31 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
31 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (31 मे 2020)
नासाच्या करोना व्हेंटिलेटर्सचा परवाना पुण्याच्या भारत फोर्जला :
नासाने करोना उपचारांसाठी तयार केलेले व्हेंटिलेटर्स बनवण्याचा परवाना पुणे,हैदराबाद व बंगळुरू येथील कंपन्यांना देण्यात आला आहे.
तर भारतातील ज्या कंपन्यांना हा परवाना मिळाला त्यात पुण्याची भारत फोर्ज लि., बेंगळुरूची अल्फा डिझाइन टेक्नॉलॉजीज प्रा. लि. व हैदराबादची मेधा सव्हरे ड्राइव्हज प्रा.लि यांचा समावेश आहे.
तसेच भारतीय कंपन्यांशिवाय इतर अठरा कंपन्यांना हे परवाने देण्यात आले असून त्यात आठ अमेरिकी व तीन ब्राझिलियन कंपन्यांचा समावेश आहे.
दी नॅशनल अॅरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा) ही स्वतंत्र संस्था असून ती अवकाश संशोधनाला वाहिलेली आहे.
तर अमेरिकेतील रुग्णांसाठी दक्षिण कॅलिफोर्नियातील जेट प्रॉपल्शन प्रयोगशाळेत नासाने एक व्हेंटिलेटर तयार केला होता. तेथील अभियंत्यांनी तयार केलेल्या या व्हेंटिलेटरला ‘व्हायटल’ असे म्हटले आहे.
तर एक महिन्यात तो तयार करण्यात आला व त्याला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने 30 एप्रिल रोजी परवानगी दिली होती. व्हायटल म्हणजे ‘व्हेंटिलेटर इंटरव्हेन्शन टेक्नॉलॉजी अॅक्सेसिबल लोकली’नावाचे उपकरण असून त्याचे सुटे भाग पुरवठा साखळ्यात उपलब्ध आहेत.
गंभीर रुग्णांवर उपचारासाठी हा व्हेंटिलेटर वापरला जातो. त्याची रचना लवचीक असून त्यात सुधारणाही करता येतात.
BCCI कडून खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावाची शिफारस :
भारतीय क्रीडा क्षेत्रात मानाचं स्थान असलेल्या खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावाची शिफारस बीसीसीआयने केली आहे.
तर प्रत्येक वर्षी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांसाठी बीसीसीआय चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची नावं पाठवत असते.
2019 विश्वचषकात 5 शतकांसह केलेली धडाकेबाज कामगिरी आणि याचसोबत कसोटी क्रिकेटमध्ये केलेलं दमदार पुनरागमन यामुळे बीसीसीआयने खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.
तसेच याव्यतिरीक्त अर्जुन पुरस्कारासाठी शिखर धवन, इशांत शर्मा आणि महिला क्रिकेटपटू दिप्ती शर्मा यांची नावं बीसीसीआयने सुचवली आहे.
ला-लीगा फुटबॉल 11 जूनपासून :
स्पॅनिश फुटबॉल लीग म्हणजेच ला-लीगा तीन महिन्यांच्या कालावधीनंतर 11 जूनपासून सुरू होत आहे. 2020-21 मोसमाला 12 सप्टेंबरपासून सुरुवात होईल, असे स्पॅनिश क्रीडा परिषदेने स्पष्ट केले.
तर स्पेनमधील दोन स्पर्धाच्या उर्वरित 11 फेऱ्यांना सुरुवात करण्यावर स्पॅनिश फुटबॉल महासंघ आणि ला-लीगाचे एकमत झाले आहे. यंदाचा मोसम 19 जुलैला समाप्त होईल.
तसेच बेटिस विरुद्ध सेव्हिला यांच्यात होणाऱ्या सामन्याने करोनानंतरच्या मोसमाला 11 जूनपासून सुरुवात होईल.
नासाचे स्पेस एक्स लाँच :
अमेरिकी अंतराळ संस्था नासाने 9 वर्षांनंतर इतिहास रचला आहे.
तर फ्लोरिडाच्या केप कनवरल येथील जॉन एफ केनेडी स्पेस सेंटरमधून नासाने स्पेसएक्स डेमो-2 मिशन लाँच केले आहे. अमेरिकेने 9 वर्षांनी त्यांच्या जमिनीवरून अंतराळवीर पाठविले आहेत.
तसेच चंद्रावर उतरण्याचे पहिले उड्डाण याच केंद्रावरून करण्यात आले होते.
नासाचे संचालक जीम ब्राईडेन्स्टीन यांनी सांगितले की, अमेरिकेने 9 वर्षांनी त्यांच्या जमिनीवरून अंतराळवीर पाठविले आहेत.
नासाने यावेळी स्पेसएक्स फाल्कन 9 हे रॉकेट पाठविले आहे. यामध्ये रॉबर्ट बेंहकेन आणि डग्लस हुर्ले हे दोन अंतरालवीर आहेत.
तर हे यान पृथ्वीच्या कक्षेबाहेर यशस्वीरित्या गेले असून कॅप्सूल यशस्वीरित्या उघडल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले.
विराट कोहली एकमेव भारतीय खेळाडू :
फोर्ब्सच्या 2020 च्या यादीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा एकमेव श्रीमंत भारतीय ठरला.
तर विराटची एकूण कमाई 2.6 कोटी डॉलर इतकी आहे.
तसेच कोहली 100 खेळाडूंच्या यादीत 66 व्या स्थानावर आहे. मागच्यावर्षी तो 100 व्या तसेच 2018 ला 83 व्या स्थानावर होता.
कोहलीने 2.4 कोटी डॉलर जाहिराती आणि ब्रॅन्ड या माध्यमातून तर 20 लाख डॉलरची कमाई वेतन आणि पुरस्कारातून केली आहे.
फोर्ब्सने शुक्रवारी जाहीर केलेल्या यादीत पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो (105 मिलियन डॉलर) , लियोनेल मेस्सी (104 मिलियन डॉलर), नेमार (95.5 मिलियन डॉलर)आणि अमेरिकेचा बास्केटबॉलपटू लेब्रॉन जेम्स(88.2 मिलियन डॉलर) हे अव्वल पाच स्थानावर आहेत.
तर फोर्ब्स 1990 पासून श्रीमंतांची यादी जाहीर करीत आहे.
दिनविशेष :
31 मे – जागतिक तंबाखूविरोधी दिन
31 मे हा दिवस जागतिक तंबाखूविरोधी दिन म्हणून पाळला जातो.
सेल्सियस थर्मामीटरचे शोध लावणारे जीन पियरे क्रिस्टिन यांचा जन्म 31 मे 1683 मध्ये झाला.
महाराणी ‘अहिल्याबाई होळकर’ यांचा जन्म 31 मे 1725 रोजी झाला.
31 मे 1952 रोजी ‘संगीत नाटक अकादमी’ची स्थापना झाली.
नेल्सन मंडेला यांना 31 मे 1990 रोजी लेनिन आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार जाहीर झाला.
प्रख्यात गुजराती कवी हरिंद्र दवे यांना 1991 चा कबीर सन्मान मध्य प्रदेश सरकारकडून 31 मे 1992 मध्ये जाहीर झाला.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.