30 July 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (30 जुलै 2018)
पुणे पोलिस आयुक्तपदी के. व्यंकटेशम यांची निवड :
- सरकारने पोलिस दलात मोठ्या प्रमाणात खांदेपालट केले आहे. पुण्याच्या आयुक्तपदी के. व्यंकटेशम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या पदावरील रश्मी शुक्ला यांच्याकडे अतिरिक्त महासंचालक (महामार्ग) पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
- ठाण्याचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमवीर सिंग यांच्या जागी आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त महासंचालक विवेक फणसळकर यांची नियुक्ती केली.
- नवी मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांच्या जागी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख संजय कुमार यांची नेमणूक केली. परमवीर सिंग यांना अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) पदाची जबाबदारी दिली, अतिरिक्त महासंचालक (कारागृह) भूषणकुमार उपाध्याय हे नागपूरचे नवीन पोलिस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारतील.
झुंजार मच्छिमार नेते रामभाऊ पाटील कालवश :
- ज्येष्ठ मच्छिमार नेते आणि वर्ल्ड फिश फोरम चे माजी सदस्य, नॅशनल फिश वर्कर्स फोरम, महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे माजी अध्यक्ष रामचंद्र कांना पाटील उर्फ रामभाऊ पाटील यांचे 29 जुलै रोजी रात्री वयाच्या 79 व्या वर्षी मुंबईत दुःखद निधन झाले.
- पाटील यांनी राष्ट्र सेवादलातून तरुण वयात समाजसेवक म्हणून झोकून घेतले, वडराई मच्छिमार संस्थेचे अध्यक्ष, सरपंच, महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती, नँशनल फिशवर्क्स फोरम या संघटनेची अध्यक्षपदी होते. तर वर्ल्ड फिश फोरम पिपल संघटनेवर आशियाई खंडाचे प्रतिनिधी म्हणून काम पाहिले होते.
भारत संरक्षणसामग्री उत्पादनाचे केंद्र होणार :
- येत्या दशकात भारताला संरक्षणसामग्री उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनवण्याची केंद्र सरकारची योजना असून त्याच्या धोरणाला पुढील महिन्यात अंतिम स्वरूप मिळण्याची शक्यता आहे. संरक्षण उत्पादन धोरण 2018ला अंतिम स्वरूप देण्यात सध्या सरकार व्यस्त असल्याचे सूत्रांनी सांगितले.
- भारत सध्या जगातील मोठा संरक्षणसामग्री आयातदार देश आहे. गेल्या पाच वर्षांत भारताची संरक्षणसामग्रीची आयात 111 टक्क्यांनी वाढली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी केंद्र सरकारने मोठी पावले उचलण्याचे ठरवले असून त्यासाठी संरक्षण उत्पादन धोरण 2018ची आखणी केली जात आहे. येत्या महिन्यात त्याला अंतिम रूप प्राप्त होईल.
- तसेच त्यानुसार देशाला जगातील प्रमुख संरक्षणसामग्री उत्पादन केंद्र बनवण्याचे प्रयत्न केले जातील. अत्याधुनिक आणि संवेदनशील शस्त्रास्त्रे देशात संशोधन करून उत्पादन करण्यावर भर देण्यात येईल. त्यात लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, तोफा, बंदुका, युद्धनौका, रणगाडे आदींचा समावेश असेल.
आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत देशाला सुवर्णपदक :
- बजरंग पुनियाने सलग दुस-या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली, तर संदीप तोमरनेही रौप्यपदकाची कमाई केली. इस्तानबुल येथे झालेल्या यासर डोगू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीयांनी एकूण 10 पदकांची कमाई केली आणि त्यात सात पदके महिलांनी जिंकली आहेत.
- पिंकी ही महिलांमध्ये सुवर्णपदक जिंकणारी एकमेव खेळाडू आहे. तिने 55 किलो वजनी गटात युक्रेनच्या ओल्गा श्नेएडरवर 6-3 असा विजय मिळवला. रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या साक्षी मलिकला येथे अपयशाचा सामना करावा लागला. तिला 62 किलो वजनी गटाच्या पदक फेरीतही प्रवेश मिळवता आलेला नाही.
- राष्ट्रकुल विजेत्या बजरंगने महिन्याच्या सुरूवातीला जॉर्जियात झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्याने 29 जुलै रोजी 70 किलो गटाचे सुवर्ण नावावर केले. युक्रेनच्या अँड्रीय केव्हात्कोवस्कीने दुखापतीमुळे माघार घेतली. 61 किलो वजनी गटात संदीपला इराणच्या मोहम्मदबाघेर याखकेशीने 8-2 अश्या प्रकारे चित केले.
भारतीय महिला हॉकीने पार केले पाच दशके :
- भारतीय महिला हॉकीच्या विश्वकरंडक सहभागास पाच दशके झाली. त्यानिमित्ताने लंडनमध्ये खास प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्यात भारतीय महिला हॉकीची प्रगती दाखवणारी 50 छायाचित्रे आहेत.
- आता या प्रदर्शनातील छायाचित्रे लंडनमधील हॉकी म्युझियमला दान करण्याचा निर्णय संयोजकांनी घेतला आहे. यात 1982 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण यशाचाही उल्लेख आहे.
- भारतीय महिला हॉकीपटूंचे आनंदाचे; तसेच दुःखाचे क्षण टिपले आहेत. याचबरोबर यासोबत असलेला दिग्गज हॉकीपटू ध्यानचंद यांची वंशावळही अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
- सुनील यश कालरा यांनी हॉकी म्युझियमच्या सहकार्याने ‘पाच दशके 50छायाचित्रे’ हे प्रदर्शन आयोजित केले आहे. भारतीय महिला हॉकी संघ पहिल्यांदा 1974 च्या विश्वकरंडक स्पर्धेत सहभागी झाला होता. त्या वेळी असलेल्या भारताच्या कर्णधार यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
दिनविशेष :
- ‘संत तुलसीदास महाराज‘ यांनी 30 जुलै सन 1622 मध्ये देहत्याग केला.
- विल्यम केलॉग यांनी सन 1898 मध्ये कॉर्नफ्लेक्स विकसित केले.
- 30 जुलै 1930 मध्ये पहिला फुटबॉल विश्वचषक ‘उरूग्वे’ने जिकला.
- जलतज्ज्ञ ‘राजेंद्रसिंह‘ यांना सन 2001मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा