Current Affairs (चालू घडामोडी)

30 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

लशीचे 10 कोटी अतिरिक्त डोस तयार करणार- सिरम इन्स्टिट्युट

30 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (30 सप्टेंबर 2020)

भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वाईट कामगिरी- अभिजित बॅनर्जी:

  • भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वाईट कामगिरी करणारी अर्थव्यवस्थांपैकी एक आहे, असं मत नोबेल पुरस्कार प्राप्त अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी व्यक्त केलं आहे.
  • अर्थव्यवस्थेशी संबंधित प्रश्नांना तोंड देण्यासाठी सरकारकडून देण्यात येणारा उत्तेजन निधी पुरेसा नाहीय असंही बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
  • असं असलं तरी देशाचा आर्थिक विकास दर जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये सुधारलेला दिसेल अशी शक्यताही बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे.
  • सध्या अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करत असणाऱ्या बॅनर्जी यांनी सध्या भारत सरकारकडून देण्यात येणारे आर्थिक प्रोत्साहन पॅकेज हे पुरेसे नसल्याचे मत व्यक्त केलं आहे.

लशीचे 10 कोटी अतिरिक्त डोस तयार करणार- सिरम इन्स्टिट्युट :

  • सिरम इन्स्टिट्युट करोनाला प्रतिबंध करणाऱ्या लशीचे 10 कोटी अतिरिक्त डोस तयार करणार आहे.
  • सीरम आणि गावी यांनी करोनावरची जी लस तयार करण्याचा निर्णय घेतला आहे त्या लशीचे 10 कोटी अतिरिक्त डोस तयार करण्यात येणार आहेत.
  • या लस निर्मितीच्या प्रक्रियेत बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचाही वाटा असणार आहे.
  • 10 कोटी डोस तयार करण्याच्या प्रक्रियेला ही फाऊंडेशन गती देईल. भारतासाठी आणि आर्थिक दृष्ट्या मागास देशांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

सहा वर्षात खराब दारुगोळयावर वाया गेले 960 कोटी- भारतीय लष्कराचा निधी मोठया प्रमाणात खर्च:

  • मागच्या सहावर्षात सरकारी मालकीच्या ऑर्डीनन्स फॅक्टरी बोर्डाकडून खराब दर्जाच्या दारुगोळयाचा पुरवठा करण्यात आला. त्यावर भारतीय लष्कराचा निधी मोठया प्रमाणात खर्च झाला आहे.
  • इतक्या पैशात मध्यम पल्ल्याच्या १०० तोफा खरेदी करता आल्या असत्या. संरक्षण मंत्रालयाला पाठवण्यात आलेल्या अंतर्गत अहवालात हा दावा करण्यात आला आहे.
  • 2014 ते 2020 दरम्यान ऑर्डीनन्स फॅक्टरी बोर्डाकडून खराब दर्जाचा दारुगोळा पुरवण्यात आला. त्यामुळे 960 कोटी रुपयांचे नुकसान झाले.
  • 960 कोटी म्हणजे इतक्या पैशात 155 एमएम रेंजच्या मध्यम पल्ल्याच्या शंभर तोफा खरेदी करता आल्या असत्या” असे लष्कराच्या नोटमध्ये म्हटले आहे.
  • OFB चे कामकाज संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागातंर्गत चालते. जगातील ही एक जुनी सरकार नियंत्रित उत्पादन संस्था आहे.
  • देशभरात OFB च्या फॅक्टरी आहेत. भारतीय लष्करासाठी दारुगोळा आणि शस्त्रास्त्र निर्मितीचे काम या कारखान्यांमध्ये चालते.
  • 23 एमएम एअर डिफेन्स शेल, आर्टिलरी शेल्स, 125 एमएम टँक राऊंड आणि रायफल्समध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या गोळया यामध्ये त्रुटी आढळल्या आहेत.

लिव्हरपूलचा सलग तिसरा विजय:

  • गतविजेत्या लिव्हरपूलने यंदाच्या इंग्लिश प्रीमियर लीग मोसमाची धडाक्यात सुरुवात करताना सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली.
  • पिछाडीवर पडल्यानंतर लिव्हरपूलने पुनरागमन करत आर्सेनलचे आव्हान 3-1 असे मोडीत काढले.
  • अलेक्झांड्रे लाकाझेट्टे याने 25व्या मिनिटाला आर्सेनलचे खाते खोलल्यानंतर तीन मिनिटांनी सादियो माने याने लिव्हरपूलला बरोबरी साधून दिली.
  • 34व्या मिनिटाला ट्रेंट अलेक्झांड्र-आरनॉल्ड याच्याकडून मिळालेल्या क्रॉसवर अँड्रय़ू रॉबर्टसन याने गोल करत लिव्हरपूलला 2-1असे आघाडीवर आणले.
  • सामना संपायला दोन मिनिटे शिल्लक असताना दिओगो जोटा याने तिसरा गोल करत लिव्हरपूलच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

दिनविशेष :

  • 30 सप्टेंबरआंतरराष्ट्रीय भाषांतर दिन
  • ब्रिटनची पहिली ट्राम सेवा 30 सप्टेंबर 1860 मध्ये सुरु झाली.
  • थॉमस एडिसन यांचे पहिले व्यावसायिक हायड्रोएलेक्ट्रिक पॉवर प्लांट अमेरिकेतील विसकॉन्सिन, ऍप्लेटॉन येथील फॉक्स नदीवर 30 सप्टेंबर 1882 मध्ये सुरु झाले.
  • 30 सप्टेंबर 1895 मध्ये फ्रान्सने मादागास्कर ताब्यात घेतले.
  • हुव्हर धरणाचे बांधकाम 30 सप्टेंबर 1935 मध्ये पूर्ण झाले.
  • पाकिस्तान व येमेन यांचा संयुक्त राष्ट्रात 30 सप्टेंबर 1947 मध्ये प्रवेश.
  • 30 सप्टेंबर 1966 मध्ये बोत्सवानाला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (1 ऑक्टोबर 2020)

Vaishnavi Jadhav

Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago