31 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी
भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी

31 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (31 मार्च 2020)

भारतालाही मिळू शकतं पाच मिनिटात करोना चाचणीचा रिपोर्ट देणारं मशीन :

  • जगातील औषध निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी अबॉट लॅबोरेटरीजने करोना व्हायरसच्या चाचणीसाठी पोर्टेबल उपकरण बनवलं आहे. हे उपकरण घशातील नमुने चाचणीसाठी घेतल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात करोना पॉझिटिव्ह रुग्णाचा रिपोर्ट देते.
  • तसेच सध्या जगभरात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ज्या गतीने वाढतेय, ते पाहता लवकरात लवकर टेस्टचा रिपोर्ट मिळणे आवश्यक आहे. तरच या जीवघेण्या आजारावर नियंत्रण मिळवता येईल.
  • अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने इमर्जन्सीमध्ये मंजुरी दिल्याचे अबॉट लॅबोरेटरीजने म्हटले आहे. छोटया टोस्टरच्या आकाराचे हे मशीन आहे.
  • मॉलीक्युलर टेक्नोलॉजीचा त्यामध्ये वापर करण्यात आला आहे. एखादा रुग्ण निगेटिव्ह असेल तर 13 मिनिटात कळते असे कंपनीने पत्रकात म्हटले आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (30 मार्च 2020)

करोनावर या दोन औषधांचे कॉम्बिनेशन प्रभावी:

  • जगातील अनेक देशांचा आज करोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी संघर्ष सुरु आहे. करोना व्हायरसला रोखू शकणारे प्रभावी औषध बनवण्यासाठी जगातील प्रमुख देशांमध्ये मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे.
  • तर या दरम्यान अमेरिकेच्या कानसास शहरातील एका डॉक्टरने करोनाग्रस्त रुग्णांवर उपचारासाठी औषधांचे एक नवीन कॉम्बिनेशन बनवले आहे. हे औषध करोनावर प्रभावी असल्याचा या डॉक्टरचा दावा आहे.
  • दोन औषधांचे हे कॉम्बिनेशन प्रत्येक रुग्णावर लागू पडल्यास निश्चित जगासाठी ती एक आनंदाची बाब ठरेल.
  • Covid-19 च्या रुग्णांवर उपचारासाठी डॉक्टर हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन आणि अ‍ॅझीथ्रोमायसीन या दोन औषधांचा वापर करत आहेत असे डॉक्टर जेफ कोलयर यांनी वॉशिंग्टन पोस्टमधील लेखात म्हटले आहे.
  • एझेड म्हणजे अ‍ॅझीथ्रोमायसीन हे दुसरे औषध आहे. बाजारात हे औषध झेड-पॅक म्हणून ओळखले जाते. Covid-19 च्या 14 रुग्णांना फक्त हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन हे औषध देण्यात आले. त्यातील सहाव्या दिवशी 57 टक्के रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला. पण करोनाच्या सहा रुग्णांना हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन आणि अ‍ॅझीथ्रोमायसीन ही दोन्ही औषधे देण्यात आली. हा प्रयोग शंभर टक्के यशस्वी ठरला.

मोदी सरकारचा मोठा निर्णय:

  • सध्या देशात करोनाचा फैलाव रोखण्याचा केंद्र सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. याचाच भाग म्हणून सरकारकडून वाहनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना आपल्याकडे असणाऱ्या सुविधांचा फायदा व्हेंटिलेटर्स तयार करण्यासाठी करावा असे निर्देश दिले आहेत.
  • आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) पुढील आठवड्यापासून एन-95 मास्कच्या निर्मितीला सुरुवात करणार आहे. डीआरडीओचं दिवसाला 20 हजार मास्क तयार करण्यात लक्ष्य आहे.
  • तरनोएडा येथील आगवा हेल्थकेअरला एका महिन्यात 10 हजार व्हेंटिलेटर्स तयार करण्यास सांगण्यात आलं आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांचा पुरवठा सुरु होईल.
  • तर दोन स्थानिक कंपन्या दिवसाला 50 हजार एन-95 मास्कची निर्मिती करत असून हा आकडा एका आठवड्यात एक लाख इतका जाऊ शकतो.

मोदी सरकारने केली 11 विशेष गटांची स्थापना :

  • भारतामध्ये करोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोमवारपर्यंत एक हजार 139 भारतीयांना करोनाची लागण झाली आहे. तर देशामध्ये करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 30 वर पोहचला आहे.
  • तर याच संकटावर मात करण्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 वेगवेगळ्या सबलीकरण गटांची (Empower Groups) स्थापना केली आहे.
  • तसेच करोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सरकारकडे उपलब्ध असलेल्या सामुग्रीचा आणि साधनांचा कसा वापर करता येईल, यासंदर्भात काय तयारी पूर्ण झाली आहे या गोष्टींवर हा गट लक्ष ठेवणार आहे.
  • केंद्रीय गृह मंत्रालयाची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्येच करोनाविषयक 11 गटांची स्थापना करण्यात आली. या 11 वेगवेगळ्या गटांमध्ये मोदी सरकारमधील वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
  • पहिला गट हा आरोग्य विषयक आप्तकालीन परिस्थितीशी दोन हात करण्यासंदर्भातील नियोजन करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
  • तर या गटाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी निती आयोगाचे सदस्य असणारे डॉक्टर व्ही पॉल यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे.

दिनविशेष :

  • सन 1504 मध्ये 31 मार्च रोजी शिखांचे दुसरे गुरू ‘गुरू अंगद देव’ यांचा जन्म झाला.
  • भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचा जन्म सन 1865 मध्ये 31 मार्च रोजी झाला.
  • डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी 31 मार्च 1867 रोजी प्रार्थना समाजाची स्थापना केली.
  • 31 मार्च 1889 आरोजी आयफेल टॉवरचे उद्‍घाटन झाले. हा बांधायला 2 वर्षे, 2 महिने व 2 दिवस लागले.
  • भारतीय विद्वान ग्यानी ‘चेत सिंग’ यांचा जन्म सन 1902 मध्ये 31 मार्च रोजी झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (1 एप्रिल 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.