30 July 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
30 July 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (30 जुलै 2019)
एटीएम ‘हे’ शुल्क होणार कमी :
- अन्य बँकांच्या एटीएम वापरासाठी आकारण्यात येणारे शुल्क लवकरच कमी होणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून याबाबत विचार सुरू असून पुढील महिन्यापासून हे शुल्क कमी केले जाण्याची शक्यता आहे.
- एटीएम वापराबाबतच्या सर्व शुल्कांची समीक्षा करण्यासाठी आरबीआयने एक समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल तयार केला असून यामध्ये अन्य बँकांच्या एटीएम वापरासाठी आकारण्यात येणारे शुल्क कमी करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
- तर ही समिती लवकरच आपला अहवाल आरबीआयकडे सुपूर्द करेल. एटीएमचा गेल्या काही काळातील वाढलेला वापर पाहून आवश्यक त्या सर्व शुल्कांची समीक्षा करून या समितीने आपला अहवाल तयार केला आहे.
- तसेच एटीएमच्या वापरासाठीचे शुल्क कमी करण्याची मागणी ग्राहकांकडून अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. त्यानंतर ही समस्या सोडविण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एक समिती स्थापन केली होती.
- या समितीमध्ये रिझर्व्ह बँकेच्या प्रतिनिधींसह बँकांचे अधिकारी आणि ग्राहकांच्या प्रतिनिधींचाही समावेश होता. या समितीचा अहवाल आता तयार झाला असून पुढील महिन्यात तो सादर केल्यानंतर आठवडाभरात त्या शिफारशी अंमलात येण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. सध्या महिन्यातून पाच वेळा अन्य बँकांचे एटीएम विनाशुल्क वापरता येते. तर ही मर्यादा मेट्रो शहरांसाठी तीन व्यवहारांची आहे.
Must Read (नक्की वाचा):
भारत रशियाकडून ‘आर – 27’ क्षेपणास्त्रांची खरेदी करणार :
- भारतीय वायु सेनेने रशियाकडून 1500 कोटी रूपयांच्या ‘आर – 27’ या क्षेपणास्त्रांच्या खरेदीसाठी एका करारावर स्वाक्षरी केली आहे.
- तसेच या क्षेपणास्त्रांचे वजन 253 किलो आहे. तर 25 किलोमीटर उंचीवरून 60 किलोमीटर लांब पर्यंत मारा करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे.
- भारत आणि रशिया या दोन राष्ट्रात मागिल काही दिवसातच झालेला हा दुसरा मोठा व्यवहार आहे. या अगोदर भारताने रशियाकडून 200 कोटींच्या रणगाडा विरोधी क्षेपणास्त्रांच्या खरेदी करारावर स्वाक्षरी केली आहे. ही क्षेपणास्त्रे एसयू –
30 एमकेआय लढाऊ विमानांवर बसविण्यात येणार आहेत. - तर रशियाने ही क्षेपणास्त्रे मिग आणि सुखोई मालिकेतील लढाऊ विमानांना जोडण्यासाठी तयार केली आहेत. यांच्या खरेदीमुळे आता भारताची मध्यम आणि लांब पल्ल्यापर्यंत क्षेपणास्त्राद्वारे मारा करण्याची क्षमता वाढणार आहे.
- संरक्षण मंत्रालयाकडून आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक शस्त्र खरेदीस मंजूरी देण्यात आल्याच्या 50 दिवसांच्या आतच भारतीय वायुसेनेने आतापर्यंत शस्त्र सामुग्रीवर तब्बल 7 हजार 600 कोटी रूपयांपर्यंतचा व्यवहार केला आहे.
चांद्रयान-2 चंद्रापासून फक्त तीन पावलं दूर :
- भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या शास्त्रज्ञांनी तिसऱ्यांदा यशस्वीरित्या चांद्रयान-2 ची कक्षा बदलली. चांद्रयान-2 चंद्रापासून आता फक्त तीन पावलं दूर आहे.
- तसेच कक्षा बदलाचा हा तिसरा टप्पा होता. चांद्रयान 2 ची पृथ्वीपासूनची कक्षा टप्याटप्याने वाढवण्यात येत आहे. शुक्रवारी चांद्रयान 2 ची कक्षा बदलून पृथ्वीपासून 251 किमी अंतरावर नेण्यात आले.
- तर सात सप्टेंबर रोजी चांद्रयान 2 चंद्रावर उतरणार आहे.
- 22 जुलै रोजी अवकाशात झेपावल्यानंतर ते पृथ्वीपासून किमान (पेरिजी) 170 किमी व कमाल (एपोजी) 45 हजार 1475 किमी अंतरावर स्थिरावण्यात आले होते.
- तसेच आणखी दोन वेळा चांद्रयान 2 च्या कक्षेमध्ये बदल करण्यात येणार आहे. प्रत्येकवेळी कक्षा बदल करताना चांद्रयान 2 ला ऊर्जा मिळणार आहे.
- कक्षा वाढवण्याच्या प्रक्रियेमुळे चांद्रयान 2 मध्ये पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने जाण्यासाठी पुरेशी ऊर्जा निर्माण होणार आहे. आता दोन आणि सहा ऑगस्टला हीच प्रक्रिया पुन्हा केली जाईल.
अंजूम मुदगिलला सुवर्णपदक :
- पंजाबचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अंजूम मुदगिल हिने 12व्या सरदार सज्जन सिंग सेठी स्मृती मास्टर्स नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात अप्रतिम कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.
- कर्नी शूटिंग रेंजवर सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रत्येक प्रकारात देशातील 15 आघाडीचे नेमबाज सहभागी झाले आहेत.
- तसेच जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या आणि 2020 टोक्यो ऑलिम्पिकसाठीचे पात्रता निकष पार केलेल्या अंजूमने अंतिम फेरीत 253.9 गुणांची कमाई करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
दिनविशेष :
- ‘संत तुलसीदास महाराज‘ यांनी 30 जुलै सन 1622 मध्ये देहत्याग केला.
- विल्यम केलॉग यांनी सन 1898 मध्ये कॉर्नफ्लेक्स विकसित केले.
- 30 जुलै 1930 मध्ये पहिला फुटबॉल विश्वचषक ‘उरूग्वे’ने जिकला.
- जलतज्ज्ञ ‘राजेंद्रसिंह‘ यांना सन 2001 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा