिलेला स्वदेशीचा मंत्र सांगणारा चरखा. गांधीजींचा चष्मा हा सत्य शोधाचे प्रतीक म्हणून दाखवण्यात आला आहे.
  • नि:स्वार्थ भावातून निर्भयता दर्शवणारी पदयात्रा. स्वत:च्या हक्कांसाठी लढण्याचे बळ देणारा मिठाचा सत्याग्रह. साधनसामग्रीचा महत्त्व कथिक करणारे बापू. शांततेतून आत्मशोधाचा गांधीजींचा विचार. सत्यशोधनाची वाट. वेळचा सदुपयोग. बाह्य़ स्वच्छता आणि अंतर्मनाची स्वच्छता अशा गांधीजींच्या शिकवणीची प्रतीके या दिनदर्शिकेत पाहायला मिळतात.

माजी जगज्जेत्यां व्लादिमिर क्रॅमनिकची निवृत्ती जाहीर:

  • रशियाचा माजी जगज्जेता व्लादिमिर क्रॅमनिक याने 29 जानेवारी रोजी व्यावसायिक बुद्धिबळातून निवृत्ती जाहीर केली. नेदरलँड्समधील विक आन झी येथे झालेल्या टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेनंतर त्याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली.
  • जवळपास तीन दशके व्यावसायिक बुद्धिबळात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या क्रॅमनिकने 1996 मध्ये जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी झेप घेत सर्वानाच अचंबित केले होते. अशी कामगिरी करणारा तो सर्वात युवा बुद्धिबळपटू ठरला होता. त्यानंतर त्याचा हा विक्रम नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने 2010 मध्ये मोडीत काढला.
  • 2000 साली ग्रँडमास्टर क्रॅमनिकने गॅरी कास्पारोव्हचे साम्राज्य मोडीत काढत पहिल्यांदा जगज्जेता होण्याचा मान पटकावला. त्यानंतर सात वर्षे त्याने जगज्जेतेपदाचा किताब आपल्याकडेच कायम राखला.
  • तर 2007 मध्ये भारताच्या विश्वनाथन आनंदने त्याच्याकडून जगज्जेतेपदाचा किताब हिसकावून घेतला. 43 वर्षीय क्रॅमनिकने व्यावसायिक बुद्धिबळातील जवळपास सर्वच प्रतिष्ठेच्या स्पर्धाच्या जेतेपदांवर
    नाव कोरले आहे.

106 वर्षांच्या आजीबाईंना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर:

  • प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्वोच्च पुरस्कारांपैकी असणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या पुरस्कार विजेत्यांमध्ये तामिनाडूमधील पाच जणांची नावे आहेत.
  • मात्र त्यातही सर्वात खास नाव आहे ते एका 106 वर्षांच्या आजीबाईंच. सालुमार्दा थिमक्का यांना पर्यावरणासंदर्भातील योगदानासाठी यंदाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • हुलिकलजवळ त्यांनी अंदाजे 70 वर्षांपूर्वी वडाची 384 झाडे लावली आणि त्यानंतर त्यांनी झाडे लावण्याचा सपाटाच सुरु केला.
  • तसेच त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना यंदा ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सध्या थिमक्का या बेल्लूर तालुक्यातील बेल्लूर गावात राहणाऱ्या त्यांच्या दत्तक पुत्राकडे राहतात.

दिनविशेष:

  • गांधीवादी नेते, केन्द्रीय मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल सी. सुब्रम्हण्यम यांचा जन्म 30 जानेवारी 1910 मध्ये झाला होता.
  • शास्त्रीय गायक पं. गजाननबुवा जोशी यांचा जन्म 30 जानेवारी 1911 रोजी झाला होता.
  • सन 1948 मध्ये नथुराम गोडसे याने मोहनदास करमचंद ऊर्फ महात्मा गांधी यांचा सायंकाळी 5 वाजून 17 मिनिटांनी प्रार्थना करीत असताना गोळ्या घालून खून केला.
  • पीटर लेंको हा सन 1994 मध्ये बुद्धिबळातील सर्वात लहान वयाचा ग्रँडमास्टर झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.