4 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
4 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (4 डिसेंबर 2018)
आता येणार क्यूआर कोडवर आधारित ऑफलाइन आधारकार्ड:
- आधारसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर क्यूआर कोडवर आधारित ऑफलाइन आधारला मंजुरी देण्याच्या मुद्द्यावर केंद्र आणि रिझर्व्ह बँक यांच्यात चर्चा सुरू आहे.
- बँक खाती उघडणे, पेमेंट वॉलेट वापरणे, विमा कवच खरेदी करणे, यासाठी आवश्यक असलेल्या पडताळणीत ई-केवायसीच्या जागी ऑफलाइन आधारचा वापर केला जाऊ शकेल.
- ऑफलाइन आधार आणल्यास वित्तीय तंत्रज्ञान कंपन्यांनाही फायदा होणार आहे. आधार बंधनकारक करण्याची मागणी या कंपन्या करीत आहेत. तथापि, सरकारने ही मागणी फेटाळून लावली आहे. अशा परिस्थितीत या कंपन्यांना ऑफलाइन आधार उपयुक्त ठरू शकेल.
- खासगी संस्थांना आधार पडताळणी करण्याचे अधिकार देण्यात येऊ नयेत, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. बँक खात्यांसाठी आधार बंधनकारक नसावे, असेही न्यायालयाने दिलेल्या निर्णयात म्हटले आहे. त्यामुळे ऑफलाइन आधारवर चर्चा सुरू झाली.
- तसेच हा आधार क्रमांक आधार प्राधिकरणाच्या सर्व्हरशी जोडलेला नसेल. त्याऐवजी आधार प्राधिकरणाची डिजिटल स्वाक्षरी असलेल्या क्यूआर कोडची प्रिंटआउट नागरिकांना मिळेल. हा दस्तावेज रेशन कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना आणि मतदान कार्ड यापेक्षा अधिक विश्वसनीय असेल.
Must Read (नक्की वाचा):
जानेवारी ते मार्च महिन्यात लग्नाला बंदी:
- पुढील वर्षी जानेवारी ते मार्चमध्ये लग्नसोहळ्यास उत्तरप्रदेश मधील प्रयागराज येथे बंदी घालण्यात आली आहे. अशाप्रकारचा आदेशच उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने काढला आहे. तसंच या आदेशाची प्रतही लग्न समारंभासाठी हॉल देणाऱ्या मालकांकडे देण्यात आली आहे.
- जानेवारी ते मार्चदरम्यान येथे कुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे योगी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
- प्रयागराज येथे जानेवारी ते मार्च महिन्यात कुणी लग्नासाठी हॉल बुक केला असेल किंवा इतरही बुकिंग केलं असल्यास नागरिकांनी आपले पैसे परत घ्यावेत, असे योगी सरकारकडून सांगण्यात आले आहे. यासंबंधित लेखी सूचना हॉटेलमालक आणि लग्नासाठी हॉल देणाऱ्या मालकांना देण्यात आली आहे. प्रयागराज वगळता इतर शहरांमध्ये लग्न करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
- पुढील वर्षी कुंभमेळय़ात पाच पवित्र स्नान होणार आहेत. पहिले स्नान हे मकर संक्रांतीला तर दुसरे पवित्र स्नान पौष पौर्णिमेला होत आहे. त्यानंतर, फेब्रुवारी महिन्यात मौनी आमावस्या, वसंत पंचमी आणि माघी पौर्णिमेला होणार आहे. तर मार्च महिन्यात महाशिवरात्री एकादशीला पवित्र स्नान होईल.
नौदलात लवकरच नव्या युद्धनौका व पाणबुड्यांचा समावेश होणार:
- नौदलाच्या ताफ्यामध्ये नव्या 56 युद्धनौका व पाणबुड्या सामील करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. तिसऱ्या विमानवाहू युद्धनौकेचाही समावेश करण्यात येईल, असे नौदलप्रमुख अॅडमिरल सुनील लांबा यांनी सांगितले.
- नौदल दिनानिमित्ताने पत्रकार परिषदेत ते म्हणाले, 32 युद्धनौकांची बांधणी सुरू आहे. किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी 2.5 लाख मच्छीमार बोटींवर ऑटोमेटेड आयडेंटिफिकेशन ट्रान्सपॉन्डर्स बसविण्यात येत आहेत.
