30 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
आदित्य पुरी यांनी स्वत:चे 95 टक्के शेअर्स (समभाग) विकले:
30 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (30 जुलै 2020)
आदित्य पुरी यांनी स्वत:चे 95 टक्के शेअर्स (समभाग) विकले:
खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या एडचीएफसीचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य पुरी यांनी स्वत:चे 95 टक्के शेअर्स (समभाग) मागील आठवड्यामध्ये विकले आहेत.
यामधून आदित्य पुरी यांनी 843 कोटी रुपये मिलाले आहेत. आदित्य पुरी यांनी त्यांच्याकडे असणारे एचडीएफसीचे 74.2 लाख शेअर्सची विक्री केली आहे.
पुरी यांच्याकडे एचडीएफसीचे 77.96 लाख शेअर्स होते. पुरी यांना आर्थिक वर्ष 2020 साठी 6.82 लाख ईएसओपीच्या माध्यमातून मिळाले आहेत.
जभरात करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. करोना विषाणूचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेला बसल्याचं दिसत आहे.
तसंच अमेरिकेतील करोनाबिधितांच्या संख्येनं 45 लाखांचा टप्पा पार केल्याची माहिती समोर आली.
तर दुसरीकडे अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अमेरिकेत आतापर्यंत करोनामुळे तब्बल दीड लाख लोकांना आपले प्राण गमवावे लागल्याची माहितीदेखील समोर आली.
अमेरिकेत आतापर्यंत 1 लाख 53 हजार 447 जणांचा मृत्यू झाला. तर गेल्या 24 तासांमध्ये अमेरिकेत 1 हजार 267 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 50 हजार नव्या रुग्णांचीही नोंद करण्यात आली आहे.
34 वर्षांनंतर शिक्षणाचा नवा अध्याय:
तब्बल 34 वर्षांनंतर नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
शालेय व उच्च शिक्षणाच्या रचनेत आमूलाग्र बदल करण्यात आले असून दहावी आणि बारावी या बोर्डाचे महत्त्व आता कमी होणार आहे.
शालेय शिक्षणाची रचना 10 + 2 ऐवजी 5+3+3 +4 अशी झाली आहे. आता सहावीनंतर व्यावसायिक शिक्षणही दिले जाईल; तर 5 वी पर्यंत मातृभाषेत शिक्षणाला प्राधान्य असेल.
एकाचवेळी अभियांत्रिकी व संगीत हे दोन्ही विषय घेऊनही उच्च शिक्षण पूर्ण करता येईल.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित केला जाणार असून 21 व्या शतकासाठी आवश्यक कौशल्ये प्रदान करण्याला महत्त्व देण्यात आले आहे, असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल-निशंक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
लॉकडाउन 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे:
करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झाला नसल्याने लॉकडाउन 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कंटेनमेंट झोनमध्ये 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाउनची कठोर अमलबजावणी केली जाणार आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून ‘अनलॉक 3’ मधील नवे नियम जाहीर करण्यात आले आहेत.
यामध्ये नाइट कर्फ्यू हटवण्यात आला आहे. मात्र त्याचवेळी शाळा, कॉलेज आणि कोचिंगसारख्या शैक्षणिक संस्था 31 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आनंदचा सातवा पराभव – बुद्धिबळ स्पर्धा:
पाच वेळा विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदला लिजंड्स चषक ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत सातवा पराभव स्वीकारण्याची नामुष्की आली. आनंदचा आठव्या फेरीत चीनच्या डिंग लिरेनकडून 0-5-2-5 पराभव झाला.
आनंदला लिरेनविरुद्धच्या लढतीत पहिल्याच डावात अवघ्या 22 चालींमध्ये पराभव पत्करावा लागला.
दुसरा डाव दोघांनी 47 चालींत बरोबरीत सोडवला. तिसऱ्या डावात मात्र पुन्हा एकदा आनंदला 41 चालींत पराभव मान्य करावा लागला.
आनंदला आता लिरेन आणि पीटर लेको यांच्यासमवेत सहा गुणांसह अखेरच्या स्थानी समाधान मानावे लागले आहे.
आनंदने सातव्या फेरीत सोमवारी बोरिस गेलफंडला नमवत स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला होता. मात्र ती लय आठव्या फेरीत आनंदला राखता आली नाही.
दिनविशेष :
‘संत तुलसीदास महाराज‘ यांनी 30 जुलै सन 1622 मध्ये देहत्याग केला.
विल्यम केलॉग यांनी सन 1898 मध्ये कॉर्नफ्लेक्स विकसित केले.
30 जुलै 1930 मध्ये पहिला फुटबॉल विश्वचषक ‘उरूग्वे’ने जिकला.
जलतज्ज्ञ ‘राजेंद्रसिंह‘ यांना सन 2001 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला.
Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.