30 June 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (30 जून 2019)
राणीच्या बागेत उभारणार देशातील पहिले बंदिस्त ‘डोम’ पक्षिगृह :
- भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात डोम पद्धतीचे पक्षिगृह 2 उभारण्यात येणार आहे.
- पक्षिगृहाला ‘वायर रोप मेश’ (स्टेनलेस स्टील) वापरून पिंजरा तयार केला जाणार आहे. हा पिंजरा 50 वर्षांहून अधिक काळ टिकू शकतो. अशा प्रकारचे हे देशातील पहिले डोम पद्धतीचे बंदिस्त पक्षिगृह असणार आहे.
- पक्षिगृह 2 हे पूर्णपणे बंदिस्त असून यात पर्यटक आतमध्ये जाऊन विहार करत पक्षी निरीक्षण करतील.
- तसेच यामध्ये हेरॉन्स, क्रॉन्स, मालढोक, पेलीकन अशा 20 प्रजातींच्या पक्ष्यांना ठेवण्यात येणार आहे. पक्षिगृहामध्ये झाडे, तलाव आणि धबधबादेखील असणार आहे.
- राणीबागेमध्ये तीन हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये ‘वॉक थु्र एव्हीअरी’ (पक्षिगृहात मुक्तपणे संचार) या संकल्पनेवर आधारित बंदिस्त पक्षिगृह 2 उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
- तर या पक्षिगृह 2 चे काम सप्टेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होऊन पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे.
आर्थिक गुन्हेगारी रोखण्यावर ओसाका घोषणापत्रात भर :
- भारत सरकारसाठी प्राधान्याचा विषय म्हणून प्रचार करण्यात आलेल्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचा भाग असलेल्या आर्थिक गुन्हेगारीविरोधातील उपाययोजनांवर ओसाका घोषणापत्रात भर देण्यात आला आहे.
- तर जी-20 देशांमध्ये शनिवारी पहाटे 5 वाजेपर्यंत चाललेल्या वाटाघाटींनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात दहशतवादाला अतिशय कमी प्राधान्य देण्यात आले, तर आर्थिक कृती कामगिरी दलाला (फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स- एफएटीएफ) योग्य महत्त्व मिळाले.
- तसेच याबाबत जपानच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वाटाघाटींनंतर 43 परिच्छेदांचे संयुक्त निवेदन जारी करण्यात आले.
- जी-20 देशांच्या या निवेदनात आपली भूमिका योग्यरित्या प्रतिबिंबित करण्यात अमेरिकेला प्रथमच यश आले आहे.
- अमेरिकेने पॅरिस येथील हवामानविषयक करारातून माघार घेतली होती. त्यानंतर गेल्या दोन परिषदांमध्ये वातावरणात बदलाच्या मुद्दय़ावर अमेरिका एकाकी पडला होता.
- ‘डेटा फ्री फ्लो विथ ट्रस्ट’ या आपल्या संकल्पनेला जपानने पुरेसे महत्त्व दिले असतानाच, एकीकडे भारत व चीन आणि दुसरीकडे अमेरिका व इतर विकसित देश या दोन्ही बाजूंना मान्य असलेले तडजोडीचे सूत्र मान्य करण्यात आले. यात
आंतरराष्ट्रीय कायद्यांसोबत देशांतर्गत कायद्यांचाही आदर करण्यात येणार आहे. - तर त्याचवेळी ‘क्वालिटी इन्फ्रास्ट्रक्चर’च्या मुद्दय़ावर ‘पर्यावरणीय आणि सामाजिक’’मुद्दे विचारात घेऊन ‘सार्वजनिक निधीचे सातत्य’ याला घोषणापत्रात महत्त्व देण्यात आले. या सर्वाचा रोख चीनच्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ या
उपक्रमाकडे होता.
मोहम्मद शमीनंतर बोल्टने केला ‘हा’ पराक्रम :
- न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने एक पराक्रम करत गोलंदाजही कमी नाहीत, हे देखवून दिले. हा पराक्रम करणारा शमीनंतरचा तो दुसरा गोलंदाज ठरला आहे.
- तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात बोल्टने हा पराक्रम केला. बोल्टने ऑस्ट्रेलियाच्या चार फलंदाजांना बाद करत त्यांचे कंबरडे मोडले.
- तसेच बोल्टने या सामन्यात हॅट्रिकला गवसणी घातल्याचेही पाहायला मिळाले. अखेरच्या षटकातील सलग तीन चेंडूवर बोल्टने उस्मान ख्वाजा, मिचेल स्टार्क आणि जेसन बर्डनऑफ यांना बाद करत हॅट्रिक साजरी केली.
दिनविशेष :
- 30 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन आहे.
- भारतीय रसायनशास्त्रज्ञ ‘चिंतामणी नागेश रामचंद्र राव‘ यांचा जन्म 30 जून 1934 मध्ये झाला.
- जगातील पहिला तत्काळ दूरध्वनी क्रमांक 999 हा सन 1937 मध्ये लंडनमध्ये सुरु करण्यात आला.
- सन 1965 मध्ये भारत पाकिस्तानमध्ये कच्छचा करार झाला.
- केंद्रसरकार मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात करार होऊन सन 1986 मध्ये मिझोरामला राज्याचा दर्जा देण्याचे ठरले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा