Current Affairs (चालू घडामोडी)

30 November 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

30 November 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (30 नोव्हेंबर 2018)

डीजीपी ‘दत्ता पडसलगीकर’ यांना आणखी मुदतवाढ:

  • राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना आणखी तीन महिने मुदतवाढ देण्याचे निश्चित झाले आहे. त्याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला असून त्याबाबतचे आदेश जारी होईल, असे गृह विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
  • पडसलगीकर यांना निवृत्तीनंतर दोन टप्यात सहा महिने मुदतवाढ मिळणार आहे. अशा पद्धतीने गेल्या कित्येक वर्षानंतर पहिल्यादाच ‘डीजीपी’ पदासाठी मुदतवाढ मिळत आहे.
  • गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत केवळ एस.एस. विर्क आणि अजित पारसनीस यांनाच प्रत्येकी तीन महिन्याची मुदतवाढ मिळाली होती. दरम्यान, पडसलगीकर यांच्या मुदतवाढीमुळे जेष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे त्यांच्या बढतीला विलंब लागत असल्याचा त्यांच्यातून आक्षेप व्यक्त होत आहे. त्याशिवाय मुंबईचे आयुक्तपद आणि डीजी दर्जाच्या अन्य नियुक्त्यांवर परिणाम होणार आहे.
  • दत्ता पडसलगीकर हे 1982च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून गेल्या एक जुलैपासून राज्याच्या पोलीस प्रमुखपदाची सूत्रे सांभाळीत आहेत. त्यापूर्वी जवळपास सव्वा दोन वर्षे मुंबईच्या आयुक्तपदी आणि त्यापूर्वी केंद्रात प्रतिनियुक्तीवर होते.
  • तसेच निवृत्तीच्या वयामुळे ‘डीजीपी’ पदावर केवळ दोन महिन्याचा अवधी मिळत असल्याने राज्य सरकारकडून त्यांना 31 ऑगस्टला पहिल्यादा तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. त्याची मुदत संपत असून त्यांना पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

कार्लसन ठरला चौथ्यांदा जगज्जेता:

  • जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने अमेरिकेच्या आव्हानवीर फॅबियानो करुआनावर जलदगती डावात 3-0 अशी मात करून जगज्जेतेपदाला गवसणी घातली. यासह कार्लसनने सलग चौथ्यांदा जगज्जेतेपद पटकावण्याची किमया केली. पराभवामुळे मात्र बॉबी फिशर यांच्यानंतर (1972) अमेरिकेचा पहिला जगज्जेता होण्याची करुआनाची संधी हुकली.
  • क्लासिकल लढतीतील 12 डाव बरोबरीत सुटल्यानंतर जलद प्रकाराच्या ‘टाय-ब्रेकर’मध्ये सामन्याचा निकाल लागला. 12 डावांत एकही विजय नसणे, हासुद्धा एक विक्रम ठरला. मात्र जलद बुद्धिबळमध्ये वरचढ समजल्या जाणाऱ्या कार्लसनने ‘टाय-ब्रेकर’वर पूर्णपणे वर्चस्व गाजवले.
  • तसेच पहिले तिन्ही डाव जिंकल्यामुळे चौथा डाव खेळवण्याची गरज भासली नाही. कार्लसनने पहिल्या तिन्ही डावांत बाजी मारत बुद्धिबळातील सर्वात प्रतिष्ठेच्या विजेतेपदावर नाव कोरले. अतिशय अटीतटीच्या रंगलेल्या पहिल्या डावात कार्लसनने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत विजयश्री खेचून आणली.

मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण:

  • मराठा आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून 29 नोव्हेंबर रोजी विधानसभेत मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक मंजूर झाले आहे.
  • मराठा समाजासाठी हा दिवस ऐतिहासिक ठरला असून हे विधेयक विधानसभा आणि विधान परिषदेत कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आले आहे.
  • मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असून सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळाले आहे.
  • मराठा समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करून 16 टक्के आरक्षणाची तरतूद करणारे विधेयक राज्य विधिमंडळात सादर करण्यात आले. त्यापूर्वी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील कृती अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला.
  • कृती अहवाल सादर केल्यानंतर विधानसभेतील सदस्यांनी अहवाल वाचनासाठी काही वेळ द्या, अशी विनंती केली. दुपारी यासंदर्भात कामकाजाला सुरुवात होताच कोणत्याही चर्चेविना विधेयक मंजूर झाले आणि मराठा समाजाच्या आरक्षणावर शिक्कामोर्तब झाले.

