31 डिसेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs
31 December 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (31 डिसेंबर 2021)
चिनीने भारतीय सीमेवर तैनात केली ‘रोबो आर्मी’:
- चीनने भारतीय सीमांवर रोबोट आर्मी तैनात करण्यास सुरुवात केलीय.
- चीनने भारतीय सीमांवर जे रोबोट तैनात केलेत ते मशीनगन चालवणारे रोबोट आहेत.
- चीनने तिबेट आणि लडाखच्या सीमांवर अनेक डझन ऑटोमॅटिक मशीनगन चालवणाऱ्या मशीन्स आणि रोबोटप्रमाणे वापरल्या जाणाऱ्या स्वयंचलित गाड्या तैनात केल्यात.
- नुकत्याच भारतीय सेनेसोबत झालेल्या वादामध्ये चिनी सैनिकांना थंडीमुळे मोठी अचडण निर्माण झालेली.
- त्याचवेळी चिनी सैनिक हे बर्फाळ प्रदेशामध्ये भारतीय सैन्याचा सामना करण्यासाठी सक्षम नसल्याचं समोर आलं होतं.
- तेव्हापासूनच या समस्येवर उपाय शोधण्यासाठी काय करता येईल याची चाचपणी चीनकडून केली जात होती.
- चीनच्या पिपल्स लिब्रेशन पार्टी म्हणजेच पीएलएने तिबेटमध्ये स्वयंचलित 88 शार्प क्लॉ व्हेइकल्सला तैनात केलंय. यापैकी काही 38 शार्प क्लॉ गाड्या लडाखच्या सीमेवरही तैनात करण्यात आल्यात.
- या गाड्यांची निर्मिती चीनमधील युद्ध साहित्य बनवणाऱ्या नॉरिंको (NORINCO) कंपनीने केलीय. या गाड्यांचा वापर सीमेवर गस्त घालण्याबरोबरच हत्यारं आणि आवश्यक वस्तू सीमेवर पोहचवण्यासाठी केला जातो.
Must Read (नक्की वाचा):
न्यूझीलंडच्या रॉस टॉलरने जाहीर केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती :
- न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू रॉस टेलरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे.
- 37 वर्षीय रॉस टेलरने गुरुवारी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं.
- रॉस टेलरने आपल्या घरच्या मैदानावर होणाऱ्या पुढील दोन मालिका खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या दोन मालिका बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाविरोधात होणार आहेत.
- सर्वात प्रथम न्यूझीलंड बांगलादेशविरोधात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
- त्यानंतर न्यूझीलंडला त्यांच्यात मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँडविरोधात पाच सामन्यांची मालिका खेळायची आहे.
अश्विन जगातील दुसरा सर्वोत्तम गोलंदाज :
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी जाहीर केलेल्या ताज्या जागतिक कसोटी क्रमवारीत भारतीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने गोलंदाज आणि अष्टपैलूंच्या यादीत दुसरे स्थान कायम राखले आहे. तर दुसरीकडे, रवींद्र जडेजा कसोटी अष्टपैलूंच्या यादीत तिसऱ्या स्थानावर कायम आहे.
- भारताचा वनडे कर्णधार रोहित शर्मा आणि कसोटी कर्णधार विराट कोहली यांनीही फलंदाजांच्या यादीत अनुक्रमे पाचवे आणि सातवे स्थान कायम ठेवले आहे.
- ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅबुशेन फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूट दुसऱ्या स्थानावर आहे
तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन स्टीव्ह स्मिथ तिसऱ्या स्थानावर आहे. - कसोटी गोलंदाजांमध्ये अव्वल 10 मध्ये अश्विन हा एकमेव भारतीय आहे. तो 883 गुणांसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे.
सर्वोत्तम ट्वेन्टी-20 क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी स्मृतीला नामांकन :
- ‘आयसीसी’च्या महिलांमधील 2021 या वर्षांतील सर्वोत्तम ट्वेन्टी-20 क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी भारताची सलामीवीर स्मृती मानधनासह चौघांना नामांकन देण्यात आले आहे.
- इंग्लंडची टॅमी ब्यूमाँट आणि नॅट शिव्हर तसेच आर्यलडची गॅबी लेविस या अन्य क्रिकेटपटू स्पर्धेत आहेत.
- 2021 या वर्षांत स्मृतीने नऊ ट्वेन्टी-20 सामन्यांत 31.87च्या सरासरीने दोन अर्धशतकांसह एकूण 255 धावा काढल्या आहेत.
- 2021च्या सर्वोत्तम पुरुष ट्वेन्टी-20 क्रिकेटपटूसाठी बांगलादेशचा शाकिब अल हसन, पाकिस्तानचा बाबर आझम, दक्षिण आफ्रिकेचा जानेमन मलान आणि आर्यलडचा पॉल स्टर्लिग हे स्पर्धेत आहेत.
किरण गुरव यांना साहित्य अकादमी पुरस्कार :
- साहित्य अकादमी पुरस्कारांची झाली आहे. यामध्ये 22 प्रादेशिक भाषांसाठी युवा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. “बाळूच्या अवस्थांतराची डायरी” या पुस्तकासाठी कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठाचे अधीक्षक डॉ. किरण गुरव यांना साहित्य अकादमीचा मुख्य पुरस्कार जाहीर झालेला आहे.
- तसेच, मराठीतील युवा लेखक प्रणव सखदेव यांना युवा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे व संजय वाघ यांना बाल पुरस्कार यांना जाहीर झाला आहे.
दिनविशेष:
- 31 डिसेंबर सन 1600 मध्ये ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली.
- आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव यांचा जन्म 31 डिसेंबर 1871 रोजी झाला होता.
- सन 1879 मध्ये थॉमस एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे प्रथमच विद्युत दिव्यांचे प्रात्यक्षिक दाखवले होते.
- युनायटेड किंग्डम सन 1985 मध्ये युनेस्कोचे सदस्य बनले.
- 31 डिसेंबर 1999 मध्ये पनामा कालव्यावर पनामा (देशा) चे पूर्ण नियंत्रण आले. त्याआधी काही वर्षे या कालव्यावर अमेरिका व पनामा यांचे संयुक्तपणे नियंत्रण होते.