- समुद्री गस्तीनौकांच्या बांधणीला विलंब झाल्याबद्दल रिलायन्स नेव्हल इंजिनीअरिंग लिमिटेडवर नौदलाने कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे, असे लांबा यांनी सांगितले. या प्रकल्पाला बँकेने दिलेल्या हमीची रक्कम नौदलाने स्वत:च्या ताब्यात घेतली आहे.
- तसेच या प्रकरणाची नौदलाकडून चौकशी सुरू आहे. मात्र हा व्यवहार अद्याप रद्द झालेला नाही, असेही ते म्हणाले. मालदीवमध्ये भारताला अनुकूल असलेले सरकार आले असून दोन्ही देशांतील सागरी सुरक्षाविषयक सहकार्य वाढावे याचे प्रयत्न आहेत.
कॅन्सरशी लढा देण्यासाठी राज्य शासन रिलायन्स सोबत:
- जगात कॅन्सर हा दुर्धर आजार म्हणून ओळखला जातो. अलीकडच्या काळात कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. अनेक रुग्ण कॅन्सरच्या विविध प्रकारांशी लढा देत आहेत.
- रिलायन्स समूह सामाजिक बांधीलकीच्या जाणीवेतून कॅन्सरशी यशस्वी लढा देण्यासाठी रुग्णालयांची साखळी उभारत आहे. या लढ्यामध्ये राज्य शासन रिलायन्स सोबत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
- बाळापूर तालुक्यातील रिधोरा गावाच्या परिसरात रिलायन्स समूहाचे कॅन्सर केअर हॉस्पीटलचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फित कापून व कोनशीलेचे अनावरण करुन करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
- तर याप्रसंगी व्यासपीठावर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, गृह राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, रिलायन्स हॉस्पीटलच्या अध्यक्षा टिना अंबानी, डॉ. तुषार मोतीवाला, डॉ. राम नारायण यांची उपस्थिती होती.
कतार या देशाची ‘ओपेक’मधून माघार:
- ऊर्जासंपन्न असलेल्या कतार या लहानशा अरब देशाने ओपेक (ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्स्पोर्टिग कंट्रीज) या तेल निर्यातदार देशांच्या संघटनेतून जानेवारी 2019 पासून बाहेर पडण्याचे जाहीर केले आहे. या आठवडय़ातील ओपेकच्या बैठकीस कतार हजेरी लावणार आहे.
- तेलाच्या किमती कमी होत असताना घसरण थांबवण्यासाठी तेलाचे उत्पादन कमी करण्याच्या आवाहनास कतारने प्रतिसाद न देता उत्पादन वाढवण्याचे समर्थन केले आहे. ओपेक मधील बलाढय़ देश असलेल्या सौदी अरेबियाने कतारवर बहिष्कार टाकल्याने असलेली नाराजी यातून व्यक्त झाली आहे.
- कतारचे ऊर्जामंत्री साद शेरिदा अल काबी यांनी अचानक ओपेकमधून बाहेर पडण्याची घोषणा केल्यानंतर या संघटनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लागले असून, 2016 मध्ये तेलाच्या किमती पिंपाला 30 डॉलरपेक्षा कमी झाल्याने उत्पादन कपातीस सदस्य नसलेल्या देशांना राजी करण्याचे आव्हान या संघटनेपुढे होते.
- 1960 मध्ये ओपेकची स्थापना झाल्यानंतर कतारने या संघटनेतून प्रथमच माघार घेतली असून, कतारचे ऊर्जामंत्री अल काबी यांनी सांगितले, की यापुढे आमचा देश एलपीजी वायूची निर्यात वर्षांला 77 दशलक्ष टनावरून 110 दशलक्ष टन करणार आहे.
दिनविशेष:
- 4 डिसेंबर हा दिवस ‘भारतीय नौसेना दिन‘ आहे.
- भारताचे माजी राष्ट्रपती आर. व्यंकटरमण यांचा जन्म 4 डिसेंबर 1910 मध्ये झाला होता.
- भारताचे माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचा जन्म 4 डिसेंबर 1919 मध्ये झाला.
- सन 1924 मध्ये गेट वे ऑफ इंडिया या वास्तूचे व्हाईसराय लॉर्ड रीडिंग यांच्या हस्ते उद्घाटन.
- भारतीय लष्कराचे सरसेनापती म्हणून जनरल करिअप्पा यांची सन 1948 मध्ये नेमणूक झाली होती.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा