लष्कराने स्वत:च सुरक्षित मोबाइल अॅप्लिकेशन विकसित केलं साई असे नाव दिले:
परस्परांशी चॅट करण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांना आता अन्य बाहेरच्या मोबाइल अॅप्लिकेशनवर अवलंबून राहण्याची गरज नाही.
लष्कराने स्वत:च सुरक्षित मोबाइल अॅप्लिकेशन विकसित केलं आहे. त्यावरुन ते परस्परांशी चॅट करु शकतात.
त्याला ‘सेक्युर अॅप्लिकेशन फॉर इंटरनेट’ (साई) असे नाव दिल्याचे लष्कराकडून गुरुवारी सांगण्यात आले.
व्हॉटसअॅप, टेलिग्राम, जीआयएमएस सारख्या व्यावसायिक मेसेजिंग अॅप्लिकेशन सारखेच हे मोबाइल अॅप्लिकेशन आहे.
“अॅड्रॉइड प्लॅटफॉर्मवरुन इंटरनेटद्वारे टेक्सट आणि व्हिडीओ कॉलिंग करता येईल. इन हाऊस सर्व्हरसह कोडिंगची सुरक्षेचे सर्व फिचर या साई अॅपमध्ये आहेत”
बार्सिलोनाच्या विजयात मेसीचे योगदान:
बार्सिलोनाने यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम फुटबॉल खेळ करत चॅम्पियन्स लीगमध्ये युव्हेंटसला 2-0 असे पराभूत केले.
मेसीने पेनल्टीवर केलेला गोल बार्सिलोनाच्या विजयात मोलाचा ठरला.
मेसीने नेहमीप्रमाणे सर्वोत्तम कामगिरी केली. याउलट रोनाल्डोच्या जागी युव्हेंटस संघात निवड झालेल्या इवारो मोराटाचे तीन गोल ऑफसाइड असल्याने रद्द करण्यात आले.
याउलट बार्सिलोनाने 14व्या मिनिटालाच ओस्माने डेम्बलेच्या गोलवर 1-0 आघाडी घेतली होती.
दिनविशेष:
30 ऑक्टोबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय ऑर्थोपेडिक परिचारिका दिन‘ आहे.
भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1909 मध्ये झाला.
सन 1920 मध्ये सिडनी येथे कम्युनिस्ट पार्टी ऑफ ऑस्ट्रेलियाची स्थापना करण्यात आली.
सन 1945 मध्ये भारताला संयुक्त राष्ट्रांचे (United Nations) सदस्यत्त्व मिळाले.
शिवाजी पार्कवर सन 1966 मध्ये शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला.
Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.