4 March 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
4 March 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (4 मार्च 2019)
बजरंगकडून सुवर्णपदक अभिनंदनला समर्पित:
- रूस (बल्गेरिया) येथे झालेल्या डॅन कोलोव्ह-निकोला पेट्रोव्ह कुस्ती स्पर्धेत मिळवलेले सुवर्णपदक बजरंग पुनियाने भारतीय हवाई दलाचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमानला समर्पित केले आहे.
- जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या पुनियाने हंगामाचा दिमाखदार प्रारंभ करताना 65 किलो वजनी गटात अमेरिकेच्या जॉर्डन ऑलिव्हरचा 12-3 असा पराभव केला. या स्पर्धेद्वारे त्याने क्रमवारीतील गुणांचीसुद्धा कमाई केली आहे.
- ‘मला हे सुवर्णपदक विंग कमांडर अभिनंदन वर्धमानला समर्पित करायचे आहे. त्यानेच मला प्रेरणा दिली. एके दिवशी त्याला भेटून हस्तांदोलन करायची माझी इच्छा आहे,’ असे ‘ट्वीट’ पुनियाने केले आहे.
- गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत पुनियाने पदकांची कमाई केली होती. याचप्रमाणे गेल्या पाच आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये त्याने चार सुवर्ण आणि एका रौप्यपदकाची कमाई केली आहे.
- सन 2010 मध्ये पॅरिस येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक मिळवण्यात अपयशी ठरलेल्या पुनियाने त्यानंतरच्या 10 स्पर्धामध्ये पदके मिळवली आहेत.
Must Read (नक्की वाचा):
हवाई दल व नौदल प्रमुखांना झेड प्लस सुरक्षा मिळणार:
- भारतीय नौदल व हवाई दलाच्या प्रमुखांना आता झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. सुरक्षा संस्थांच्या माहितीनुसार त्यांना धोका असल्याचे दिसून आले आहे. हवाई दल प्रमुख बी.एस. धनोआ व नौदल प्रमुख सुनील लांबा यांना झेड प्लस सुरक्षा दिली जाणार असून, लष्कर प्रमुख बिपीन रावत यांना आधीच ती देण्यात आली आहे.
- संबंधित दलांमधील कमांडोच त्यांच्या नजीकच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहेत, सुरक्षेच्या पुढच्या कडीत केंद्रीय व राज्य सुरक्षा संस्थांचे जवान असतील.
- भारत व पाकिस्तान यांच्यातील तणाव काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 40 जवान मारले गेल्यानंतर वाढला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानात शिरून बालाकोट या खैबर पख्तुनवा प्रांतातील जैशच्या छावणीवर हवाई हल्ले केले होते.
- तर त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेही काश्मीरमध्ये लष्करी आस्थापनांना लक्ष्य करीत हवाई हल्ले केले होते. पाकिस्तानने दिलेल्या प्रत्युत्तरात एफ-16 विमानासह एकूण 24 लढाऊ जेट विमाने सामील होती.
झीरो युरो नोटांमधून महात्मा गांधीजींच्या स्मृतींना प्रकाश:
- महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी दुबईतील भारतीय कलाकार अकबर यांनी पहिल्यावहिल्या युरो सुव्हिनिअर नोटा डिझाइन केल्या आहेत. गांधीजींच्या जीवनातील 12 लोकप्रिय घटना या झीरो युरो नोटांच्या मालिकांतून दिसणार आहे.
- विशेष म्हणजे जगभरात प्रत्येक नोटेच्या केवळ 5 हजार मर्यादित आवृत्त्याच छापल्या जाणार असल्याचे इंटरनॅशनल बँक नोट सोसायटीच्या दुबई शाखेचे अध्यक्ष राजकुमार यांनी स्पष्ट केले. या बाराही नोटांचे अनावरण यूएईत होणार आहे. त्यातील पहिल्या दोन नोटांचे पहिल्या टप्प्यात अनावरण होणार असून उरलेल्या नोटांचे अनावरण 2 आॅक्टोबर 2019 पर्यंत टप्प्याटप्प्याने केले जाईल.
- तर या नोटा गांधीजींच्या वैयक्तिक व राजकीय जीवनातील रंजक व लोकप्रिय घटनांवर आधारित आहेत. गांधीजींच्या जीवनातील प्रसंग केवळ इतिहासातील धडे म्हणून मर्यादित न राहता, या प्रेरणादायी इतिहासाला उजाळा मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबवतअसल्याचे राजकुमार यांनी सांगितले.
- तसेच या विशेष नोटा दीर्घकाळ जतन करता येतील. यापूर्वी गांधीजींच्या 100व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारने गांधीजींची प्रतिमा असणाऱ्या विशेष नोटा 1969मध्ये जारी केल्या होत्या. या नोटा लोकांच्या वापरासाठीही होत्या.
- त्यातील 45 विशेष नोटांचा संग्रह राजकुमार यांनी केल्याने त्यांचे नाव लिम्का बुक आॅफ रेकॉडर््समध्ये नोंदवण्यात आले आहे. त्यांच्याकडे सर्व क्रमांकाच्या नोटा असून त्यात एक रुपयाच्या 18, दोन रुपयांच्या पाच, 10 रुपयांच्या 13 तर 100 रुपयांच्या दोन नोटांचा समावेश आहे.
भारतीय जवानांच्या हाती आता ‘एके-203’ असणार:
- उत्तर प्रदेशातील अमेठी येथील कलाश्निकोव्ह रायफल निर्मिती युनिटमध्ये तयार झालेल्या ‘एके-203’ रायफली आता आमच्या सैनिकांच्या हाती येणार असून, या माध्यमातून ते दहशतवादी आणि नक्षलवाद्यांशी दोन हात करू शकतील. बंदूक निर्मितीचा कारखाना ही अमेठीची नवी ओळख असेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधानांच्या हस्ते 3 मार्च रोजी रायफल निर्मिती कारखान्याचा शुभारंभही झाला.
- ‘एके-203’ ही जगातील अत्याधुनिक बंदूक असून, भारत आणि रशियाच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या कोरवा दारूगोळा कारखान्यात ती तयार होणार आहे. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्या सहकार्यामुळे कमी वेळेत हा कारखाना उभा राहू शकला असे सांगत त्यांनी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही कठोर शब्दांत टीका केली.
- राहुल यांनी 2007 मध्ये या कारखान्याची पायाभरणी केली होती, तेव्हा त्यांनी येथील काम 2010 मध्ये सुरू होईल असे जाहीर केले होते. पण त्यांचे सरकार या कारखान्यामध्ये नेमके कोणत्या प्रकारची शस्त्रे निर्मिती होणार हे निश्चित करू शकले नाही.
- काही मंडळी मते मिळाल्यानंतर लोकांना विसरून जातात, लोकांना गरिबीतच ठेवण्यात त्यांना रस असतो, कारण त्यांच्या प्रत्येक पिढीला ‘गरिबी हटाओ’ची घोषणा देता येते. आता भविष्यामध्ये अमेठी ही येथे येणाऱ्या नेते मंडळींसाठी नाही, तर विकासकामांसाठी ओळखली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
दिनविशेष:
- सन 1837 मध्ये शिकागो शहराची स्थापना झाली.
- नवी दिल्ली येथे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते सन 1951 मध्ये पहिल्या आशियाई खेळांचे उद्घाटन झाले.
- भारतीय टेनिस खेळाडू रोहन बोपन्ना यांचा जन्म 4 मार्च 1980 मध्ये झाला.
- 2001 या वर्षी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते गुरुदासपूर येथील रणजितसागर धरण देशाला अर्पण केले होते.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा