30 मार्च 2022 चालू घडामोडी – Current Affairs
30 March 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (30 मार्च 2022)
‘पंतप्रधान संग्रहालया’चे 14 एप्रिलला उद्घाटन :
- देशाच्या सर्व माजी पंतप्रधानांच्या योगदानाचा सन्मान करणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे.
- तसेच माजी पंतप्रधान कोणत्याही पक्षाचे असोत, पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन त्यांचा आदर केला पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या खासदारांना सांगितले.
- डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात मंगळवारी झालेल्या भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत मोदींनी पक्षाच्या खासदारांना ‘पंतप्रधान संग्रहालया’ला आवर्जून भेट देण्याची सूचना केली.
- देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे तत्कालीन निवासस्थान व आत्ता ‘नेहरू संग्रहालया’मुळे प्रसिद्ध असलेल्या तीन मूर्ती भवन परिसरात नवे ‘पंतप्रधान संग्रहालय’ उभारण्यात आले आहे.
- तर घटनाकार-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतदिनी, 14 एप्रिल रोजी या संग्रहालयाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
- तर त्याच दिवशी डॉ. आंबेडकर संग्रहालयाचेही उद्घाटन केले जाणार आहे.
- पं. नेहरूंची साहित्यसंपदा नेहरू संग्रहालयामध्ये कायम ठेवली जाणार असून नव्या संग्रहालयात उर्वरित 14 माजी पंतप्रधानांच्या सविस्तर कार्याची माहिती देणारे विविध साहित्य लोकांना पाहता येईल.
- नव्या ‘पंतप्रधान संग्रहालया’मध्ये दुर्मीळ छायाचित्रे, भाषणे, व्हिडीओ क्लिप, वर्तमानपत्रे, मुलाखती, माजी पंतप्रधानांचे व त्यांच्यासंदर्भातील मूळ लेखन आदींचा समावेश आहे.
Must Read (नक्की वाचा):
2020 पासून 466 ‘NGO’ना ‘FCRA’परवान्याचे नूतनीकरण नाकारले :
- केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी संसदेत सांगितले की त्यांनी 2020 पासून 466 गैर-सरकारी संस्थांना (एनजीओ) फॉरेन कॉन्ट्रिब्युशन (रेग्युलेशन) अॅक्ट (FCRA) अंतर्गत परवान्यांचे नूतनीकरण नाकारले आहे. कारण त्यांनी कायद्यातील पात्रता निकषांची पूर्तता केलेली नव्हती.
- तर यामध्ये 2020 मध्ये 100, 2021 मध्ये 341 आणि या वर्षात आतापर्यंत 25 संस्थाना नकार देण्यात आला आहे.
- FCRA परवाना नूतनीकरणासाठी ऑक्सफॅम इंडियाचा अर्ज डिसेंबर 2021 मध्ये नाकारण्यात आला होता.
- तसेच युनायटेड किंगडमने भारतासोबतच नकार दिला आहे.
- केंद्राने 5 हजार 789 संस्थांना FCRA च्या कक्षेतून काढून टाकले आहे कारण त्यांनी परवान्यांच्या नूतनीकरणासाठी अर्ज केला नव्हता, जे परदेशी निधी प्राप्त करण्यासाठी अनिवार्य आहेत.
पंतप्रधान मोदी पालक, शिक्षकांना ‘या’ विषयावर करणार मार्गदर्शन :
- निवडक विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत.
- देशातील वेगवेगळ्या राज्यांमधील राजभवनांमध्ये हे पालक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित राहतील असं केंद्र सरकारने सोमवारी जाहीर केलं आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाअंतर्गत परीक्षेच्या काळामध्ये तणाव कसा हाताळावा यासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.
- तर 2018 पासून ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं.
- तसेच यंदा त्याचं पाचवं वर्ष असणार असून हा कार्यक्रम 1 एप्रिल रोजी आयोजित केला जाणार आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी ताल्कातोरा स्टेडिममधून विद्यार्थ्यांना संबोधित करणार असून देशभरातील वेगवेगळ्या राजभवानांमध्ये निवडक उपस्थितांसोबत पंतप्रधान डिजीटल माध्यमातून संवाद साधणार आहेत.
‘आयपीएल’च्या प्रसारण हक्कांसाठी निविदा :
- भारतीय क्रिकेटच्या अर्थकारणात मोठी उलाढाल करणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या ट्वेन्टी-20 क्रिकेटच्या पुढील पाच हंगामांच्या प्रसारण हक्कांसाठी निविदा काढण्याच्या तयारीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आहे.
- ‘आयपीएल’च्या प्रसारण हक्कांसाठी ‘बीसीसीआय’ इतिहासात पहिल्यांदाच ऑनलाइन स्वरूपात लिलाव करणार असून त्यांना 50 हजार कोटींपर्यंतची बोली अपेक्षित आहे.
- तर या लिलावप्रक्रियेला 12 जूनपासून सुरुवात होणार असल्याची माहिती ‘बीसीसीआय’चे सचिव जय शाह यांनी दिली.
- तसेच या लिलावप्रक्रियेमुळे आम्हाला केवळ महसूल मिळणार नसून भारतीय क्रिकेटचे खूप फायदा होणार आहे,.
दिनविशेष:
- थोरले बाजीराव पेशवे यांनी 1729 यावर्षी जैतपूर येथे महंमदशहा बंगश याचा पराभव केला.
- डच चित्रकार व्हिंसेंट व्हॅन गॉग यांचा जन्म 30 मार्च 1853 मध्ये झाला होता.
- भारतीय भूदलाचे सहावे सरसेनापती ‘जनरल कोडेन्डेरा सुबय्या‘ तथा के.एस. थीमय्या यांचा जन्म 30 मार्च 1906 मध्ये झाला.
- सन 1929 मध्ये भारत व इंग्लंडदरम्यान हवाई टपालसेवा सुरू झाली.
- वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम चे स्थापक ‘क्लाउस स्च्वाब‘ यांचा जन्म 30 मार्च 1938 रोजी झाला.