5 August 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (5 ऑगस्ट 2019)
चांद्रयान-2 ने पाठवली पृथ्वीची छायाचित्रे :
- भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने पाठवलेले चांद्रयान-2 मजल दरमजल करत चंद्राच्या दिशेने मार्गाक्रमण करत आहे. या प्रवासादरम्यान चांद्रयान-2 ने पृथ्वीची काही नयनरम्य छायाचित्रे काढली असून, इस्रोने ट्विटरवरून ही छायाचित्रे शेअर केली आहेत.
- तर अंतराळातून आपली पृथ्वी कशी दिसते याचे सुंदर चित्रण चांद्रयान-2 नेया छायाचित्रांच्या माध्यमातून केले आहे.
- तसेच देशवासीयांसह संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या इस्रोचे चांद्रयान-2 22 जुलै रोजी दुपारी चंद्राच्या दिशेने झेपावले होते.
- तर आता हे यान सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात चंद्राच्या जवळ पोहोचणार असून, या यानामधील विक्रम हा लँडर चंद्राच्या पृष्टभागावर उतरणार आहे.
भारताच्या ‘क्यूआरएसएएम’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी :
- भारताने सर्व हवामानांत व प्रदेशांत अनुकूल अशा अत्याधुनिक क्यूआरएसएएम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली.
- ओदिशातील चंडीपूर येथे एकात्मिक चाचणी क्षेत्रात सकाळी 11 वाजून 5 मिनिटांनी ही चाचणी घेण्यात आली.
- तर संकुल- 3 मधून मोबाइल ट्रकवरून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले. या क्षेपणास्त्राची निर्मिती संरक्षण संशोधन व विकास संस्थेने केली आहे.
- तसेच जलद प्रतिसाद देणारे, जमिनीवरून हवेत मारा करणारे हे सुरक्षा क्षेपणास्त्र चालत्या ट्रकमध्ये एका मोठय़ा कुपीत ठेवण्यात आले होते. त्यात घन इंधनाचा वापर केलेला असून त्याचा पल्ला 25-30 किलोमीटर आहे.
- तर या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी 4 जून 2017 रोजी झाली होती. 26 फेब्रुवारी 2019 रोजी त्याच्या दोन चाचण्या एकाच दिवशी घेण्यात आल्या व त्या यशस्वी झाल्या.
- रविवारी दोन क्षेपणास्त्रांची वेगवेगळ्या उंचीवर चाचणी घेण्यात आली. त्यात त्याची वायुगती, इंधन क्षमता, रचनात्मक स्थिती हे घटक योग्य काम करीत असल्याचे दिसून आले आहे.
विनेशला फोगटला सलग तिसरे सुवर्ण :
- भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगटने वॉरसॉ येथे झालेली पोलंड खुली कुस्ती स्पर्धा जिंकून महिलांच्या 53 किलो गटामधील सलग तिसऱ्या सुवर्णपदकाची नोंद केली.
- तर 24 वर्षीय विनेशने अंतिम सामन्यात पोलंडच्या रुक्सानाचा 3-2 असा पराभव केला.
- तसेच उपांत्यपूर्व सामन्यात विनेशने ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सोफिया मॅट्सनचा (स्वीडन) पराभव केला.
- गेल्या महिन्यात विनेशने स्पेनमधील ग्रां. प्रि. कुस्ती स्पर्धा आणि टर्की येथील यासर डोगू आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली होती.
हिटमॅन रोहितची ख्रिस गेलशी बरोबरी :
- पहिल्या टी-20 सामन्यात विंडीजवर 4 गडी राखून भारताने मात केली. मात्र 96 धावांचं आव्हान पार करताना भारतीय फलंदाजांना शर्थीचे प्रयत्न करावे होते.
- मात्र दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली. रोहित शर्मा आणि शिखर धवन जोडीने पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत भारताला भक्कम सुरुवात करुन दिली. रोहित शर्माने पहिल्याच षटकात चौकार ठोकत भारतीय डावाची सुरुवात केली.
- तसेच आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्याच चेंडूवर सर्वाधिक वेळा चौकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहितने ख्रिस गेलशी बरोबरी केली आहे. गेल आणि रोहित या दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत 4-4 वेळा अशी कामगिरी केली आहे.
- तसेच न्यूझीलंडचा मार्टीन गप्टील या यादीमध्ये पहिल्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत सहावेळा अशी कामगिरी करुन दाखवली आहे.
दिनविशेष :
- 5 ऑगस्ट 1914 ओहायो मध्ये पहिले इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिगनल बसवले.
- नेल्सन मंडेला यांना 5 ऑगस्ट 1962 मध्ये तुरुंगात टाकण्यात आले.
- 5 ऑगस्ट 1962 मध्ये कन्या नक्षत्रात पहिल्या क्वासार तार्याचं अस्तित्त्व सिद्ध करण्यात यश.
- चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव नील आर्मस्ट्राँग यांचा 5 ऑगस्ट 1930 मध्ये जन्म झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा