4 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs
4 September 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (4 सप्टेंबर 2022)
शेतकरी दाम्पत्याच्या ‘व्हिलेज ट्रेड सेंटर’चा ‘फोर्ब्स’च्या यादीत समावेश :
- जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील वरुड (तुका) येथील एका तरुण दाम्पत्याने दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांची पिळवणूक टाळण्यासाठी स्थापन केलेल्या ‘ग्रामहित’ या छोटया व्यवसायाने जगप्रसिद्ध फोर्ब्स आशियाच्या यादीत स्थान मिळवले आहे.
- यावर्षी सहभागी झालेल्या 650 कंपनीमधून ‘ग्रामहित’ची निवड झाल्याने यवतमाळच्या लौकिकात भर पडली आहे.
- पंकज व श्वेता महल्ले हे तरुण दाम्पत्य ग्रामहितचे संस्थापक आहेत.
- ग्रामहितच्या माध्यमातून शेतमाल विक्री व्यवस्थेत होणारे शेतकऱ्यांचे शोषण थांबावे. त्यांच्या मालास अधिक दर मिळून आडत, हमाली, मापारी यात खर्च होणाऱ्या पैशांची बचत व्हावी तसेच योग्य भाव मिळेपर्यंत शेतमाल तारण ठेवून त्यावर माफक दरात कर्ज सुविधा उपलब्ध असावी; या दृष्टीने मोबाइलच्या माध्यमातून बाजार व्यवस्था शेतकरीपूरक, सुलभ आणि विश्वसनीय करण्याचा पंकजचा प्रयत्न आहे.
- यापूर्वी ‘महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी’च्या वतीने दिला जाणारा पुरस्कार ग्रामहितला मिळाला आहे.
- ‘ग्रामहित’द्वारे राबविल्या जाणाऱ्या शेतमाल विक्री व्यवस्थेच्या या वैशिष्टय़पूर्ण साखळीची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा घेतली गेली आहे.
- अमेरिकेतील ‘अॅक्युमन इंटरनॅशनल फेलोशिप’साठीही पंकजची निवड झाली.
Must Read (नक्की वाचा):
‘आर्टेमिस-१’ची अग्निबाण चाचणी इंधनगळतीमुळे दुसऱ्यांदा स्थगित :
- अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नॅशनल एअरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन’च्या (नासा) महत्त्वाकांक्षी चांद्रयान मोहिमेत शनिवारी धोकादायक अडथळा निर्माण झाला.
- त्यामुळे 21 व्या शतकातील महत्त्वाकांक्षी चांद्रयान मोहीम ‘आर्टेमिस 1’च्या अग्निबाणाची (रॉकेट) पूर्व चाचणी आठवभरात दुसऱ्यांदा स्थगित करावी लागली.
- शनिवारी या अग्निबाणाच्या चाचणीतील अंतिम तयारीचा भाग म्हणून त्यात इंधन भरले जात होते. त्या वेळी इंजिनात धोकादायक गळती झाल्याने ही प्रक्रिया थांबवावी लागली.
- चाचणी घेणाऱ्या पथकांनी या आठवडय़ातील दुसऱ्या प्रयत्नांतर्गत ‘नासा’च्या आतापर्यंतच्या सर्वात शक्तिशाली 322 फूट लांब अग्निबाणात दहा लाख गॅलन इंधन भरण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्यात गळती होऊ लागली.
- याआधी सोमवारी केलेल्या प्रयत्नांत यंत्रांच्या ‘सेन्सर’मध्ये बिघाड झाल्याने व इंधन गळती झाल्याने समस्या निर्माण झाली होती.
पक्षाकडून ‘एक कुटुंब, एक तिकिट’धोरण जाहीर :
- पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलाने पक्षाच्या धोरणांमध्ये मोठे बदल केले आहेत.
- पक्षाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी ‘एक कुटुंब, एक तिकिट’ हे धोरण जाहीर केले आहे.
- नव्या धोरणानुसार पक्षातील महिला आणि तरुणांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.
- पक्षातील 50 वर्षांखालील सदस्यांसाठी आगामी विधानसभा निवडणुकीत 50 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्याची माहिती बादल यांनी दिली आहे.
- पुढच्या पिढीत नेतृत्व तयार करण्यासाठी पक्षातील हे बदल महत्त्वाचे ठरणार आहेत, असे बादल म्हणाले आहेत.
- निवडणूक प्रणालीद्वारे पक्षाची नव्याने संघटनात्मक रचना करण्यात येणार आहे.
- या रचनेवर केंद्रीय निवडणूक समितीकडून देखरेख ठेवण्यात येणार आहे.
सेरेना तिसऱ्या फेरीतील पराभवानंतर निवृत्तीवर ठाम :
- गेल्या दोन दशकांपासून टेनिस कोर्टवर अनेक विक्रम करणाऱ्या सेरेना विल्यम्सने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीनंतर टेनिस प्रवासाला पूर्णविराम दिला.
- स्पर्धेपूर्वीच यंदाची अमेरिकन स्पर्धा अखेरची असल्याचे संकेत सेरेनाने दिले होते.
- त्यानुसार कारकीर्दीत 23 ग्रँडस्लॅम विजेतेपदे मिळविणाऱ्या सेरेनाने टेनिस विश्वाचा भावपूर्ण निरोप घेतला.
- ऑस्ट्रेलियाच्या अजला टॉमलजानोविचविरुद्धचा तिसऱ्या फेरीतला सेरेनाचा सामना हा अखेरचा ठरला.
- तीन तासांहून अधिक चाललेल्या या सामन्यात अजलाने सेरेनाला पराभूत केले.
दिनविशेष :
- महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचा जन्म 4 सप्टेंबर 1221 मध्ये झाला.
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय पितामह दादाभाई नौरोजी यांचा जन्म 4 सप्टेंबर 1825 मध्ये झाला.
- थॉमस एडिसन यांनी 4 सप्टेंबर 1882 मध्ये इतिहासातील पहिल्या व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प चालु केले. तसेच वीजयुगाची सुरुवात म्हणून हा दिवस ओळखला जातो.
- केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा जन्म 4 सप्टेंबर 1941 मध्ये झाला.
- सन 1998 मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गेइ ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी गुगलची स्थापना केली.
- रघुराम राजन यांनी सन 2013 मध्ये रिझर्व्हबँक ऑफ इंडियाचे 23वे गव्हर्नर म्हणून पदभार हाती घेतला होता.