इस्त्रोच्या ‘हायपर स्पेक्‍ट्रल इमेजिंग सॅटेलाइट’चे यशस्वी प्रक्षेपण:

  • भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) तयार केलेल्या ‘हायपर स्पेक्‍ट्रल इमेजिंग सॅटेलाइट’चे (एचवायएसआयएस) ‘पीएसएलव्ही-सी43’ प्रक्षेपकाच्या मदतीने 29 नोव्हेंबर रोजी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे.
  • आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून ‘पीएसएलव्ही-सी43‘चे प्रक्षेपण केले आहे. या प्रक्षेपकाच्या मदतीने ‘एचवायएसआयएस’ या ‘इस्त्रो’च्या महत्त्वाकांक्षी उपग्रहासह आठ देशांच्या 30 उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे.
  • पीएसएलव्ही-सी43‘ मोहिमेतील ‘एचवायएसआयएस’ हा प्राथमिक उपग्रह आहे. त्याचे वजन 380 किलोग्राम आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागाचे अचूक निरीक्षण करण्याची क्षमता असलेल्या या उपग्रहाचे आयुष्यमान पाच वर्षांचे असणार आहे.
  • तसेच या उपग्रहाशिवाय अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कोलंबिया, फिनलॅंड, नेदरलॅंड, स्पेन आणि मलेशिया यांच्या 30 व्यावसायिक उपग्रहांचे प्रक्षेपण केले जाणार आहे, असे ‘इस्त्रो‘ने स्पष्ट केले. ‘पीएसएलव्ही‘ या ‘इस्त्रो‘च्या यशस्वी प्रक्षेपकाचे हे 45वे उड्डाण आहे.

दहावीच्या परीक्षेसाठी बहुसंच ऐवजी एकच प्रश्‍नपत्रिका:

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने (बोर्ड) दहावीच्या परीक्षेसाठी ए.बी.सी.डी. या चार प्रकारची बहुसंची प्रश्‍नपत्रिका वापरली जात होती. मात्र, मार्च 2019 मध्ये होणाऱ्या दहावीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी एकच प्रश्‍नपत्रिका देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.
  • दहावीच्या परीक्षेसाठी इंग्रजी, द्वितीय, तृतीय भाषा व गणित भाग एक व दोनसाठी बहुसंची प्रश्‍नपत्रिका 2004 पासून वापरली जात होती. विद्यार्थ्यांचे परीक्षेत कॉपी करण्याचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी हा पर्याय बोर्डाने निवडला होता. पण, आता बहुसंची प्रश्‍नपत्रिका रद्द करून या सगळ्या विषयांसाठी एकच प्रश्‍नपत्रिका देण्याचा निर्णय घेतला आहे.
  • नव्या अभ्यासक्रमानुसार जे विद्यार्थी मार्च 2019 मध्ये दहावीची परीक्षा देतील, त्यांना प्रत्येक विषयासाठी एकच प्रश्‍नपत्रिका असेल. मात्र, जे विद्यार्थी जुन्या अभ्यासक्रमाच्या आधारे परीक्षा देत असतील त्यांना बहुसंची प्रश्‍नपत्रिका दिल्या जाणार आहेत. बारावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयाचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांना बहुसंची प्रश्‍नपत्रिका दिल्या जातील.
  • दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नपत्रिकेची अंमलबजावणी व मूल्यमापन करण्याच्या प्रक्रियेमध्ये सुलभता येण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. बहुसंची प्रश्‍नपत्रिका देण्याची आवश्‍यकता नसल्याचा अभिप्राय बालभारती कार्यालयाकडे तज्ञांनी दिला आहे. त्यानुसार बोर्डाने हा बदल केला आहे.

दिनविशेष:

  • भारतीय वनस्पती शास्रज्ञडॉ. जगदीशचंद्र बोस‘ यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1858 रोजी झाला होता.
  • सन 1917 या वर्षी कलकत्ता येथे आचार्य जगदीश चंद्र बोस इन्स्टिट्युटची स्थापना झाली.
  • बार्बाडोसला युनायटेड किंगडमपासुन सन 1966 मध्ये स्वातंत्र्य मिळाले.
  • सन 1996 मध्ये ख्यातनाम साहित्यिक पु.ल. देशपांडे यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (1 डिसेंबर 2018)

Sandip Rajput

Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago