4 September 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
4 September 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (4 सप्टेंबर 2019)
बुकरच्या लघुयादीत रश्दी आणि मार्गारेट अॅटवूड :
- सर्वोत्तम इंग्रजी कथात्म साहित्यासाठी दिल्या जाणाऱ्या बुकर पारितोषिकाची लघुयादी जाहीर झाली असून त्यात याआधी या पुरस्कारावर मोहर उमटविणारे ब्रिटिश-भारतीय लेखक सलमान रश्दी आणि कॅनडामधील लेखिका मार्गारेट अॅटवूड या दिग्गजांच्या कादंबऱ्यांचा समावेश आहे.
- तर रश्दी यांची नुकतीच प्रसिद्ध झालेली कादंबरी ‘क्विशोटे’ आणि अॅटवूड यांच्या ‘हॅॅण्डमेड्स टेल’ कादंबरीचा दुसरा भाग ‘द देस्टामेंट्स्’ यांनी जाहीर करण्यात आलेल्या बुकरच्या अंतिम लघुयादीत स्थान पटकावले.
- तसेच सलमान रश्दी यांना 1981 मध्ये ‘मिडनाइट चिल्ड्रेन’ यासाठी ‘बुकर’ पारितोषिक मिळाले असून आतापर्यंत पाच वेळा त्यांची पुस्तकं ‘बुकर’च्या स्पर्धेत होती.
- तर यावर्षी एकूण 151 पुस्तकं पुरस्कारासाठी शर्यतीत होती. त्यातून 13 ग्रंथांची लांब यादी महिन्यापूर्वी प्रसिद्ध झाली होती. त्यातून अंतिम यादीत कोणत्या पुस्तकांची निवड होईल, याबाबत गेल्या महिनाभर आंतरराष्ट्रीय ग्रंथविश्वात उत्सुकता होती.
- रश्दी आणि अॅटवूड यांच्यासह ल्युसी इलमन यांच्या ‘डक्स् न्यूबरिपोर्ट’ या कादंबरीचा समावेश झाला आहे. तिचे वैशिष्टय़ म्हणजे ती एका वाक्याची असून कोणत्याही पूर्णविराम अथवा विराम चिन्हांशिवाय ही हजार पृष्ठांची कादंबरी मांडण्यात आली आहे.
- ब्रिटिश आफ्रिकी लेखिका बर्नार्डिन एव्हारिस्टो यांची ‘गर्ल, वुमन, अदर’, नायजेरियातील लेखक चिगोझी ओबिओमा यांची ‘अॅन ऑर्केस्ट्रा ऑफ मायनॉरिटीज’ आणि तुर्कस्तानमधील वादग्रस्त कादंबरीकार एलिफ शफाक यांची ‘टेन मिनिटस् थर्टी सेकंड्स इन स्ट्रेंज वर्ल्ड’ पुस्तकाची यादीत निवड झाली आहे.
- यंदा आफ्रिकी स्त्री-मनाचा वेध घेणाऱ्या दोन कादंबऱ्या या यादीत आहेत, ‘ऑर्केस्ट्रा ऑफ मायनॉरिटीज’ आणि ‘गर्ल, वुमन, अदर’. तब्बल 19 वर्षांनी ‘बुकर’च्या यादीत पुस्तकाचा समावेश झाल्याने आनंद झाल्याचे रश्दी यांनी म्हटले आहे. यंदा ल्यूसी एलमन या अँग्लो-अमेरिकी नावाखेरीज एकही अमेरिकी साहित्यिकाची कादंबरी यादीत नाही.
Must Read (नक्की वाचा):
अॅपाची हेलिकॉप्टर्स भारतीय हवाई दलात दाखल :
- अमेरिकी बनावटीची आठ अॅपाची स्टील्थ हेलिकॉप्टर्स भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आली.
- सीमावर्ती भागातील दहशतवादासह सुरक्षेची अनेक आव्हाने सामोरी येत असताना भारतीय हवाई दलाची मारक क्षमता त्यामुळे वाढली आहे.
- बोईंग कंपनीने तयार केलेली ही हेलिकॉप्टर्स विकत घेण्याचा करार चार वर्षांपूर्वी करण्यात आला होता. त्यात अॅपाची एएच 64 ई प्रकारची 22 हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याचे ठरले होते.
