30 September 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (30 सप्टेंबर 2019)
पाकिस्तानबाबत भारतीय प्रशिक्षकांनी घेतला महत्त्वाचा निर्णय :
- बांगलादेशच्या महिला क्रिकेट संघासोबत असलेल्या भारतीय प्रशिक्षकांनी पाकिस्तान दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
- 26 ऑक्टोबरपासून बांगलादेशच्या महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा नियोजित आहे. या दौऱ्यात बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात लाहोरच्या गद्दाफी स्टेडिअममध्ये तीन टी 20 सामन्यांची मालिका आणि दोन एकदिवसीय
सामन्यांची मालिका खेळण्यात येणार आहे. मात्र बांगलादेश महिला संघासोबत असणाऱ्या प्रशिक्षक वृंदातील भारतीय प्रशिक्षकांनी या दोऱ्यावर न जाण्याचे निश्चित केले आहे. - बांगलादेश क्रिकेट मंडळाने अद्याप महिला संघाच्या पाकिस्तान दौऱ्याला हिरवा कंदील दिलेला नाही. या दौऱ्याबाबत सुरक्षेच्या कारणास्तव अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. बांगलादेशच्या सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतरच महिला संघाचा हा दौरा निश्चित मानला जाणार आहे.
- पण त्यानंतर होणाऱ्या ACC Emerging Women’s Asia Cup स्पर्धेत मात्र त्या तिघीही बांगलादेशच्या महिला संघासोबत प्रवास करतील.
- तसेच ACC Emerging Women’s Asia Cup ही स्पर्धा श्रीलंकेत 20 ते 28 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.
सौदी अरेबिया भारतात करणार शंभर अब्ज डॉलर्सची गुंतवणूक :
- भारताच्या संभाव्य विकास वाढीची दखल घेत जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश असलेल्या सौदी अरेबियानं गुंतवणुकीसाठी आता भारतावर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे.
- तसेच देशातील पायाभूत सुविधा आणि खाण आणि पेट्रोकेमिकल्स या क्षेत्रांमध्ये शंभर अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे.
- तर सौदीचे ब्रँड अॅम्बेसेडरपदी डॉ. सऊद बिन मोहम्मद अल सती यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली.
दिनविशेष :
- 30 सप्टेंबर – आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन
- ब्रिटनची पहिली ट्राम सेवा 30 सप्टेंबर 1860 मध्ये सुरु झाली.
- थॉमस एडिसन यांचे पहिले व्यावसायिक हायड्रोएलेक्ट्रिक पॉवर प्लांट अमेरिकेतील विसकॉन्सिन, ऍप्लेटॉन येथील फॉक्स नदीवर 30 सप्टेंबर 1882 मध्ये सुरु झाले.
- 30 सप्टेंबर 1895 मध्ये फ्रान्सने मादागास्कर ताब्यात घेतले.
- हुव्हर धरणाचे बांधकाम 30 सप्टेंबर 1935 मध्ये पूर्ण झाले.
- पाकिस्तान व येमेन यांचा संयुक्त राष्ट्रात 30 सप्टेंबर 1947 मध्ये प्रवेश.
- 30 सप्टेंबर 1966 मध्ये बोत्सवानाला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा