4 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
4 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (4 जुलै 2020)
15 ऑगस्ट पर्येंत करोना वर लस सर्वासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न:
करोना लसीवरील संशोधन लवकरात लवकर संपवून स्वातंत्र्य दिनापर्यंत (15 ऑगस्ट) लस सर्वत्र उपलब्ध करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार आणि भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था (आयसीएमआर) करत असल्याचे उघड झाले आहे.
आयसीएमआर’ने लसीची मानवी चाचणी करणाऱ्या रुग्णालयांना पाठवलेल्या पत्रात लस उपलब्ध करण्याची ‘अंतिम तारीख’ नमूद केली आहे.
आयसीएमआर’ने भारत बायोटेक कंपनीच्या ‘कोव्हॅक्स’ या लसीच्या मानवी चाचणीला गेल्या आठवडय़ात परवानगी दिली होती.
केवळ दीड महिन्यांतील चाचण्यांनंतर ही लस लोकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. मानवी चाचणी घेतल्यानंतर 15 ऑगस्टला ही लस सर्वासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.
फ्रान्सचे पंतप्रधान एदुआर्द फिलीप यांनी राजीनामा दिला:
फ्रान्सचे पंतप्रधान एदुआर्द फिलीप यांनी राजीनामा दिला असून त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.
अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी त्यांच्या उर्वरित दोन वर्षांच्या कारकीर्दीत नवा अध्याय सुरू करण्याचे ठरवले असून फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेचे पुनरुत्थान करण्याचे ठरवले आहे.
मॅक्रॉन यांनी म्हटले आहे की, देशाची फेरउभारणी करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत त्यासाठी नवा मार्ग वापरावा लागेल.
मॅक्रॉन यांच्या पक्षाला निवडणुकीत अनेक मोठय़ा शहरात पराभवाचा फटका बसला आहे. ग्रीन पार्टीने त्यात आघाडी घेतली. मार्च व एप्रिलमध्ये करोनाची साथ शिखरावस्थेत होती त्यावेळी त्यांच्यावर टीका झाली.
Intel Capital’ ही कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये मोठी गुंतवणूक करणार:
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये जगातील विविध आघाडीच्या कंपन्यांची गुंतवणूक सुरूच आहे.
आता ‘Intel Capital’ ही कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये मोठी गुंतवणूक करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ प्लॅटफॉर्मसकडून आज याबाबत माहिती देण्यात आली.
‘इंटेल कॅपिटल’ जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 1,894.50 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये गुंतवणूक करणारी इंटेल कॅपिटल ही 11 वी कंपनी ठरेल.
तसेच 1,894.50 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे इंटेल कंपनीला जिओमध्ये 0.39 टक्क्यांची हिस्सेदारी मिळेल.
दिनविशेष :
भारताचे दुसरे पंतप्रधान गुलझारीलाल नंदा यांचा जन्म 4 जुलै 1898 मध्ये झाला होता.
सन 1903 मध्ये मोटर रेस स्पर्धे मध्ये भाग घेणारी डॉरोथी लेव्हिट ही पहिली इंग्लिश महिला ठरली.
सन 1947 मध्ये भारत पाकिस्तान असे दोन स्वतंत्र देश निर्माण करावेत असा ठराव ब्रिटनच्या संसदेत मांडण्यात आला.
नासाचे पाथफाइंडर हे मानवविरहित यान सन 1997 मध्ये मंगळावर उतरले.
सन 1999 मध्ये लष्कराच्या 18व्या बटालियनने कारगिलमधील द्रासमधील टायगर हिल्स हा महत्त्वाचा टापू घुसखोरांच्या ताब्यातून मुक्त केला.
Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.