कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (Employees Provident Fund Organisation- EPFO) जवळपास नऊ लाख कर्मचाऱ्यांची पीएफ खाती ब्लॉक केली आहेत.
तर केद्र सरकारच्या फ्लॅगशिप योजनेचा गैरवापर करणाऱ्या सुमारे 80 हजार कंपन्यांची यादी सरकारने केली आहे.
तसेच या कंपन्यांनी फॉर्मल सेक्टरमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्राच्या प्रधानमंत्री रोजगार योजनेअंतर्गत बेकायदेशीर पद्धतीने तब्बल 300 कोटी रुपयांचा फायदा उचलला आहे.
प्रधानमंत्री रोजगार योजनेचा अवैध लाभ जवळपास नऊ लाख जण घेत आहेत. पीएफ आणि प्रधानमंत्री रोजगार योजनेचा एकत्र लाभ घेणाऱ्या नऊ लाख कर्मचाऱ्यांची पीएफ खाती ब्लॉक केली आहे.
बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार प्रधानमंत्री रोजगार योजनेच्या नऊ लाख लाभार्थांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. हे नऊ लाख जण या योजनेचा यापुढं लाभ घेऊ शकणार नाहीत. ही योजना लागू होण्याआधी 9 लाख जण फॉर्मल सेक्टरचा भाग होते, म्हणजेच ते आधीपासूनच पीएफचा लाभ घेत होते.
फुटबॉलपटू बाला देवी युरोपमधील क्लबशी करारबद्ध :
गंगोम बाला देवी स्कॉटलंडमधील रेंजर्स एफसी या क्लबशी करारबद्ध झाली आहे. मणिपूरची आघाडीवीर बाला देवी ही परदेशी क्लबशी करारबद्ध झालेली पहिली भारतीय महिला फुटबॉलपटू ठरली आहे.
तर रेंजर्स महिला संघाने 29 वर्षीय बाला देवी हिच्याशी 18 महिन्यांचा करार केला आहे.
तसेच बाला देवीने भारतातर्फे सर्वाधिक गोल करण्याची किमया साधली आहे. तिच्या नावावर 58 सामन्यांत 52 गोल जमा आहेत.
दक्षिण आशिया विभागातील ती सर्वाधिक गोल करणारी एकमेव खेळाडू आहे.
वयाच्या 15व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या बाला देवीने भारतीय फुटबॉल संघाचे नेतृत्वही सांभाळले आहे.
तर गेल्या दोन मोसमांपासून भारतीय महिला फुटबॉल लीगमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा मान तिने पटकावला आहे.
तिने 2015 आणि 2016 मध्ये अखिल भारतीय फुटबॉल संघटनेचा सर्वोत्तम महिला फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावला आहे.
तामिळनाडूत पालींच्या दोन नव्या प्रजातींचे संशोधन :
तामिळनाडूतील पर्वतरांगांमध्ये पालींच्या दोन नव्या प्रजातींचा शोध संशोधकांनी लावला.
संशोधकांचे पथक गेल्या अनेक महिन्यांपासून तामिळनाडूतील पर्वतरांगा पालथ्या घालत आहे. हेमीफायलोडॅक्टीलस (स्लेंडर गेको) या कुळातील पाली फक्त पश्चिम भारतात म्हणजेच कर्नाटक, तामिळनाडू, केरळ व आंध्र प्रदेशातील पूर्व घाटात आढळतात.
तर या कुळातील पालींच्या चार प्रजातींची नोंद आजवर झाली आहे, पैकी तीन प्रजातींचा शोध याच पथकाने गेल्यावर्षी लावला होता.
तसेच पूर्ण अभ्यास व संशोधनाअंती त्याचे निष्कर्ष व शोधप्रबंध ‘झुटाक्सा’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित झाला. या संशोधनामुळे भारतातील या कुळातील पालींच्या प्रजातींची संख्या सहा झाली आहे.
सर्व विषयांसाठी एका पुस्तकाचा घेणार निर्णय :
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी ‘सर्व विषयांसाठी एकच पुस्तक’ हा नवा पथदर्शी प्रकल्प बालभारतीतर्फे हाती घेण्यात आला आहे.
मात्र, राज्यातील काही तालुक्यांतील शालेय विद्यार्थ्यांकडून मिळणाºया प्रतिसादानंतरच या निर्णयाची अंमलबजावणी राज्यातील सर्व शाळांसाठी केली जाईल.
तर त्यातच विद्यार्थी, शिक्षक व पालकांना ही कल्पना कितपत भावते त्यावर या प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून आहे, अशा प्रतिक्रिया शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
तसेच त्यामुळेच पुस्तकांचे वेगवेगळे भाग करून ‘बालभारती’कडून पुस्तकांच्या छपाईचे काम सुरू केले आहे.
दिनविशेष:
सन 1911 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसर्या जन्मठेपेची शिक्षा झाली. तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिकावी सुरूवात 31 जानेवारी 1920 रोजी झाली.
सोविएत रशियाने सन 1929 मध्ये लिऑन ट्रॉटस्की याला हद्दपार केले होते.
सन 1949 यावर्षी बडोदा व कोल्हापूर ही संस्थाने (तत्कालीन) मुंबई राज्यात विलीन झाली.
राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी 31 जानेवारी सन 1950 रोजी संसदेपुढे पहिले भाषण केले.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.