31 डिसेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs

वंदे भारत एक्सप्रेस

31 December 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (31 डिसेंबर 2022)

राज्यात सेक्सटॉर्शनविरोधात कायदा येणार:

  • राज्यात सेक्सटॉर्शनच्या अनेक घटना उघडकीस आल्या असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.
  • विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस असून ते विधानपरिषदेत कायदा व सुव्यवस्थेवरील चर्चेदरम्यान विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर उत्तर देत होते.
  • विधान परिषदेत सेक्सटॉर्शन आणि अवैध गोष्टींचा मुद्दा अनेक सदस्यांनी उपस्थित केला.
  • खरं तर सेक्सटॉर्शनचा नवीन प्रकार सध्या उघडकीस आला आहे.
  • एखाद्याची फसवणूक झाल्यानंतर जेव्हा लाजेखातर पैसे देऊ शकत नाही, त्यानंतर आत्महत्या केल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.
  • सायबर क्राईमविरोधात राज्य सरकार देशातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म तयार करणार आहे.
  • सायबर क्राईमसंदर्भात वेळेवर गुन्हे दाखल करणे आणि वेळत त्यावर कारवाई करण्याचे काम याद्वारे करण्यात येईल.

अहमदनगरचं नामांतर ‘अहिल्यादेवी होळकर नगर’ करण्याचा प्रस्ताव:

  • पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव हे अहमदनगरला देण्यात यावं असा प्रस्ताव केंद्र सरकारला लवकरच पाठवण्यात येणार आहे अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत दिली.
  • अहमदनगरचं नामांतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने करण्यात याविषयीचा प्रश्न भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी तारांकित केला होता.
  • या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्र विधानसभेने औरंगाबाद शहराचं नाव बदलून संभाजी नगर आणि उस्मानाबादचं नाव बदलून धाराशिव करण्यासंबंधीचे दोन वेगळे प्रस्ताव एकमताने मंजूर केले.
  • हे दोन्ही प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आले आहेत.
  • अहिल्याबाईंचा जन्म अहमदनगरमधल्या चौंडी गावात झाला त्यामुळे हे नामांतर करावं असं पडळकर यांनी पत्रात नमूद केलं होतं.

पश्चिम बंगालमध्ये ‘वंदे भारत एक्सप्रेस’ सुरू:

  • रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकार विक्रमी गुंतवणूक करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले.
  • पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत हावडा आणि न्यू जलपायगुडीला जोडणाऱ्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवल्यानंतर मोदी म्हणाले की, न्यू जलपायगुडीसह विविध रेल्वेस्थानके, विमानतळांप्रमाणे अत्याधुनिक पद्धतीने विकसित केली जात आहेत.
  • ‘वंदे भारत एक्सप्रेस’ हावडा आणि ईशान्येचे प्रवेशद्वार न्यू जलपायगुडीला जोडेल.
  • ही रेल्वेगाडी 564 किमीचे अंतर सात तास 45 मिनिटांत पार करेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
  • त्यामुळे या मार्गावरील इतर गाडय़ांच्या तुलनेत प्रवासाच्या वेळेत तीन तासांची बचत होईल.

पोस्टातील ठेवींवर वाढीव व्याज:

  • केंद्र सरकारने, येत्या 1 जानेवारीपासून ठराविक अल्पबचत योजनांवरील व्याजदरात 0.20 ते 1.1 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.
  • अल्पबचत योजनांतील गुंतवणुकीवर देय व्याजदराच्या तिमाहीगणिक फेरनिर्धारण करताना ही सुधारणा करण्यात आली आहे.
  • ज्येष्ठ नागरिक ठेव योजनेसह, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) या पोस्टाच्या बचत योजनांना वाढीव व्याज मिळणार आहे.
  • मात्र सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) आणि सुकन्या समृद्धी या योजनांवरील व्याजदरांत बदल करण्यात आलेले नाहीत.
  • वाणिज्य बँकांकडून मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली जात असताना, सरकारनेही अल्पबचत योजनांवरील व्याजदर वाढविणे क्रमप्राप्त होते.
  • त्यानुसार सुधारण करण्यात आलेले वाढीव व्याज दर हे नववर्षांत 1 जानेवारी 2023 ते 31 मार्च 2023 कालावधीसाठी लागू असतील.

दिनविशेष:

  • 31 डिसेंबर सन 1600 मध्ये ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली.
  • आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव यांचा जन्म 31 डिसेंबर 1871 रोजी झाला होता.
  • सन 1879 मध्ये थॉमस एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे प्रथमच विद्युत दिव्यांचे प्रात्यक्षिक दाखवले होते.
  • युनायटेड किंग्डम सन 1985 मध्ये युनेस्कोचे सदस्य बनले.
  • 31 डिसेंबर 1999 मध्ये पनामा कालव्यावर पनामा (देशा) चे पूर्ण नियंत्रण आले. त्याआधी काही वर्षे या कालव्यावर अमेरिका व पनामा यांचे संयुक्तपणे नियंत्रण होते.
Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago