गौतम अदानी 5 April 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 एप्रिल 2022)
एलन मस्कची ट्विटरमध्ये 2.8 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक :
टेस्लाचे प्रमुख एलन मस्कने (Elon Musk) ट्विटरमध्ये 2.8 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केलीय. यासह मस्क ट्विटरमधील 9.2 टक्के हिश्शासह सर्वात मोठा समभागधारक झालाय. विशेष म्हणजे एलन मस्ककडे ट्विटरचा सहसंस्थापक जॅक डॉर्सीच्या चारपट समभाग आले आहेत. मस्कच्या या निर्णयानंतर ट्विटरच्या समभागांमध्ये 26 टक्क्यांनी तेजी पाहायला मिळाली. एलन मस्क रिव्होकेबल ट्रस्टच्या माध्यमातून ही समभाग खरेदी होईल. देशातील 10 राज्यांमध्ये सुरु होणार ड्रोन पायलट ट्रेनिंग सेंटर :
ड्रोनच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार नवनवीन योजना आणत आहे. तर अनेक क्षेत्रात ड्रोनच्या वापरालाही मान्यता देण्यात आली आहे. 2022 चा अर्थसंकल्प सादर करताना केंद्र सरकारने ड्रोनशी संबंधित एक मोठी घोषणा केली. मोबाईल आणि कॉम्प्युटर सारखाच दैनंदिन जीवनात ड्रोनचाही समावेश करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तर त्यामुळे येत्या काळात मोठ्या प्रमाणात ड्रोन पायलटचीही गरज भासणार आहे. भविष्यातील ड्रोन पायलटची गरज लक्षात घेता 10 राज्यांमध्ये ड्रोन पायलटच्या प्रशिक्षणासाठी 18 शाळा उघडण्यात आल्या आहेत. बहुतांश ठिकाणी केवळ खासगी फ्लाइंग क्लबना शाळा सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आता अदानी आहेत भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती :
अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी यांचा 100 बिलियन अमेरिकन डॉलर्स संपत्ती असणाऱ्या व्यक्तींच्या यादीत समावेश झालाय. अदानी यांनी संपत्तीच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकलं असून ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. ब्लुमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सच्या आकेडवारीतून ही माहिती समोर आलीय. तर सध्या ‘स्पेस एक्स’ आणि इलेक्ट्रीक कार तयार करण्याऱ्या ‘टेस्ला’ कंपनीचे सर्वोसर्वा एलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तसेच त्या पाठोपाठ दुसऱ्या स्थानी अॅमेझॉनचे जेफ बेझोस तर तिसऱ्या स्थानी बर्नार्ड आरनॉल्ट तिसऱ्या स्थानी आहेत. अदानी यांच्या संपत्तीमध्ये 24 बिलियन अमेरिकन डॉलर्सने वाढ झाली असून ते जगातील सर्वाधिक संपत्ती कमवणारे व्यक्ती ठरलेत. एकूण संपत्तीच्या यादीनुसार सध्या अदानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 10 व्या स्थानी आहेत. ‘आयसीसी’चा सर्वोत्तम संघ जाहीर :
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सोमवारी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सर्वोत्तम 11 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली. तर या संघात भारताच्या एकाही खेळाडूला स्थान लाभलेले नसून विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या चार खेळाडूंचा समावेश होता. मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला यंदा न्यूझीलंड येथे झालेली महिला विश्वचषक स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात मात्र, सातपैकी चार सामने गमावणाऱ्या भारताला बाद फेरी गाठण्यात अपयश आले. तसेच या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये स्मृती आणि हरमनप्रीत अनुक्रमे सातव्या आणि आठव्या स्थानी होत्या. मात्र, या दोघींनाही ‘आयसीसी’च्या सर्वोत्तम संघात स्थान मिळू शकले नाही. धोनीची रचला ‘हा’नवा विक्रम :
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील अकरावा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळवला गेला. तर हा सामना 54 धावांनी गमावल्यानंतर चेन्नई संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर पोहोचला आहे. दरम्यान, चेन्नईने सामना गमावला असला तरी माजी कर्णधार आणि चेन्नईचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने या सामन्यात नवा विक्रम रचलाय . तसेच या सामन्यात पंजाबचा विजय झालेला असला तरी पराभूत झालेल्या संघातील धोनीचीच सगळीकडे चर्चा होत आहे. महेंद्रसिंह धोनीने आतापर्यंत एकदीवसीय, टी-20 तसेच अनेक कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान, तो भारतीय संघाकडून सर्वात जास्त टी-20 सामने खेळणारा क्रमांक दोनचा फलंदाज ठरला आहे. रोहित शर्माने भारताकडून आतापर्यंत सर्वाधक म्हणजेच 372 सामने खेळलेले असून तो या विक्रमामध्ये प्रथमस्थानी आहे. तर या विक्रमामध्ये महेंद्रसिंह धोनीनंतर मिस्टर आयपीएल म्हणून ओळख असलेला सुरेश रैना तिसऱ्या क्रमांवर आहे. दिनविशेष:
स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकारणी, केंद्रीय मंत्री तसेच भारताचे उपपंतप्रधान ‘बाबू जगजीवनराम’ यांचा जन्म 5 एप्रिल 1908 मध्ये झाला होता. जेम्स बॉन्ड चित्रपटांचे निर्माते ‘अल्बर्ट आर. ब्रोकोली‘ यांचा जन्म 5 एप्रिल 1909 मध्ये झाला. महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री आणि लोकसभा सदस्य ‘डॉ. रफिक झकारिया’ यांचा जन्म 5 एप्रिल 1920 मध्ये झाला. अभिनेत्री सुलोचला यांच्या हस्ते सन 2000 मध्ये डी.डी.-10 या मराठी उपग्रह वाहिनीचे सह्याद्री असे नामकरण करण्यात आले. सन 2000 मध्ये जळगाव नगरपालिकेच्या 17 माजली इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.