4 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

4 January 2020 Current Affairs In Marathi
4 January 2020 Current Affairs In Marathi

4 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (4 जानेवारी 2020)

‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धात हणमंत, आबासाहेब यांची सोनेरी कामगिरी :

  • ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी रंगतदार कुस्त्या झाल्या. मागच्या वर्षीच्या 57 किलो आणि 79 किलो माती गटातील रौप्यपदक विजेत्यांनी सुवर्णपदकावर नाव कोरले. माती विभागात 57 किलो वजनी गटात सोलापूरच्या आबासाहेब अटकळेने आणि 79 किलो गटात उस्मानाबादच्या हणमंत पुरीने सुवर्णपदक पटकावले.
  • पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे येथे सुरू झालेल्या या स्पर्धेतील पहिल्याच दिवशी 57 व 79 किलो वजनी गटाच्या माती विभागातील अंतिम फेरीचे सामने पार पडले. त्यात 79 किला गटाच्या अंतिम सामन्यात उस्मानाबादच्या हणमंतने सोलापूरच्या सागर चौगुलेला 5-0 गुणाने हरवत जेतेपद पटकावले. कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीत नाशिकच्या धर्मा शिंदेने परभणीच्या गिरिधारी दुबेवर 8-2 अशी मात केली.
  • तसेच 57 किलो गटात आबासाहेबने उपांत्य फेरीत बीडच्या अतिश तोडकरवर विजय मिळवीत अंतिम फेरी गाठली. मग अंतिम फेरीत आबासाहेब व संतोष हिरूगुडे यांच्यामध्ये 8-8 अशी बरोबरी झाली. आबासाहेबने शेवटचा गुण मिळवल्यामुळे त्याला विजयी घोषित करण्यात आले. हे दोघेही काका पवार यांच्या कात्रज येथील तालमीचे मल्ल आहेत.

विमानतळावर फार्मा कार्गो हाताळणीची क्षमता देशात होणार सर्वाधिक :

  • मुंबई विमानतळावरून सध्या सुरू असलेल्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये वाढ करून, प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा पुरविण्याचा निर्धार मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडतर्फे करण्यात आला आहे. रशिया, चीनसह किमान 7 आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये मुंबईतून थेट विमानसेवा सुरू करण्याचे प्रशासनाचे 2020 साठीचे
    उद्दिष्ट आहे.
  • तर सध्या मुंबई विमानतळावरून 47 आंतरराष्ट्रीय ठिकाणी, तर 61 देशांतर्गत ठिकाणी विविध हवाई वाहतूक कंपन्यांद्वारे उड्डाणे केली जातात. यामध्ये वाढ करण्याचे नियोजन आहे.
  • तसेच 2018-19 मध्ये मुंबई विमानतळावरून 4 कोटी 88 लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. त्यानंतर, विमानतळाची प्रवासी वाहतुकीची क्षमता वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
  • फार्मास्युटिकल कंपनीच्या साहित्याची ने-आण करण्यासाठी विमानतळावर गतवर्षी तापमान नियंत्रित करण्याची क्षमता असलेली वाहतूक व्यवस्था पुरविण्यास प्रारंभ केला आहे. देशातील सर्वात मोठी, विमानतळावरील फार्मा मालवाहतूक हाताळण्याची क्षमता मुंबई विमानतळावर तयार करण्यात येत असून, या माध्यमातून 2020 मध्ये 4
    लाख 50 हजार टन फार्मा साहित्याची ने-आण करण्याची क्षमता निर्माण करण्यात येईल.
  • मालवाहतूक क्षेत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक्स सुविधा पुरविण्यासाठी पेमेंट गेटवे, व्हेइकल स्लॉट मॅनेजमेंट, आॅनलाइन डिलिव्हरी सर्व्हिसेसमध्ये सुधारणा करण्यात येत आहे.

साथरोगाची ‘रिअल टाईम’ माहिती मिळणार :

  • राज्यातील कोणत्याही भागात साथरोगाचे रुग्ण आढळल्यास त्याची ‘रिअल टाईम’ माहिती आरोग्य विभागाला मिळणार आहे. विविध आजारांच्या माहितीच्या आधारे साथरोगाच्या उद्रेकाचा इशारा देणारी ही संगणकीय प्रणाली राज्यात पुढील महिनाभरात कार्यान्वित होईल. त्यामुळे साथरोग नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करणे
    शक्य होणार आहे.
  • एकात्मिक आरोग्य व्यवस्थापन व्यासपीठ (आयएचआयपी) अंतर्गत ही प्रणाली सुरू केली जाणार असून महाराष्ट्र देशातील नववे राज्य ठरले आहे.
  • तसेच केंद्र सरकार व जागतिक आरोग्य संघटनेने संयुक्तपणे ‘आयएचआयपी’ हे व्यासपीठ विकसित केले आहे. देशात नोव्हेंबर 2018 पासून टप्याटप्याने काही राज्यांमध्ये याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातही ही प्रणाली सुरू करण्यासाठी काही दिवसांपासून तालुका, जिल्हापातळीवर कर्मचारी, अधिकाºयांचे प्रशिक्षण सुरू होते.
  • संगणकीय प्रणाली तीन पातळ््यांवर काम करणार आहे. पहिल्या टप्प्यात गाव पातळीवरील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील रुग्णांची माहिती तेथील आरोग्य सेवकांकडून ‘एस’ फॉर्म (संशयित) मध्ये भरली जाईल. त्यांच्यासाठी मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात तालुका पातळीवरील सरकारी रुग्णालये, आरोग्य
    केंद्रांमधील रुग्णांची माहिती (पी फॉर्म) संगणकाद्वारे भरली जाईल. तर तिसऱ्या टप्प्यात सरकारी प्रयोगशाळांमध्ये नमुना तपासणीनंतरच्या निदानाची माहिती (एल फॉर्म) संगणकाद्वारे भरली जाईल. हे तिनही फॉर्म एकमेकांशी जोडण्यात आले आहेत. गावपातळीवर भरलेली माहिती सर्व सरकारी रुग्णालये, प्रयोगशाळांना पाहता येऊ शकते.

दिनविशेष:

  • 4 जानेवारी हा दिवस ‘जागतिक ब्रेल दिन‘ आहे.
  • इंग्लिश शास्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म 4 जानेवारी 1643 मध्ये झाला होता.
  • आंधळ्या व्यक्तींसाठी ब्रेल लिपीतयार करणारे लुई ब्रेल यांचा जन्म 4 जानेवारी 1809 मध्ये झाला होता.
  • लघुलिपी म्हणजेच शॉर्टहँड तयार करणारे आयझॅक पिट्समन यांचा जन्म 4 जानेवारी 1813 मध्ये झाला होता.
  • सन 1881 मध्ये लोकमान्य टिळकांनी पुणे येथे केसरी वृत्तपत्र सुरु केले.
  • ब्रम्हदेश (म्यानमार) देशाला इंग्लंडपासुन सन 1948 मध्ये स्वातंत्र्य मिळाले.
  • सन 1954 मध्ये ‘मेहेरचंद महाजन‘ यांनी भारताचे 3रे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला होता.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.