- या हेलिकॉप्टर्समुळे हवाई दलाची क्षमता वाढणार असून ही हेलिकॉप्टर्स भारताच्या पश्चिम सीमेवर तैनात केली जाणार आहेत.’ भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी छावण्यांवर हवाई हल्ले केले होते त्यानंतर सहा महिन्यांनी ही हेलिकॉप्टर्स
हवाई दलात सामील करण्यात आल्याने आता भारताची मारक क्षमता वाढली आहे. - तर एएच 64 ई अॅपाची हेलिकॉप्टर्स ही जगातील सर्वात आधुनिक हेलिकॉप्टर्स मानली जातात ती सध्या अमेरिकी लष्करातही वापरली जात आहेत.
- भारतीय हवाई दलाच्या भविष्यकालीन गरजांची पूर्तता या हेलिकॉप्टर्समुळे होणार आहे. टेहळणी, सुरक्षा, शांतता मोहिमा, सर्व प्रकारच्या स्थितीत हल्ले अशा सर्वच बाबीत त्यांची कामगिरी चांगली आहे.
विश्वचषक नेमबाजी स्पर्धात मनू-सौरभचा ‘सुवर्णभेद’ :
- युवा नेमबाज मनू भाकर आणि सौरभ चौधरी यांनी दमदार पुनरागमन करत आयएसएसएफ विश्वचषक रायफल आणि पिस्तूल नेमबाजी स्पर्धेत सांघिक मिश्र गटात 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली.
- भारताने अभूतपूर्व अशी कामगिरी करत विश्वचषक स्पर्धेच्या पदकतालिकेत अग्रस्थानी झेप घेतली.
- तर यशस्विनी देस्वाल आणि अभिषेक वर्मा यांनी याच गटात भारताला रौप्यपदक मिळवून दिले. अखेरच्या दिवशी भारताने दोन सुवर्णपदकांची कमाई केली. त्यामुळे भारताने पाच सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्यपदकांसह एकूण नऊ पदके जिंकत अव्वल स्थान प्राप्त केले. या स्पर्धेत अन्य कोणत्याही देशाला एकापेक्षा अधिक सुवर्णपदकाची कमाई करता आली नाही.
- तसेच महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या अपूर्वी चंडेला हिने दीपक कुमारच्या साथीने खेळताना भारताला मिश्र एअर रायफल प्रकाराचे सुवर्णपदक मिळवून दिले. अंजूम मुदगिल आणि दिव्यांश सिंग पनवार यांना या प्रकारात कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
मिताली राजने जाहीर केली टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती :
- भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मिताली राज आता विश्वचषकावर लक्ष केंद्रीत करणार आहे.
- मिताली राजने 32 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचं नेतृत्त्व केलं.
- तर यामध्ये 2012 (श्रीलंका), 2014 (बांगलादेश) आणि 2016 (भारत) या तीन टी-20 विश्वचषकांचा समावेश आहे.
- मिताली राजने रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या आधी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या होत्या.
मलिंगाचा सर्वाधिक बळींचा विश्वविक्रम :
- श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळींचा विश्वविक्रम नोंदवला.
- न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मलिंगाने पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडीत काढला.
- तर 2011 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करणारा मलिंगा जुलै महिन्यात कारकीर्दीतील अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता.
- न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात मलिंगाने पहिल्याच षटकात कॉलिन मुन्रोचा त्रिफळा उडवून आफ्रिदीच्या विक्रमाची बरोबरी साधली. मग कॉलिन डी ग्रँडहोमला (44) बाद करीत सर्वाधिक बळींचा विक्रम आपल्या नावे केला.
दिनविशेष :
- महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचा जन्म 4 सप्टेंबर 1221 मध्ये झाला.
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय पितामह दादाभाई नौरोजी यांचा जन्म 4 सप्टेंबर 1825 मध्ये झाला.
- थॉमस एडिसन यांनी 4 सप्टेंबर 1882 मध्ये इतिहासातील पहिल्या व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प चालु केले. तसेच वीजयुगाची सुरुवात म्हणून हा दिवस ओळखला जातो.
- केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा जन्म 4 सप्टेंबर 1941 मध्ये झाला.
- सन 1998 मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गेइ ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी गुगलची स्थापना केली.
- रघुराम राजन यांनी सन 2013 मध्ये रिझर्व्हबँक ऑफ इंडियाचे 23वे गव्हर्नर म्हणून पदभार हाती घेतला होता.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा