Current Affairs (चालू घडामोडी)

5 April 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

5 April 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (5 एप्रिल 2019)

दंतवैद्यकच्या पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेला स्थगिती:

  • दंतवैद्यकच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली.
    प्रवेश प्रक्रियेत आरक्षण निश्चित करताना घोळ झाल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा ग्राह्य़ धरून न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत प्रवेशपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करू नये, असे आदेश सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाला (सीईटी सेल) दिले.
  • राज्यातील विविध शासकीय व खासगी महाविद्यालयांमध्ये दंतवैद्यकच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू असून, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारा (सीईटी) जागांच्या आरक्षण निश्चितीत घोळ घातल्याचा दावा अनेक उमेदवार व पालकांनी केला आहे.
  • तर या प्रवेश प्रक्रियेत ओबीसी प्रवर्गापेक्षा मराठा समाजाच्या सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्गाला (एसईबीसी) अधिक जागा दर्शवण्यात आल्या. डॉ. शिवाणी महेंद्र रघुवंशी आणि डॉ. प्रांजली भूपेंद्र चरडे यांनी प्रवेश प्रक्रियेला आव्हान देणारी ही याचिका दाखल केली. त्यावर न्या. सुनील शुक्रे आणि न्या. पुष्पा गनेडीवाला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.
  • राज्य सरकारने ‘एसईबीसी‘ प्रवर्गातर्गत मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण जाहीर केले. त्यानंतर प्रथमच राज्यात दंतवैद्यकच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (4 एप्रिल 2019)

IPL 2019 स्पर्धेमध्ये हैदराबाद अव्वल स्थानी:

  • आयपीएल 2019 या स्पर्धेत भेदक गोलंदाजी आणि दमदार सलामीच्या जोरावर सनरायझर्स हैदाराबादने दिल्ली कॅपिटल्सववर विजय मिळवला.
  • हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 129 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने पाच विकेट्स राखून हा सामना जिंकला.
  • तसेच या विजयासह हैदराबादने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.

डिजिटल व्यवहारांत पुणे आघाडीवर:

  • डिजिटल व्यवहार करण्यात पुणे, चेन्नई, राजधानी दिल्लीचा परिसर आणि जयपूर ही शहरे देशात आघाडीवर असून, त्यातही पुणे हे अव्वल क्रमांकावर आहे.
  • देशातील आघाडीची पेमेंट सोल्युशन कंपनी असलेल्या ‘रेझरपे’ने ‘दी इरा ऑफ रायझिंग फिनटेक हा अहवाल नुकताच प्रकाशित केला.
  • भारतात वेगाने वाढणार्‍या ‘फिनटेक इकोसिस्टम’चा अभ्यास यात केला आहे. या इकोसिस्टमचा लघु व माध्यम उद्योगांवर (एसएमई) होणार्‍या परिणामाचाही आढावा तसेच डिजिटल व्यवहारांच्या पद्धती, ऑनलाइन खर्च करण्याच्या लोकांच्या सवयी, ‘यूपीआय’चा प्रभाव याबाबत विश्लेषणही आहे.
  • सध्या मोठ्या व माध्यम शहरांमधील लघुउद्योगांमध्ये रोकडरहित व्यवहार करण्याचे प्रमाण 75 टक्क्यांनी वाढले आहे. नोटाबंदीनंतरयुनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) यंत्रणा सादर झाल्यानंतर डिजिटल पेमेंटसाठीची मागणी दरवर्षी 70 टक्क्यांनी वाढते आहे, असे पाहणीत आढळून आल्याची माहिती ‘रेझरपे’चे सहसंथपक व मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षिल माथुर यांनी दिली.

पाकिस्तानने स्वत: बालाकोट हल्ल्याचा पुरावा दिला:

  • भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये केलेल्या हल्ल्याचा पुरावा हा खुद्द पाकिस्ताननेच दिला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. विरोधकांकडून वारंवार या हल्ल्याचे पुरावे मागितले जात आहेत, या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.
  • मोदी म्हणाले, बालाकोट हल्ला झाला की नाही याबाबत प्रश्न उपस्थित केले जात असले तरी त्याचा पुरावे खुद्द पाकिस्ताननेच भारतीय हवाई हद्दीचे उल्लंघन करुन दिला आहे. मात्र, या हल्ल्यात किती जण मारले गेले यावर चर्चा झडत राहतील त्या होऊ द्या. भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानने त्याचा जागतीक स्तरावर गोंधळ घातला असता त्यामुळे आम्हाला इथे निर्लष्करी कारवाई करायची होती. हवाई हल्यावेळी एकीकडे पाकिस्तानी जनतेच्या भल्याचा आम्ही विचार केला तर दुसरीकडे दहशतवाद्यांच्या तळांना टार्गेट करायचे आमचे ठरले होते.
  • आमच्या भूमीवर दहशतवादी नाहीत असं आजवर पाकिस्तान जगाला सांगत आला आहे. मात्र, भारताच्या या कारवाईमुळे ते उघडे पडले. मात्र, भारतातून पाकिस्तानला हायसं वाटेल असे प्रश्न का विचारले जातात हा खरा प्रश्न आहे, अशा शब्दांत मोदींनी विरोधकांवर टीका केली.

दिनविशेष:

  • स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकारणी, केंद्रीय मंत्री तसेच भारताचे उपपंतप्रधान ‘बाबू जगजीवनराम’ यांचा जन्म 5 एप्रिल 1908 मध्ये झाला होता.
  • जेम्स बॉन्ड चित्रपटांचे निर्मातेअल्बर्ट आर. ब्रोकोली‘ यांचा जन्म 5 एप्रिल 1909 मध्ये झाला.
  • महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री आणि लोकसभा सदस्य ‘डॉ. रफिक झकारिया’ यांचा जन्म 5 एप्रिल 1920 मध्ये झाला.
  • अभिनेत्री सुलोचला यांच्या हस्ते सन 2000 मध्ये डी.डी.-10 या मराठी उपग्रह वाहिनीचे सह्याद्री असे नामकरण करण्यात आले.
  • सन 2000 मध्ये जळगाव नगरपालिकेच्या 17 माजली इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 एप्रिल 2019)

Sonali Borade

With Sonali's thorough backing of education in online journalism and a strong affinity to foster proper guidance, she is looking forward to engaging readers on smart education subjects. She covers articles related to all upcoming exam schedules and is much sought after due to his crisp style of writing. Sonali strongly believes that education is the future and evokes this interest in the readers.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago