31 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी – Current Affairs

सुमित अंतिल

31 August 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (31 ऑगस्ट 2021)

चीनमध्ये मुलांच्या ‘ऑनलाइन गेमिंग’वर निर्बंध :

  • मुलांमधील ‘ऑनलाइन गेमिंग’ची वाढती ‘व्यसनाधीनता’ हा चिंतेचा विषय ठरू लागल्याने या व्यसनाला आळा घाळण्यासाठी चीनने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
  • चीनने किशोरवयीन मुलांच्या ऑनलाइन गेमिंगवर वेळेचे निर्बंध लागू केले आहेत. त्याचबरोबर गेमिंग कंपन्यांनाही नियम आणि निर्बंधांच्या कक्षेत आणले आहे.
  • चीन सरकारच्या नव्या नियमांमुळे मुलांना आता आठवडय़ातले तीन दिवस फक्त एक तास ऑनलाइन खेळ खेळता येतील.
  • तर शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी मुले रात्री 8 ते 9 या वेळेतच ऑनलाइन खेळ खेळू शकतील,
  • ऑनलाइन गेमिंगवरील निर्बंधांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना गेमिंग कंपन्यांनाही देण्यात आल्या आहेत.
  • निश्चित केलेल्या कालावधीहून अधिक वेळ मुले ऑनलाइन खेळताना आढळली तर त्याची जबाबदारी संबंधित कंपन्यांवर टाकण्यात येणार आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (30 ऑगस्ट 2021)

माजी क्रिकेट प्रशिक्षक वासू परांजपे यांचे निधन :

  • नामांकित प्रशिक्षक वासू परांजपे यांचे सोमवारी निधन झाले. ते 82 वर्षांचे होते.
  • तर गेली सहा दशके भारतीय आणि विशेषत: मुंबईच्या क्रिकेटसाठी परांजपे यांनी प्रशिक्षक, निवड समिती सदस्य, मार्गदर्शक अशा अनेक भूमिका पार पाडल्या.
  • वासूसरांप्रमाणे मुंबईच्या क्रिकेटची नाडी कुणालाच ठाऊक नाही, असे त्यांच्याविषयी म्हटले जाते.
  • 29 प्रथम श्रेणी सामन्यांत दोन शतकांसह 785 धावा अशी परांजपे यांची आकडेवारी फारशी लक्षवेधी नव्हती. पण खेळाची जाण आणि खेळाडूंच्या दृष्टिकोनावर मेहनत घेणे, हे त्यांचे वैशिष्टय़ होते.
  • तसेच त्यांना हिंदी, इंग्रजी, मराठी आणि गुजरात अशा चार भाषा अवगत होत्या.

स्टुअर्ट बिन्नीची क्रिकेटमधून निवृत्ती :

  • एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम गोलंदाजीचे पृथक्करण नावावर असलेला भारताचा अष्टपलू क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नीने सोमवारी प्रथम श्रेणी आणि आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
  • तर सहा कसोटी, 14 एकदिवसीय आणि तीन ट्वेंन्टी-20 आंतराष्ट्रीय सामन्यांमध्ये बिन्नीने भारताचे प्रतिनिधित्व केले.
  • तसेच 2014मध्ये बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात फक्त 4 धावांत 6 बळी मिळवण्याचा विक्रम स्टुअर्टने नोंदवला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये हा विक्रम अद्याप अबाधित आहे.

अवनी लेखराला सुवर्णपदक :

  • भारताच्या अवनी लेखराने सोमवारी टोक्यो पॅरालिम्पिक गेम्सच्या नेमबाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले आहे.
  • अवनी लेखरा हिने 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये 249.6 गुणांसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.
  • तर याआधी अवनी लेखरा पात्रता फेरीत एकूण 621.7 गुणांसह सातव्या स्थानावर होती.
  • पॅरालिम्पिकच्या इतिहासातील नेमबाजीतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे.
  • चीनची महिला नेमबाज झांगने 248.9 गुणांसह दुसरे स्थान मिळवले आणि रौप्य पदक पटकावले.

टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी :

  • सोमवारी भारतीय खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक मिळवत दमदार कामगिरी केली आहे.
  • टोक्यो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेतील रविवारचा दिवसही भारतासाठी तिहेरी पदककमाईचा ठरला होता.
  • तर भारताच्या योगेश कथुनियाने पुरुषांच्या थाळीफेक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे.
  • सोमवारी योगेश कथुनियाने 44.38 मीटरचा सर्वोत्तम थ्रो टाकत रौप्य पदक पटकावले.
  • तसेच दोन वेळचे सुवर्णपदक विजेते देवेंद्र झाझारिया यांनी यावेळी भालाफेकमध्ये रौप्यपदकावर कब्जा केला आहे.
  • त्याचबरोबर सुंदरसिंग गुर्जरही कांस्यपदक जिंकण्यात यशस्वी ठरला आहे.

थाळीफेकपटू विनोद कुमारचं कांस्यपदक रोखलं :

  • थाळीफेकपटू विनोद कुमारचे कांस्यपदक रोखले गेले असल्याचे समोर आले.
  • BSFचा 41 वर्षीय विनोद कुमार तिसऱ्या क्रमांकावर राहिला, त्याने 1991मीटर सर्वोत्तम थ्रोसह आशियाई विक्रम रचला.
  • तर त्याने पोलंडच्या पिओटर कोसेविच आणि क्रोएशियाच्या वेलिमीर सँडर यांच्या नंतर तिसरा क्रमांक पटकावत कांस्यपदक जिंकले. पण त्याचे कांस्यपदक थांबवण्यात आले आहे.
  • पुरुषांच्या F52 स्पर्धेत विनोदच्या अपंगत्व वर्गीकरणामुळे त्याचे पदक रोखण्यात आले आहे.

भालाफेकपटू सुमित अंतिलनं पटकावलं सुवर्ण :

  • सुमित अंतिलने भालाफेकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देत इतिहास रचला आहे.
  • तर एवढेच नव्हे, तर या कामगिरीसोबत सुमितने विश्वविक्रमही मोडला आहे.
  • तसेच त्याने एफ-64 प्रकारात 68.55 मीटर लांब भाल फेकत विश्वविक्रम आपल्या नावावर केला.

दिनविशेष :

  • 31 ऑगस्ट हा दिवस बालस्वातंत्रदिन आहे.
  • मृत्युंजय कादंबरीचे लेखक प्रसिद्ध साहित्यिक ‘शिवाजी सावंत‘ यांचा जन्म 31 ऑगस्ट 1940 मध्ये झाला.
  • सन 1947 मध्ये 31 ऑगस्ट रोजी भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली.
  • पांडुरंगशास्त्री आठवले यांना सन 1996 मध्ये मॅगसेसे पुरस्कार प्रदान झाले.
  • राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांच्या हस्ते सन 1970 मध्ये कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे उद्घाटन झाले.
Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago