30 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
30 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (30 सप्टेंबर 2020)
भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वाईट कामगिरी- अभिजित बॅनर्जी:
- भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वाईट कामगिरी करणारी अर्थव्यवस्थांपैकी एक आहे, असं मत नोबेल पुरस्कार प्राप्त अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी व्यक्त केलं आहे.
- अर्थव्यवस्थेशी संबंधित प्रश्नांना तोंड देण्यासाठी सरकारकडून देण्यात येणारा उत्तेजन निधी पुरेसा नाहीय असंही बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
- असं असलं तरी देशाचा आर्थिक विकास दर जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये सुधारलेला दिसेल अशी शक्यताही बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे.
- सध्या अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करत असणाऱ्या बॅनर्जी यांनी सध्या भारत सरकारकडून देण्यात येणारे आर्थिक प्रोत्साहन पॅकेज हे पुरेसे नसल्याचे मत व्यक्त केलं आहे.
Must Read (नक्की वाचा):
लशीचे 10 कोटी अतिरिक्त डोस तयार करणार- सिरम इन्स्टिट्युट :
- सिरम इन्स्टिट्युट करोनाला प्रतिबंध करणाऱ्या लशीचे 10 कोटी अतिरिक्त डोस तयार करणार आहे.
- सीरम आणि गावी यांनी करोनावरची जी लस तयार करण्याचा निर्णय घेतला आहे त्या लशीचे 10 कोटी अतिरिक्त डोस तयार करण्यात येणार आहेत.
- या लस निर्मितीच्या प्रक्रियेत बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचाही वाटा असणार आहे.
- 10 कोटी डोस तयार करण्याच्या प्रक्रियेला ही फाऊंडेशन गती देईल. भारतासाठी आणि आर्थिक दृष्ट्या मागास देशांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
सहा वर्षात खराब दारुगोळयावर वाया गेले 960 कोटी- भारतीय लष्कराचा निधी मोठया प्रमाणात खर्च:
- मागच्या सहावर्षात सरकारी मालकीच्या ऑर्डीनन्स फॅक्टरी बोर्डाकडून खराब दर्जाच्या दारुगोळयाचा पुरवठा करण्यात आला. त्यावर भारतीय लष्कराचा निधी मोठया प्रमाणात खर्च झाला आहे.
- इतक्या पैशात मध्यम पल्ल्याच्या १०० तोफा खरेदी करता आल्या असत्या. संरक्षण मंत्रालयाला पाठवण्यात आलेल्या अंतर्गत अहवालात हा दावा करण्यात आला आहे.
- 2014 ते 2020 दरम्यान ऑर्डीनन्स फॅक्टरी बोर्डाकडून खराब दर्जाचा दारुगोळा पुरवण्यात आला. त्यामुळे 960 कोटी रुपयांचे नुकसान झाले.
- 960 कोटी म्हणजे इतक्या पैशात 155 एमएम रेंजच्या मध्यम पल्ल्याच्या शंभर तोफा खरेदी करता आल्या असत्या” असे लष्कराच्या नोटमध्ये म्हटले आहे.
- OFB चे कामकाज संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागातंर्गत चालते. जगातील ही एक जुनी सरकार नियंत्रित उत्पादन संस्था आहे.
- देशभरात OFB च्या फॅक्टरी आहेत. भारतीय लष्करासाठी दारुगोळा आणि शस्त्रास्त्र निर्मितीचे काम या कारखान्यांमध्ये चालते.
- 23 एमएम एअर डिफेन्स शेल, आर्टिलरी शेल्स, 125 एमएम टँक राऊंड आणि रायफल्समध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या गोळया यामध्ये त्रुटी आढळल्या आहेत.
लिव्हरपूलचा सलग तिसरा विजय:
- गतविजेत्या लिव्हरपूलने यंदाच्या इंग्लिश प्रीमियर लीग मोसमाची धडाक्यात सुरुवात करताना सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली.
- पिछाडीवर पडल्यानंतर लिव्हरपूलने पुनरागमन करत आर्सेनलचे आव्हान 3-1 असे मोडीत काढले.
- अलेक्झांड्रे लाकाझेट्टे याने 25व्या मिनिटाला आर्सेनलचे खाते खोलल्यानंतर तीन मिनिटांनी सादियो माने याने लिव्हरपूलला बरोबरी साधून दिली.
- 34व्या मिनिटाला ट्रेंट अलेक्झांड्र-आरनॉल्ड याच्याकडून मिळालेल्या क्रॉसवर अँड्रय़ू रॉबर्टसन याने गोल करत लिव्हरपूलला 2-1असे आघाडीवर आणले.
- सामना संपायला दोन मिनिटे शिल्लक असताना दिओगो जोटा याने तिसरा गोल करत लिव्हरपूलच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
दिनविशेष :
- 30 सप्टेंबर – आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन
- ब्रिटनची पहिली ट्राम सेवा 30 सप्टेंबर 1860 मध्ये सुरु झाली.
- थॉमस एडिसन यांचे पहिले व्यावसायिक हायड्रोएलेक्ट्रिक पॉवर प्लांट अमेरिकेतील विसकॉन्सिन, ऍप्लेटॉन येथील फॉक्स नदीवर 30 सप्टेंबर 1882 मध्ये सुरु झाले.
- 30 सप्टेंबर 1895 मध्ये फ्रान्सने मादागास्कर ताब्यात घेतले.
- हुव्हर धरणाचे बांधकाम 30 सप्टेंबर 1935 मध्ये पूर्ण झाले.
- पाकिस्तान व येमेन यांचा संयुक्त राष्ट्रात 30 सप्टेंबर 1947 मध्ये प्रवेश.
- 30 सप्टेंबर 1966 मध्ये बोत्सवानाला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य.